
बेळगाव : भारतीय जनता पक्षाकडून (BJP) उमेदवारी न मिळाल्याचे दुःख आहे. मात्र, उमेदवारी डावलण्यात आल्याच्या कारणाखाली पक्षाचा राजीनामा देणार नाही. उलट पक्षाने घोषित केलेल्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. भाजपचे बेळगाव (Belguam) उत्तरचे उमेदवार रवि पाटील यांच्या विजयासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी सांगितले. (Bharatiya Janata Party will not quit : MLA Anil Benke)
भाजप कार्यालयात आज (ता. १७ एप्रिल) झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मी कोणत्या समाजावर अन्याय केला नाही. जात, वर्ण, पंथ पलिकडे जाऊन विकास घडविला. मात्र, पक्षश्रेष्ठींनी या निवडणुकीमध्ये पाटील यांना जाहीर केली आहे. यामुळे डॉ. पाटील यांच्या पाठीशी ताकद उभी केली जाईल. भाजपच्या विजयासाठी प्रयत्नशिल असल्याचे बेनके यांनी सांगितले.
गेल्या चार दिवसांपासून मी पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. त्यात तथ्य नाही. पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. बेळगाव उत्तरला भाजपने अनेकदा तगडे उमेदवार दिले आहेत. कोणालाही ‘कमळ’ फुलविणे शक्य झाले नाही. मी ते करून दाखविले. तरीही यंदा उमेदवारी डावलण्यात आली आहे. त्याचे शल्य आहे. मात्र, पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता असल्याने भाजपसोबत असणार आहे, असे बेनके यांनी सांगितले आहे.
भाजप नेते बी. एल. संतोष यांनी लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्याची ग्वाही दिली आहे का? त्यावर बेनके यांनी उमेदवारी हुकल्यानंतर वरिष्ठांची भेट घेतली. विविध विषयांवर चर्चा केली आहे, असे सांगितले.
गिरीश महाजन बेळगावचे निवडणूक प्रभारी
भाजप राज्य प्रवक्ते ऍड. एम. बी. जिरली यांनी युद्धामध्ये पक्षाला सोडून गेलेल्यांना जनता योग्य उत्तर देईल. महाराष्ट्रातील नेते, मंत्री गिरीश महाजन हे निवडणूक प्रभारी म्हणून बेळगावला आले आहेत. महानगर अध्यक्ष अनिल बेनके व वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवू. पक्षाला सत्ता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करू. कर्नाटक आणि बेळगाव जिल्ह्यासाठी स्वतंत्र जाहीरनाना जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
आमदार अभय पाटील यांनी कार्यकर्ते व मतदारांच्या पाठबळावर बेळगाव उत्तर, बेळगाव दक्षिणसह बेळगाव ग्रामीणमध्ये पक्षाला यश मिळेल, असा दावा केला. निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, खासदार मंगल अंगडी आणि भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.