Assembly Election: तीन राज्यांतील विजयामुळे महायुतीला बूस्टर; तर फुटलेल्या पक्षांसाठी धोक्याचा इशारा ?

Political News : पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत प्राप्त करीत वर्चस्व प्राप्त केल्याने राज्यातील महायुतीमध्ये उत्साह संचारला आहे.
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar Sarkarnama
Published on
Updated on

2023 Assembly Elections Results in Marathi : मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा या चार राज्यांतील निवडणुकीचे निकाल रविवारी लागले. त्यामध्ये तीन राज्यांत भाजपने तर एक राज्यात काँग्रेसने बाजी मारली. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने बहुमत प्राप्त करीत वर्चस्व प्राप्त केल्याने राज्यातील महायुतीमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपसोबतच त्यांच्यासॊबत आलेल्या शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाला या निवडणुकीमुळे बळ मिळाले आहे. त्यामुळे येत्या काळात राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका मार्गी लागतील, असे वाटत असले तरी या निवडणुका फुटलेल्या पक्षांसाठी सोप्या नाहीत.

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या निवडणुकीत मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत काँग्रेस व भाजपमध्ये सरळ लढत झाली तर तेलंगणामध्ये काँग्रेस, भाजप व भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) थेट लढत झाली. यामध्ये मध्य प्रदेश राजस्थान, छत्तीसगड या तीन राज्यांत भाजपने तर तेलंगणा राज्यात काँग्रेसने बाजी मारली. या विजयामुळे राज्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण आहे. येत्या निवडणुकीपर्यंत हे वातावरण टिकवून ठेवत लोकसभेसह विधानसभा निवडणुकीत विजय मिळवण्याचा प्रयत्न केला जाईल.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Madhya Pradesh & Rajasthan Assembly Election Live Results : राजस्थान-मध्य प्रदेशात भाजपचं निर्विवाद वर्चस्व; काँग्रेसला चिंतनाची गरज!

शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून दोन गट वेगळे झाल्यापासून राज्यात कसल्याच निवडणुका झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील जनतेचा कल अजून समजलेला नाही. मात्र, महायुतीच्या बाबतीत एक दिलासादायक चित्र म्हणजे मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे सरकार पाडून काँग्रेसमधील जोतिरादित्य शिंदे गट भाजपसॊबत आणला होता. त्या ठिकाणी 25 आमदारांनी राजीनामा दिला होता. ते आमदार पुन्हा निवडून आले होते. या फोडाफोडीमुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर टीका झाली होती. काँग्रेसचे सरकार पडल्याने भाजपबाबत जनतेत नाराजी असल्याचे चित्र होते. मात्र, निकालातून ही ही नाराजी दिसली नाही. उलटपक्षी काठावर बहुमत मिळवणाऱ्या भाजपला निर्विवाद बहुमत मिळवता आल्याने महाराष्ट्रातील भाजपने केलेल्या फोडाफोडीला राज्यातील जनता पाठिंबा देईल, अशी आशा असल्याने भाजपसहित शिवसेना शिंदे गट व अजित पवार गटाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

फुटलेल्या पक्षांसाठी धोक्याची घंटा

भाजपने शिवसेना व राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून शिंदे गट व अजित पवार (Ajit Pawar) गटाला सोबत घेतले. त्यानंतर राज्यातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार पाडून भाजपने महायुतीचे सरकार स्थापन करणे काहीसे जनतेच्या पचनी पडलेले नाही. महाराष्ट्रातील जनता उच्चशिक्षित व सुजाण असल्याने ते अशा स्वरूपाच्या फुटीला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. हे सर्व प्रकरण गेल्या दीड वर्षापासून कोर्टात सुरू असल्याने जनतेत याबाबत नाराजी आहे. त्यामुळेच मागील काही दिवसांपासून महायुती सरकार कुठल्याच निवडणुकीला सामोरे जात नाही. दुसरे म्हणजे महाराष्ट्राचा इतिहास पाहता येथील जनता फुटीर गटाला सहकार्य करीत नाही, हा इतिहास आहे. त्याशिवाय शिवसेना सॊडून गेलेला पुन्हा निवडून येत नाही. त्यामुळे राज्यात असे घडणार असेल तर येत्या काळात हॊणाऱ्या निवडणुका फुटलेल्या पक्षांसाठी धोक्याची घंटा ठरणार आहेत.

देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी केला होता प्रचार

या पाच राज्यातील निवडणुकीसाठी स्टार प्रचारक म्हणून भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रचार केला होता. ते प्रचाराला गेल्यानंतर राज्यातील विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली होती. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

भाजपकडून विजयानंतर जल्लोष

राज्यातील भाजपच्या कार्यकर्त्यांनी तीन राज्यांत मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र जल्लोष करीत स्वागत केले आहे. काही ठिकाणी पेढे वाटून तर काही ठिकाणी कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला. या निकालामुळे काहीसी मरगळ आलेल्या भाजप कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. त्याचा फायदा आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीत होणार आहे.

Eaknath Shinde, Devendra Fadanvis, Ajit pawar
Devendra Fadanvis Statement: शासनाची पाठराखण करताना फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com