Ajit Pawar strategy : अजितदादांची रणनीती ठरली; स्थानिकच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना दिला 'हा' कानमंत्र

Maharashtra local elections News : स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची कानउघाडणी करतानाच येत्याकाळात होत असलेल्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा वर्धापनदिन सोहळा पुण्यात पार पडला. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह दिगग्ज नेतेमंडळीने हजेरी लावली. आगमी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजितदादांनी वर्धापनदिन सोहळ्याप्रसंगी राष्ट्रवादीच्या नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची कानउघाडणी करतानाच येत्याकाळात होत असलेल्या निवडणुकीसाठी कानमंत्र दिला. त्यामुळे या अजितदादांनी दिलेल्या कानमंत्राची अंमलबजावणी कितपत केली जाणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. या निवडणुकीसाठी लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे महायुती ही निवडणूक एकत्रित की स्वबळावर लढणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. त्यामुळे भाजप काय निर्णय घेणार यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.

Ajit Pawar
Shivsena UBT Politics: स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्यांविरोधात शिवसेना ठाकरे पक्ष आक्रमक, दिला ‘हा’ इशारा!

पुण्यात पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापनदिन कार्यक्रमात अजितदादांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कानउघाडणी केली. येत्या तीन ते चार महिन्यात स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक होणार आहेत. त्यामुळे त्याची तयारी आतापासूनच सुरू केली पाहिजे. त्यासाठी अंग झटकून काम करण्यास सुरुवात करा, काम करीत असताना कोणतेही कारण सांगू नका. महायुती सरकारने केलेले काम व योजना सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहचविण्याचे काम करा. महायुतीबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाणार आहे. त्यामुळे सर्वच तयारी ठेवली पाहिजे, अशा सूचना देखील नेत्यांना केल्या आहेत.

Ajit Pawar
Raj-Uddhav Thackeray : राज - उद्धव एकत्र येणार ही जर तरची गोष्ट... तरीही भाजप-शिवसेनेने का घेतला धसका?

राष्ट्रवादी काँग्रेसची ध्येय व धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोचविल्या पाहिजेत. सर्वसामान्य जनतेसोबत जोडली गेलीली नाळ तुटू देऊ नका, त्यांच्याशी कायम संपर्क ठेवा, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. पक्ष संघटन मजबूत करण्यावर आणि स्थानिक पातळीवर जनसंपर्क वाढवण्यावर भर द्यावा. निवडणुकीत यश मिळवण्यासाठी केवळ नेतेगिरी नाही, तर प्रत्येक कार्यकर्त्याचे योगदान महत्त्वाचे आहे. प्रत्येकानी घराघरात पोहोचले पाहिजे, जनतेच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि स्थानिक प्रश्नांवर काम करण्याच्या सूचनाही त्यांनी यानिमित्ताने कार्यकर्त्यांना केल्या आहेत.

Ajit Pawar
BJP Politics: महापालिकेची प्रभागरचना भाजपच्या पथ्यावर? विरोधक झाले सावध!

आगामी महापालिका, नगर परिषद आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ही रणनीती आखण्यात आली आहे. अजितदादांचा भर हा स्थिर संघटन, सक्रिय कार्यकर्ते आणि सकारात्मक प्रचार यावर असून, त्यांनी प्रत्येक विभागात शक्ती मोजणीसाठी स्वतंत्र समन्वयक नेमण्याचे निर्देशही दिले आहेत. त्यासोबतच आगामी काळ हा निवडणुकीचा काळ असल्याने प्रत्येकानी अंग झटकून काम करण्याच्या सूचना अजित पवार (Ajit Pawar) यांनी केल्या आहेत.

Ajit Pawar
NCP Reunion: एकत्र येण्याच्या चर्चेचा दोन्ही ‘राष्ट्रवादीं’ना फायदा?

अजित पवार यांनी वर्धापनदिन सोहळ्याच्या माध्यमातून उपस्थित कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत दिले आहेत. पक्ष संघटन आणि आगामी निवडणुकीची दिशा स्पष्ट करण्यासाठी कार्यकर्त्यांना मैदानात उतरून 'जनतेच्या मनात घर करण्याचा' त्यांनी कानमंत्र दिला आहे. त्यामुळे हा अजितदादांनी दिलेला कानमंत्र कार्यकर्त्यांच्या कितपत पचनी पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

Ajit Pawar
Ajit Pawar : ‘’अरे पैसे सोडत नाही.., काय माझ्या खिशात पैसे घेवून बसलोय’’ ; अजित पवार स्पष्टच बोलले!

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com