Devabhau challenge : देवाभाऊ'ला 'देवा तूच सांग'चं आव्हान, शरद पवारांच्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यात जाहिरातबाजीचं युद्ध पेटलं!

Sharad Pawar NCP vs BJP News : भाजपकडून सुरु असलेल्या देवाभाऊ' कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने 'देवा तूच सांग'ना या कॅम्पेनच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.
Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Devendra Fadnavis sarkarmnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची घोषणा दिवाळीनंतर होणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षाने निवडणुकीची तयारी जोरात सुरु केली आहे. निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडी निवडणुका स्वबळावर लढणार की एकत्रित निवडणुका लढणार याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. तर दुसरीकडे राज्यातील राजकारण गेल्या काही दिवसापासून भाजपकडून सुरु असलेल्या देवाभाऊ' कॅम्पेनला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने 'देवा तूच सांग'ना या कॅम्पेनच्या माध्यमातून टार्गेट करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्व घटना घडामोडीवरून येत्या काळात राज्यातील वातावरण चांगलेच तापणार आहे. त्यामुळे उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जाहिरातबाजीच्या माध्यमातून भाजप आणि शरद पवार यांच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एक नवीन युद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. भाजपने आपल्या प्रचारासाठी 'देवाभाऊ' ही संकल्पना वापरली, जी जनतेच्या समस्यांवर 'देवाभाऊ' कसा उपाय करेल, हे दर्शवते. याला उत्तर म्हणून, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 'देवा तूच सांग' ही जाहिरात आणली आहे. या जाहिरातीतून त्यांनी भाजपच्या आश्वासनांवर आणि सरकारच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Sharad Pawar Politics: उद्धव-राज ठाकरेंचे झाले, आता शरद पवार देणार भाजपाला आव्हान!

'देवा तूच सांग' या घोषणेद्वारे त्यांनी जनतेलाच प्रश्न विचारले आहेत, जणू काही सरकारची कामगिरी इतकी निराशाजनक आहे की आता 'देव'च यावर उत्तर देऊ शकतो. यामुळे दोन्ही पक्षांमध्ये जाहिरातबाजीची तीव्र स्पर्धा सुरू झाली असून, येत्या काळात ही लढाई अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. ही केवळ जाहिरात नसून, जनतेच्या मनात कोण अधिक विश्वासार्ह आहे, हे सिद्ध करण्याची दोन्ही पक्षांची धडपड आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Pahalgam attack : तुमच्या 'त्या' वेळच्या भावना खोट्या; पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या संतोष जगदाळेंच्या मुलीची प्रतिक्रिया

मनोज जरांगे यांच्या आंदोलनांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी हैदराबाद गॅझेट लागू केल्यानंतर भाजपकडून देवाभाऊ कॅम्पेन राज्यभर राबवले होते. काही वृत्तपत्राने राज्यभरात बॅनरच्या माध्यमातून केलेल्या जाहिरातीवरून टीका केली होती. अशातच देवा भाऊंच्या टीकाले आता 'देवा तूच सांग' च्या जाहिरातीने उत्तर देण्यात आल्याची चर्चा आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
NCP Sharad Pawar: छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचे नेते म्हणावे, ‘आमचा पराभव ईव्हीएम मुळेच’

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विविध दैनिकांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. या जाहिरातींमध्ये शेतकरी कर्जमाफी, शेतकरी आत्महत्या, पीक विमा कायदा, कांदा निर्यात बंदी, अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान, लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये, युवकांना नोकरी आणि असुरक्षित महिला यांसारख्या प्रश्नांवरून सरकारला प्रश्न विचारण्यात आले आहेत. “देवा तूच सांग” असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या प्रश्नांची उत्तरे कधी मिळणार, असा सवाल करण्यात आला आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
BJP MP Ujjwal Nikam legal notice : उज्ज्वल निकमांची नियुक्ती रद्द करा; असीम सरोदेंमार्फत लीगल नोटीस

त्यासोबतच या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी भव्य आक्रोश मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे. सोमवारी नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भव्य आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. विविध दैनिकांमध्ये या जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. हा मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढण्यात येत आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Shivsena News : शिंदेंची आगामी लोकसभेची तयारी सुरु; साडेतीन वर्षे आधीच 7 जणांकडे मोठी जबाबदारी

आमच्या पक्षाने दिलेली जाहिरात आहे. आम्ही स्वयंघोषित देवाला याबाबत बोलत नाही. आम्ही आमच्या देवाबाबत विठ्ठलाला साकडे घातले आहे. राज्यातील प्रत्येक तालुक्यातील आमदाराला सांगण्यात आलं होतं देवाभाऊ जाहिरात लावा. मात्र नाव कुठेच छापलं नव्हतं. आमची जाहिरात बघा आम्ही आमच नाव छापलं आहे. त्यांनी नाव छापलेले नाही. याचा अर्थ मेघा इंजिनियरिंग कंपनीने जाहिरात दिली का? कारण 190 कोटी रुपये त्यांचे माफ झाले आहेत.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
NCP Sharad Pawar: छगन भुजबळांच्या मतदारसंघात जाऊन राष्ट्रवादीचे नेते म्हणावे, ‘आमचा पराभव ईव्हीएम मुळेच’

कोकणात दादांच्या पक्षाच्या नेत्याने जाहिरात लावली आहे. भविष्यात ते त्यांच्या सोबत राहणार नाहीत. महिला आणि बालकल्याण खात्याचा संबंध असू शकतो. कारण दादांच्या पक्षाचे कोकणातील नेते यांची भाजपसोबत जास्त जवळीक झाली आहे. दादांचे पोस्टर कमी देवाभाऊचे पोस्टर त्यांनी जास्त लावले असल्याचा आरोपही रोहित पवार यांनी यानिमित्ताने केला आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
Congress Balasaheb Thorat : निळवंडे धरण अन् कालवे आपण पूर्ण केले, आता अनेक..; संगमनेरचे वातावरण बिघडवणाऱ्यांना थोरातांचा थेट इशारा

त्यामुळे येत्या काळात या दोन पक्षातील अंतर्गत वाद शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. देवाभाऊ'ला 'देवा तूच सांग'चं आव्हान देण्यात आल्यानंतर आता येत्या काळात भाजपकडून या टिकेला कशा प्रकारे उत्तर दिले जाणार याची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

Sharad Pawar, Devendra Fadnavis
BJP Politics : 'विरोधकांची तोंडं बंद करा; ते कसेही असले तरी...'; स्थानिकच्या निवडणुकीसाठी भाजपने दंड थोपटले, कार्यकर्त्यांना दिला महत्त्वाचा सल्ला

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com