Andhra Pradesh Lok Sabha Exit Poll : 'आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडुंची सत्तावापसी'?

Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy : आंध्र प्रदेशात मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींचा पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज काही एक्झिट पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे, तर काही संस्थांनी भाजप, तेलुगू देसम पार्टी आणि जनसेना पक्ष या आघाडीला बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे.
Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy
Chandrababu Naidu Vs Jagan Mohan ReddySarkarnama

Lok Sabha Election 2024 Exit Poll : लोकसभा निवडणुकीबरोबरच आंध्र प्रदेश, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा येथे विधानसभेची निवडणूक झाली. 175 जागा असलेल्या आंध्र प्रदेशात भाजप, तेलुगू देसम पार्टी आणि जनसेना पक्षाला बहुमत मिळेल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे.

तर काही एक्झिट पोलमध्ये मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांचा वायएसआऱ काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशात 2 जून रोजी मतमोजणी होणार आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशची मतमोजणी 4 जून रोजी होईल.

सेंटर फॉर पॉलिटिक्स अँड पॉलिसी स्टडीज या संस्थेने केलेल्या एक्झिट पोलमध्ये जगनमोहन रेड्डी(Jagan Mohan Reddy) यांच्या पक्षाचे सरकार पुन्हा येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. वायएसआर काँग्रेसला 95 ते 105 आणि तेलुगू देसम पार्टी, जनसेना आणि भाजप आघाडीला 75 ते 85 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आत्मा साक्षी या संस्थेनीही जगनमोहन रेड्डी यांच्या पक्षाला 98 ते 116 जागा मिळतील, असा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार वायएसआऱ काँग्रेसला 45 ते 60 जागा मिळतील. तेलुगू देसम पार्टी आणि भाजप आघाडीला 111 ते 135 जागा मिळू शकतात, तर काँग्रेसचे खातेही उघडणार नाही, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्याचे मतदान एक जून रोजी पार पडले. त्यानंतर एक्झिट पोल आले. टीव्ही5 च्या एक्झिट पोलमध्येही सत्ताबदलाचे संकेत मिळाले आहेत. वायएसआऱ काँग्रेसला फक्त 14 जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. भाजप आणि तेलुगू देसम पक्षाला 161 जागा मिळणार असून काँग्रसेचे खाते उघडणार नाही, असा याही एक्झिट पोलचा अंदाज आहे.

Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy
PM Narendra Modi : ‘एक्झिट पोल’चे अंदाज येताच मोदींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, संधीसाधू 'इंडी' आघाडी..!

चंद्राबाबू नायडू आणि भाजपच्या आघाडीला मोठा फायदा होत असल्याचे दिसत आहे. केके सर्व्हेनुसार आघाडीला 161 आणि वायएसआर काँग्रेसला 13, नियोपोलनुसार आघाडीला 104 ते 110, वायएसर काँग्रेसला 65 ते 71, पायोनियरनुसार आघाडीला 144 तर वायएसआर काँग्रेसला 31 जागा मिळत आहेत.

अन्य संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलमध्येही भाजप आणि चंद्रबाबू नायडु(Chandrababu Naidu) यांना बहुमत मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सर्वच संस्थांनी काँग्रेसला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेसला 146 जागा मिळाल्या होत्या. तेलुगू देसम पक्षाला 18 तर जनसेना पक्षाला एक जागा मिळाली होती.

Chandrababu Naidu Vs Jagan Mohan Reddy
Sharad Pawar Vs Ajit Pawar : घड्याळाची टिकटिक बंद पाडण्यासाठी शरद पवारांनी तेल ओतलेली मशाल पेटणार?

मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची कसोटी लागणार -

ओडिशा विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री नवीन पटनायक(Naveen Patnaik) यांची कसोटी लागणार आहे. असे असले तरी सलग सहाव्यांदा निवडणूक जिंकणार, असा दावा बिजू जनता दलाकडून केला जात आहे. सत्ताबदल होईल असा दावा भाजपने केला आहे. ओडिशात विधानसभेच्या 147 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत बिजू जनता दलाला 108. भाजपला 22, काँग्रेसला 9 आणि सीपीएम, अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळाली होती.

32 जागा असलेल्या सिक्कीममध्ये प्रेमसिंह तमांग यांचे सरकार आहे. त्यांच्या क्रांतीकारी मोर्चा पक्षाने 19 आणि भाजपने 12 जागा जिंकल्या होत्या. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या 60 जागा आहेत. या दोन्ही राज्यांची मतमोजणी दोन जूनला होईल.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com