Modi Government 3.0 : मुरलीधर मोहोळ पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गजांच्या लिस्टमध्ये!

Western Maharashtra Minister : ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश जावडेकर या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत मोहोळ यांना स्थान मिळणार आहे.
Murlidhar Mohol
Murlidhar Mohol Sarkarnama

Solapur, 09 June : नरेंद्र मोदी हे आज (ता. ९ जून) सायंकाळी दिल्लीत तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत ४० खासदार मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. महाराष्ट्रातून मंत्रिपदासाठी अनेक नावे चर्चेत असून पश्चिम महाराष्ट्रातून पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना पहिल्याच टर्ममध्ये मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, प्रकाश जावडेकर या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीत मोहोळ यांना स्थान मिळणार आहे.

मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममध्ये (Modi Government 3.0) महाराष्ट्रातील नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol ), प्रतापराव जाधव, रामदास आठवले यांना मंत्रिपदासाठी फोन आलेला आहे. यातून भाजपने महाराष्ट्रातील सर्व विभागाला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. विदर्भातून नितीन गडकरी, मुंबईतून पियूष गोयल, उत्तर महाराष्ट्रातून रक्षा खडसे, पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) मुरलीधर मोहोळ, तर शिवसेनेचे बुलाडाण्याचे (विदर्भ-मराठवाडा) खासदार प्रतापराव जाधव आणि मुंबईचे रामदास आठवले यांचा समावेश आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पश्चिम महाराष्ट्रातून गेल्या वीस वर्षांत ज्येष्ठ नेते शरद पवार, काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, तर भाजपचे (राज्यसभा सदस्य) प्रकाश जावडेकर यांनी केंद्रात मंत्रिपद भूषविले आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात शरद पवार हे २००४ ते २०१४ पर्यंत म्हणजे १० वर्षे कृषिमंत्री होते. त्या अगोदर त्यांनी नरसिंहराव यांच्या काळात संरक्षण मंत्री म्हणून काम पाहिले आहे.

सुशीलकुमार शिंदे हे २००४ ते २०१२ पर्यंत केंद्रीय ऊर्जामंत्री होते. त्यानंतर त्यांच्याकडे केंद्रीय गृहमंत्री आणि लोकसभेच्या नेतेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पृथ्वीराज चव्हाणही २००४ ते २००९ हे पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, तर २००९ पासून २०१० पर्यंत विज्ञान, तंत्रज्ञान मंत्री हेाते.

Murlidhar Mohol
India PM Oath Taking: PMO मधून फोन आला अन् रक्षाताईंना रडू कोसळलं; नाथाभाऊ कुटुंबासह विमानाने दिल्लीला रवाना..

सांगलीचे प्रतीक पाटील हे २००९ ते २०१२ दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री होते. सुरुवातीला ३१ मे २००९ ते १४ जून २००९ पर्यंत केंद्रीय अवजड उद्योग राज्यमंत्री, त्यानंतर १४ जून २००९ ते १९ जानेवारी २०११ पर्यंत क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री होते. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात १९ जानेवारी २०११ ते ऑक्टोबर २०१२ पर्यंत ते कोळसा राज्य मंत्री हेाते.

मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये २६ मे २०१४ ते ५ जुलै २०१६ पर्यंत प्रकाश जावडेकर हे पर्यावरण आणि हवामान विभागाचे मंत्री होते. त्यानंतर ५ जुलै २०१६ ते ३० मे २०१९ पर्यंत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री होते. तत्पूर्वी ते २७ मे २०१४ ते ९ नोव्हेंबर २०१४ पर्यंत ते माहिती न तंत्रज्ञान मंत्री होते. जावडेकर हे ३० मे २०१९ ते ७ जुलै २०२१ पर्यंत पुन्हा पर्यावरण आणि हवामान विभागाचे मंत्री म्हणून काम केले आहे. त्यांनी अवजड उद्योगमंत्री म्हणूनही काम केले आहे.

Murlidhar Mohol
Nashik Teacher Constituency : नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीतील उमेदवार किशोर दराडेंचे अपहरण की बेपत्ता?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com