Mahayuti Politics : महायुतीत नेमकं काय चाललंय? अजितदादांच्या मंत्र्याला भाजप प्रवेशाचे फडणवीसांचे अप्रत्यक्ष निमंत्रण

Anil Patil Will Join BJP? : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर महायुतीमधील विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे.
Anil Patil-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Anil Patil-Devendra Fadnavis-Ajit PawarSarkarnama

Mumbai, 30 June : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. ऊर्फ चंद्रकांत पाटील भेट घेतली. त्या भेटीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री सतीश पाटील यांनी ‘अजित पवारांना सोडून जाणारे पहिले आमदार अनिल पाटील असतील’ असा दवा केला आहे. त्यानंतर आज नागपूरमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी ‘अनिल पाटील भाजपमध्ये येत असतील तर चांगलंच आहे,’ असे विधान केले. त्यामुळे महायुतीमध्ये नेमकं काय सुरू आहे, अशी चर्चा रंगू लागली आहे.

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला सपाटून मार खावा लागल्यानंतर महायुतीमधील (Mahayuti) विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमधील (NCP) आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. त्यातूनच पश्चिम महाराष्ट्रातील काही आमदारांनी विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची भेट घेऊन चर्चा केल्याची माहिती आहे. येत्या काही दिवसांत ते आमदार पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी संबंधित आमदारांची जयंत पाटील यांच्याशी भेट झाल्याबद्दल दुजोरा दिला आहे. मात्र, ही भेट योगायोगाने झाली आहे, असा दावा केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार गटात काहीतरी घडामोडी घडत असल्याचे या घटनांवरून दिसत आहे.

राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील (Anil Patil) यांनी काही दिवसांपूर्वी गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. उर्फ चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याची चर्चा आहे, त्या भेटीनंतर अनिल पाटील हे भाजपमध्ये जाणार, अशी चर्चा सुरू झाली आहे.

Anil Patil-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Solapur Politics : विधानसभेपूर्वी भाजपपुढे आणखी एक कठीण पेपर; सोलापूर, बार्शी बाजार समितीची निवडणूक जाहीर होणार

जळगाव जिल्ह्यातील माजी मंत्री आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते सतीश पाटील यांनी ‘अजित पवारांना सोडून जाणारे पहिले नेते अनिल पाटील असतील’ असा दावा जळगावमधील एका कार्यक्रमात बोलताना केला, त्यामुळे अनिल पाटील यांच्या भाजपमध्ये जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.

एकीकडे अनिल पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्या चर्चा होत असताना आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मंत्री अनिल पाटील भाजपमध्ये आले तर चांगलंच आहे’ असे उत्तर देऊन त्यांनी मित्रपक्ष राष्ट्रवादीलाच सुरुंग लावण्याचे ठरविल्याचं दिसत आहे.

Anil Patil-Devendra Fadnavis-Ajit Pawar
Raosaheb Danve News : मनोज जरांगे विधानसभा निवडणूक लढणार? रावसाहेब दानवे म्हणाले, 'जनता पाठिंबा...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com