Mumbai News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका डोळयांसमोर ठेवून सर्वच पक्षाकडून प्लनिंग केलं जात आहे. विशेषता महायुतीमधील भाजपने यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. गेली काही दिवसापासून भाजपकडे इनकमिंग मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळे काही ठिकाणी तर विरोधकच शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे भाजपने केलेले प्लॅनिंग महत्वपूर्ण मानले जात आहे. त्यातच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि 'संकटमोचक' म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनी दिलेला सल्ला पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. राजकारणात, विशेषतः निवडणुकीनंतरच्या काळात, पक्षातील नेत्यांनी दिलेला सल्ला 'कडू औषधा'सारखा वाटू शकतो, कारण तो थेट कमतरतांवर बोट ठेवणारा आहे. त्यामुळे हा सल्ला पचनी पडणार का ? याची उत्सुकता लागली आहे.
भाजपमध्ये (BJP) सातत्याने इनकमिंग सुरु आहे. अनेक नेते पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. या पक्ष प्रवेशावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करू नका, असा सल्ला महाजन यांनी कार्यकर्त्यांना दिला. जळगाव जिल्हयातील जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी मंत्री महाजनांनी (Girish Mahajanq) जळगावच्या जामनेरमध्ये पक्षाच्या जिल्हा कार्यशाळेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. विरोधकांची तोंडं बंद करा, त्यांना पक्षात घ्या, कुणाच्याही पक्ष प्रवेशाला विरोध करु नका, असा सल्ला यावेळी महाजन यांनी दिला. गिरीष महाजन हे भाजपचे बड नेते समजले जातात. ते भाजपचे संकटमोचक म्हणून देखील ओळखले जातात. त्यांच्या माध्यमातून अनेक नेत्यांनी यापूर्वी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, अशातच आज त्यांनी विरोधकांना आपलेसे करुन घ्यावे, असे सल्ला दिला आहे. विरोधकांची तोडं बंद करा आणि त्या पक्षात घ्या असा सल्ला त्यांनी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात नेमका कोणाचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश होणार याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
सल्ल्याचा नेमका अर्थ:
महाजन यांनी दिलेला हा सल्ला जो ऐकायला किंवा स्वीकारायला सुरुवातीला कठीण वाटतो, पण तो पक्षासाठी आणि कार्यकर्त्यांसाठी भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. महाजन यांनी कदाचित निवडणुकीतील पराभवामागची कारणे, कार्यकर्त्यांमधील गटबाजी किंवा पक्षसंघटना बळकट करण्यासाठी आवश्यक असलेल्या कठोर बदलांवर भाष्य केले आहे.
अनेकदा नेतेमंडळीने वरून दिलेले आदेश किंवा सल्ले स्वीकारतात, पण स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना ते आवडत नाहीत. हा सल्ला वैयक्तिक अहंकार किंवा विशिष्ट गटांचे हितसंबंध यांना बाधा आणणारा असू शकतो, ज्यामुळे तो स्वीकारणे आव्हानात्मक ठरू शकते. त्यामुळेच महाजन यांनी दिलेला हा सल्ला पचनी पडणार का? याची उत्सुकता लागली आहे.
मंत्री महाजन यांनी दिलेला सल्ला पक्षाच्या हितासाठी असला तरी, तो स्वीकारण्याची तयारी कार्यकर्त्यांमध्ये आहे की नाही, हा खरा प्रश्न आहे. येत्या काळात, या सल्ल्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्यावर कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया येतात यावर बरेच काही अवलंबून आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.