Palghar Politics: राजेंद्र गावितांचं टेन्शन वाढलं? पालघर जिल्ह्यात खाते उघडण्यासाठी भाजपची मोर्चेबांधणी

BJP News: पालघर जिल्ह्यात पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी भाजपने पाऊलं उचलण्यास सुरवात केली
BJP
BJP Sarkarnama

Palghar: आगामी लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवरच भाजपनेही तयारी सुरू केली असून राज्यातील लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रमुखपदाच्या नियुक्त्या काही दिवसांपूर्वी केल्या आहेत. तर पालघर जिल्ह्यातही पक्षाच्या मोर्चे बांधणीसाठी भाजपने पाऊलं उचलण्यास सुरवात केली आहे.

पालघर जिल्ह्यातील सहा विधानसभा क्षेत्रातील तीन ठिकाणी बहुजन विकास आघाडी तर इतर जागी राष्ट्रवादी काँग्रेस, माकप व शिंदे गटाचे आमदार आहेत. खासदार सुद्धा शिंदे गटाकडे असल्याने जिल्ह्यामध्ये भाजपाची पाटी कोरी आहे. पण 2024 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विधानसभानिहाय पदाधिकाऱ्यांची निवड केल्याने पालघर जिल्ह्यात यावेळेस तरी खाते उघडण्याचा चंग भाजपने बांधल्याचे यावरून दिसत आहे.

BJP
Rohit Pawar: रोहित पवार झाले आता खऱ्या अर्थाने कर्जतकर; गृहप्रवेशही झाला...

भाजपच्या पालघर लोकसभा निवडणूक प्रमुखपदी माजी जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, विक्रमगड विधानसभा निवडणूक प्रमुखपदी डॉ.हेमंत सवरा, संतोष जनाठे पालघर, विलास तरे बोईसर आणि अमित घोडा यांची डहाणू विधानसभा निवडणूक प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या आजवर लोकसभा प्रभारी अशा पदावर नियुक्त्या केल्या जात होत्या. पण पहिल्यांदाच जिल्ह्यातील सर्व विधानसभा निहाय निवडणूक प्रमुख हे पद निर्माण करून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्याही केल्याने जिल्ह्यातील कोरीपाटी पुसण्याची तयारी भाजपकडून करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.

BJP
Sharad Pawar News : तामिळनाडूचे ऊर्जामंत्री बालाजी यांच्या कार्यालयावर ईडीची छापेमारी, शरद पवारांचं सूचक ट्विट, म्हणाले...

पालघर लोकसभा आणि सहा विधानसभा क्षेत्रावर भाजपने लक्ष केंद्रित केले आहे. जिल्ह्यातील गावपाड्यात केंद्र सरकारच्या नऊ वर्षाच्या कामगिरीची पुस्तिका घरपोच देऊन मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे.

तर इतर पक्ष अजूनही निद्रिस्त अवस्थेत असून त्यांच्याकडून कुठल्याच प्रकारची हालचाल होताना दिसत नाही. काही आमदार आपली दररोजची कार्यक्रम पत्रिका प्रसार माध्यमांवर टाकून आपण किती जनतेसाठी एकनिष्ठ आहोत हे दाखविण्याचा त्यांचा केविलवाना प्रयोग दररोज करताना दिसत आहेत.

बऱ्याच आमदारांच्या मतदारसंघातील जनता त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याने भाजपाने आपले पदाधिकारी निवड घोषित करून जिल्ह्यातील जास्तीत जास्त विधानसभा व एक मात्र लोकसभेची जागा जिंकण्यासाठी कंबर कसली असून त्यामध्ये त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसत आहे.

भाजपकडून खासदारकी लढवलेले राजेंद्र गावित 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेने साठी पालघरची जागा सोडल्याने त्यांनी शिवसेनेमध्ये उडी घेतली होती. त्यानंतर शिंदे गटात त्यांनी तिहेरी उडी मारल्याने 2024 च्या लोकसभेच्या निवडणुकीत ही जागा भाजपने मागितल्यास ते काय भूमिका घेणार? असा प्रश्न पालघरमध्ये चर्चेत आहे.

BJP
Ahmednagar Politics : नगरमध्ये राष्ट्रवादीला फुटीचे ग्रहण; दुसऱ्यांदा धक्का...राजकारण तापलं

बोईसर विधानसभेचे माजी आमदार विलास तरे यांनी वर्षभरापूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने तेही खासदारकीच्या रिंगणात असल्याने पालघर लोकसभेसाठी इथून तिथे उड्या मांरणारे विद्यमान खासदार गावित की दोन वेळा बोईसर विधानसभेची आमदारकी भूषवलेले विलास तरे त्यांच्यापैकी कोणाची वर्णी लागणार? याबाबत चर्चा सुरू झाली असून विलास तरे यांच्या बाजूने भाजपातील पदाधिकाऱ्यांचा कल असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, लोकसभा विधानसभा क्षेत्रामध्ये नियुक्त्या झाल्या असल्या तरी अनेक दिवसांपासून पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष पद रिकामीच राहिले आहे. नव्याने भाजपात आलेल्या लोकांबद्दल ज्येष्ठ व्यक्तींमध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असून नवीन लोकांना पद देण्यापेक्षा ज्यांनी पक्ष वाढवण्यासाठी वर्षानुवर्ष मेहनत घेतली आहे, त्यांना पद देण्यात यावे, असा सूर भाजपाच्या कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com