Ajit Pawar: आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का? अजितदादांची विधानं अन् समाजमाध्यमांतील चर्चा

Social Media Discussion on Ajit Pawar Statement: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या अलीकडच्या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्यांच्या विधानांवर विरोधकांनी टीका केली
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या थेट आणि बेधडक विधानांबरोबरच शिस्त पाळण्यासाठीही प्रसिध्द असणारे नेते आहे. मात्र गेल्या काही दिवसांत त्यांचा स्पष्टवक्तेपणा समाजमाध्यमांवर जरा जास्तच प्रमाणात व्हायरल होत आहे.

जाहीर सभांमधून अजित पवार यांना त्यांच्याच पक्षाचा कार्यकर्ता उभा राहून उलट प्रश्न विचारतो, काही सल्ला देतो. मग अजित पवार त्याला त्यांच्या खास शैलीत उत्तर देतात. हे अनेकदा पाहायला मिळाले आहे. समाजमाध्यमांवर असे व्हिडिओ राज्यभर मोठ्या चवीने पहिले जातात. त्याची चर्चा केली जाते.

मराठवाड्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या ओल्या दुष्काळाची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांची सासुरवाडी असलेल्या धाराशिव येथे गेले असता एका शेतकऱ्याने त्यांच्यासमोर कर्ज माफीचा विषय काढला. झाले या प्रश्नावर अजित पवार संबधित शेतकऱ्यावरच खवळले. त्यांनी त्या शेतकऱ्यालाच उलट विचारले आम्ही काय गोट्या खेळायला आलो आहोत का?

Ajit Pawar
Land Census: आता फक्त ३० दिवसांत होणार जमीन मोजणी; महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय

नेहमी दुष्काळात होरपळणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसाने पावसाने अक्षरश: धुतले आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेल्या पावसाच्या धुमाकुळानंतर जागोजागी पूर आल्याने शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. अनेक जिल्ह्यातील गावांचा संपर्क तुटला आहे. शेतकऱ्यांनी ओल्या दुष्काळाची मागणी करीत नुकसान भरपाईची मागणी केली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सर्वच मंत्र्यांना त्यांच्या जिल्ह्यात जाण्याच्या सूचना केल्याने सर्वच मंत्री आपापल्या जिल्ह्यात शेतकऱ्याच्या बांधावर गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सर्वश्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही विविध जिल्ह्यांचे दौरे केले.

धाराशिव येथे उपमुख्यमंत्री अजित पवार पाहणी दौऱ्यासाठी गेले असता, शेतकऱ्यांशी संवाद साधत असताना एका शेतकऱ्याने कर्जमाफीचा विषय काढला. त्यावेळी अजित पवार यांचा तोल सुटला आणि अजित पवार यांनी त्या शेतकऱ्यालाच फैलावर घेतले. कर्जमाफीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याकडे पाहात ते म्हणाले, ‘याला द्यारे मुख्यमंत्रिपद. आम्हाला कळतंय ना. आम्ही काय येथे गोट्या खेळायला आलोय. सकाळी सहला सुरु केलं भावा मी करमाळ्याला,’ असे रागानेच ते बोलले. ‘जो काम करतो ना त्याचीच मारा आम्हालाही काहीतरी कळते ना. आम्ही लाडक्या बहिणींना किती मदत केली. आज ४५ हजार कोटी वर्षाला मदत करतोय. शेतकऱ्यांची वीज माफी केली २० हजार कोटी भरतोय,’ असे त्यांनी या शेतकऱ्याला ऐकवले.

Ajit Pawar
Shiv Sena Dussehra Melava: दसरा मेळाव्यांतून नव्या वादाला फोडणी

शाब्दिक सहानुभूती नको

वास्तविक सर्वस्व उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याने एक आशा म्हणून राज्यकर्त्यांना मनातील इच्छा बोलून दाखवली तर, त्यालाच चुकीचे ठरविणे एखाद्या परिपक्व राजकारण्याला शोभत नाही. तेही राज्याचं तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या नेत्याला तर नाहीच नाही. असे असेल तर शेतकऱ्यांनी आपली गाऱ्हाणी कोणापुढे मांडायची, असा प्रश्न आहे. पण याचवेळी अजित पवार खरी गोष्ट सुद्धा बोलून गेले. ‘‘सगळी सोंग करता येतात. पण पैशाचे सोंग करता येत नाही,’’ असे सांगून अजित पवार यांनी राज्याची परिस्थिती सांगूत हतबलता व्यक्त केली.

वास्तविक सरकारने अद्याप शेतकऱ्यांना ठोस अशी मदत जाहीर केलेली नाही. केवळ सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. अशी शाब्दिक सहानुभूती मुख्यमंत्र्यांपासून उपमुख्यमंत्री ते अन्य मंत्री असे सरकारमधील सर्वच दाखवत आहेत. परंतु कोरड्या सहानुभूतीने पोट भरत नसते. याचीही कुठेतरी जाणीव ठेवावी लागणार आहे.

तर अहिल्यानगरच्या लोणी येथील एका कार्यक्रमात केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील आणि लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी अजित पवार यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांना पंचनामे पाहून योग्य नुकसानभरपाई देण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आता पंचनाम्यापर्यंत शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे.

पक्षानेही आता शोध घ्यावा

बारामती बाजार समितीच्या सभेत पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा रूद्रावतार पाहायला मिळाला. पेट्रोल पंपाच्या उधारीच्या मुद्द्यांवरून व्यवस्थापकावर अजित पवार चांगलेच भडकले. ‘मार्केट कमिटी काय तुझ्या बापाची आहे,’ असा सवाल करीत ‘तुला तुरुंगात टाकेन,’ असा दमही अजित पवार यांनी संबंधित व्यवस्थापकाला दिला.

वास्तविक पवार यांचा स्वभाव हा स्पष्ट बोलण्याचा आहे. आर्थिक बेशिस्त त्यांना खपत नाही. मात्र त्यांचे असे व्हिडीओ समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्या बदनामीचा कुणाचा इरादा तर नसेल ना? याचा त्यांच्या पक्षाने शोध घ्यावा. कारण प्रत्येक वेळेस शेतकऱ्यांना, अधिकाऱ्यांना, सामान्य नागरिकांना झापणे फायद्याचे ठरेलच असे नाही. त्याने नकारात्मक प्रसिद्धी सुद्धा होत असते. याचे भान मात्र ठेवावे लागणार आहे.

राज्याला आता स्थानिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे वेध लागले आहेत. आणि माध्यमांचे जगही विस्तारले आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व विशेषतः अजित पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनीही अशा वक्तव्याना आळा घालायला हवा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com