विधान परिषदेची निवडणूक आघाडीसाठी सोपी तर भाजपची वाट बिकट!

भाजपचं संख्याबळ चार जागांचं अन् मैदानात उतरवले 6 उमेदवार
BJP Latest Marathi News, vidhan parishad election maharashtra 2022 News
BJP Latest Marathi News, vidhan parishad election maharashtra 2022 NewsSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीमुळं आता वातावरण तापलं आहे. प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, माजी मंत्री राम शिंदे, श्रीकांत भारतीय आणि उमा खापरे यांना विधान परिषदेची संधी देण्यात आली आहे. याचबरोबर भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष म्हणून माजी मंत्री सदाभाऊ खोत मैदानात उतरले आहेत. पण भाजपचं संख्याबळ पाहता केवळ चारच उमेदवार निवडून येऊ शकतात. त्यामुळं भाजपने केवळ पाच अतिरिक्त मतांच्या बळावर उतरवलेल्या दोन उमेदवारांच्या भवितव्याबाबत अनिश्चितता आहे. (Legislative Council Election News)

भाजपने (BJP) भाजपने प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, राम शिंदे, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांनी उमेदवारी दिली. याचबरोबर माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी अपक्ष म्हणून भाजपच्या पाठिंब्यावर अर्ज भरला आहे. विधान परिषदेवर निवडून यायचे असेल एका उमेदवारासाठी 27 मतांची आवश्यकता असेल. भाजप आणि मित्रपक्ष मिळून संख्याबळ 113 होत आहेत. त्यामुळे भाजपच्या चार जागा निवडून येऊ शकतात. (Vidhan parishad election maharashtra 2022 News)

चार उमेदवारांच्या कोट्यानंतर भाजपकडे केवळ 5 अतिरिक्त मते उरतील. त्यामुळे दोन उमेदवारांसाठी भाजपला 49 मतांची आवश्यकता भासेल. एवढी मते मिळणे शक्य नसल्याचे सध्या तरी दिसत आहे. त्यामुळे भाजपकडून ऐनवेळी एखादा उमेदवार मागे घेतला जाईल आणि एका उमेदवारासाठी मतांची जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न होईल. परंतु, यासाठीही भाजपच्या नाकीनऊ येण्याची चिन्हे आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

BJP Latest Marathi News, vidhan parishad election maharashtra 2022 News
काँग्रेसचं अखेर ठरलं! भाई जगताप अन् हंडोरेंना विधान परिषदेची लॉटरी

याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे 53, शिवसेना 56 आणि कॉंग्रेसचे 44 आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवेसेनेचे प्रत्येकी दोन उमेदवार आरामात निवडून येऊ शकतात. त्यांची उरलेली मते आणि अपक्षांचा आधार घेऊन काँग्रेसेचही दोन उमेदवार जिंकू शकतात. शिवसेनेने सचिन अहिर आणि आमशा पाडवा यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीने एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर यांना तर काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना मैदानात उतरवले आहे. विधान परिषदेसाठी 20 जूनला निवडणूक होणार आहे.

BJP Latest Marathi News, vidhan parishad election maharashtra 2022 News
देशमुख, मलिकांनी मतदान न केल्यास काय घडणार? थोरातांनी सांगितलं राजकीय समीकरण

परिषदेसाठी 9 जून अर्ज भरण्याची अखेरची तारीख असल्याने आज यादी जाहीर करण्यात आली आहे. 10 जूनच्या राज्यसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9 ऐवजी 8 जून रोजीच नावे निश्चित होवून अर्ज भरले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह सुभाष देसाई, दिवाकर रावते (शिवसेना), प्रवीण दरेकर, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, विनायक मेटे, सुजितसिंह ठाकूर, आर. एस. सिंह (सर्व भाजप), संजय दौंड (राष्ट्रवादी) हे दहा सदस्य निवृत्त होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com