Hingoli News: हिंगोलीत स्वबळानं भाजपचा घात, नगराध्यक्षपदाचे तीनही उमेदवार पराभूत; मित्रपक्षांचा मात्र बोलबाला

BJP Politics: हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुपडासाफ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची हिंगोली येथे सभा होऊनही हा निकाल आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये 84 पैकी भाजपचे केवळ 11 नगरसेवक निवडून आले आहेत.
Hingoli shivsena bjp ncp .jpg
Hingoli shivsena bjp ncp .jpgSarkarnama
Published on
Updated on

BJP News : हिंगोली जिल्ह्यात स्वबळाची भाषा करत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या भाजपला तोंडघशी पडावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेऊनही मतदारांनी भाजपला नाकारले. दुसरीकडे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मात्र जिल्ह्यात सरशी झाल्याचे पाहायला मिळाले. शिवसेना आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने हिंगोली, कळमनुरीत नगराध्यक्षपद जिंकत सदस्यपदाच्या सर्वाधिक जागा पटकावल्या.

तर वसमतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक 16 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे प्रशासकराज येण्यापूर्वी हिंगोली नगरपालिकेत भाजपची सत्ता होती. मात्र, राज्यात युतीत असूनही शिवसेनेने येथे स्वतंत्र निवडणूक लढवून भाजपला पराभूत केले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील नगर परिषदांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा सुपडा साफ झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची हिंगोली येथे सभा होऊनही हा निकाल आल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. तिन्ही नगर परिषदांमध्ये 84 पैकी भाजपचे केवळ 11 नगरसेवक निवडून आले आहेत.

हिंगोली 5, कळमनुरी नगरपरिषदेत 2 तर वसमतमध्ये केवळ चार जांगावर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. तिन्ही शहरात मतदारांनी सपशेल नाकारल्याने सत्ताधारी भाजपच्या विरोधात जनतेत नाराजी असल्याचे दिसून आले आहे. नगर परिषदेची निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यामध्ये भाजप आघाडीवर होता. भाजपने सत्तेचा पुरेपूर उपयोग, फोडाफोडी करत या निवडणुकीत सर्व नीतीचा अवलंब केला. परंतु, निवडणुकीत यातील काहीच कामाले आल्याचे दिसत नाही.

Hingoli shivsena bjp ncp .jpg
Deolali Pravara Nagar Parishad Election Result : शिंदेंची डरकाळी हवेतच विरली; भाजपच्या चालीसमोर शिवसेना देवळाली प्रवरेत चारीमुंड्या चित झाली!

विशेषत: हिंगोली नगर पालिकेची निवडणूक भाजप आमदार तानाजी मुटकुळे यांनी प्रतिष्ठेची केली होती. त्यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभाही घेतली. परंतु तेथे भाजपचा मोठा पराभव झाला. कळमनुरी नगरपालिकेत देखील भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले. या ठिकाणीदेखील शिवसेनेने मोठा विजय मिळवला. तर, वसमत नगरपालिकेतही भाजपचा धुव्वा उडाला. नगराध्यक्ष पदाचे तिन्ही उमेदवार पडल्याने भाजपने केलेली स्वबळाची भाषा ही त्यांच्याच अंगलट आल्याची चर्चा आता होऊ लागली आहे.

मुद्दे नाही, गुद्द्यांची भाषा..

निवडणूक प्रचारात भाजपचे आमदार तान्हाजी मुटकुळे, शिवसेनेचे संतोष बांगर यांच्यातील आरोप-प्रत्यारोप आणि वैयक्तिक टाका राज्यभरात गाजली होती. राज्याच्या सत्तेत मित्रपक्ष म्हणून असलेल्या या दोन्ही आमदारांनी अक्षरशः एकमेकांचे वस्त्रहरण केले होते. मटका, जुगार, अवैध गुटखा, वाळुमाफिया, हिंगोलीची बदनामी असे आरोप मुटकुळे यांनी आमदार बांगर यांच्यावर केले होते.

Hingoli shivsena bjp ncp .jpg
Beed Municipal Council News: बीडच्या अंबाजोगाईत आमदारांचे सासरे विजयी; धारुर, परळीत घड्याळाचा गजर, तर गेवराईत कमळ फुलले

तर तुमची व्हिडिओ क्लीप बाहेर काढली तर लोक जोड्याने मारतील, तुम्हाला फाशी घ्यावी लागेल, असा पलटवार संतोष बांगर यांनी करत भाजपला डिवचले होते. विकासकामे हा हिंगोली जिल्ह्यातील निवडणुक प्रचाराचा मुद्दाच नव्हता. पण या कुरघोडीच्या राजकारणाचा फटका भाजपलाच बसल्याचे दिसून आले आहे.

दृष्टिक्षेपात जिल्हा

नगराध्यक्षपद - शिवसेना 2

राष्ट्रवादी काँग्रेस 1

नगरसेवकांची पदे - 84

राष्ट्रवादी काँग्रेस- 30

भाजप- 11

शिवसेना- 32

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष -2

काँग्रेस - 7

अपक्ष - 2

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com