Kolhapur BJP : समरजीत घाटगेंना भाजपकडून ऑफर? धनंजय महाडिकांनी वस्तुस्थिती सांगत दिले संकेत

Dhananjay Mahadik On Samarjit Ghatge :Kolhapur News, 21 August : भाजप नेते समरजीत घाटगे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात होणाऱ्या प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपवर असलेली पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
Samarjit Ghatge, Dhananjay Mahadik
Samarjit Ghatge, Dhananjay MahadikSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News, 21 August : भाजप नेते समरजीत घाटगे यांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटात होणाऱ्या प्रवेशाबाबत चर्चा सुरु आहे. त्यामुळे भाजपवर असलेली पदाधिकाऱ्यांची नाराजी दिसून येत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा धक्का मानला जात आहे.

समरजीत घाटगे यांच्या नाराजीवर राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी वस्तुस्थिती सांगत भविष्यातील घडामोडीचे संकेत दिले आहेत. घाटगे यांची भूमिका रास्त असून भविष्यात अनेक घडामोडी घडणार असतील त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेऊ नये, अशी विनंती करणार असल्याचे महाडिक यांनी सांगितले. ते कोल्हापूरात बोलत होते.

महाडिक म्हणाले, "समरजित घाटगे हे जिल्ह्यातील भाजपचे (BJP) प्रमुख नेते आहेत. कागल विधानसभा मतदारसंघात त्यांचे काम आणि कष्ट आहे. त्यामुळे त्यांची भूमिका रास्त आहे. पण राष्ट्रवादी युतीत आल्याने त्यांची अडचण झाली आहे. म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असावा."

Samarjit Ghatge, Dhananjay Mahadik
Badlapur News : अक्षय शिंदेऐवजी अकबर खान, शेख असता तर..., बदलापूर प्रकरणावरून अंधारेंचा नितेश राणेंवर हल्लाबोल

मला समजल्यानंतर मी त्यांच्याशी फोनवर बोललो. आज संध्याकाळी प्रत्येक्षात भेटणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांनी काही गोष्टी मला सांगितल्या त्या संदर्भात मी चर्चा करणार आहे.

Samarjit Ghatge, Dhananjay Mahadik
Dhairyasheel Mohite Patil : सांगोल्यातून अनिकेत की बाबासाहेब देशमुख? धैर्यशील मोहिते-पाटलांच्या विधानानं चर्चांना उधाण

त्यांनी तात्काळ निर्णय घेऊ नये, वरिष्ठांशी चर्चा करूनच निर्णय घ्यावा, अशी विनंती करणार असल्याचंही महाडिक यांनी सांगितलं. तसंच जिल्ह्यात अपक्ष आणि मित्रपक्षांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. प्रत्येक मतदार संघावार दवा केला जातं आहे. मात्र, या सर्व गोष्टीवर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री निर्णय घेतील असंही महाडिक यांनी स्पष्ट केलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com