BJP Politics : वडील खासदार, आई आमदार आता लेकाच्या मंत्रिपदासाठी भाजपने दिली आमदारकीची कुर्बानी; 'या' नेत्यासमोर लोटांगण...

Devesh Kumar resignation, Deepak Prakash, Upendra Kushwaha, Bihar BJP : राज्यसभेत वडील, विधानसभेत आई, मंत्रिपदावर मुलगा आणि नव्या पदांसाठी सुनेचेही नाव चर्चेत; कुशवाह कुटुंबाच्या वाढत्या वर्चस्वामुळे भाजपच्या तत्त्वनिष्ठेवर प्रश्नचिन्ह.
BJP legal notice to Omar Abdullah
BJP legal notice to Omar AbdullahSarkarnama
Published on
Updated on

Bihar Political news : बिहारच्या राजकारणात सध्या राजकीय घडामोडींना उधाण आले आहे. राष्ट्रीय लोक मोर्चा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपेंद्र कुशवाह हे या घडामोडींच्या केंद्रस्थानी आहेत. मंत्रि‍पदावर असलेल्या आपल्या लेकासाठी त्यांनी मुख्यमंत्रिपद हातात असलेल्या भाजपलाही झुकविले आहे. त्यामुळे कुशवाह यांच्या राजकीय वर्चस्वाची चर्चा होऊ लागली आहे.

भाजपचे विधानपरिषदेचे आमदार देवेश कुमार यांनी नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या राजीनाम्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. देवेश कुमार हे भाजपचे ज्येष्ठ नेते असून राज्यपाल नियुक्त आमदार होते. त्यांचा कार्यकाळ आणखी वर्षभर आहे. मात्र, त्याआधीच त्यांनी राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे.

देवेश कुमार यांच्या राजीनाम्यामागे कुशवाह यांचे पुत्र दीपक प्रकाश हे आहेत. ते सध्या बिहार सरकारमध्ये पंचायती राज मंत्री आहेत. मात्र, सध्या ते कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. सुप्रीम कोर्टात हा मुद्दा गेल्यानंतर त्यांचे मंत्रिपद वाचविण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आणि भाजपने आपल्या आमदाराचा बळी दिल्याचा दावा केला जात आहे. देवेश कुमार यांच्या जागी आता दीपक प्रकाश यांची नियुक्ती होऊ शकते.

BJP legal notice to Omar Abdullah
Bribery case video : धक्कादायक : मंत्र्यांसमोरच मागितली 50 हजारांची लाच; जागेवरून काढले कारवाईचे फर्मान, काही तासांत बडतर्फ

घराणेशाहीचा कहर

उपेंद्र कुशवाह हे स्वत: राज्यसभेचे खासदार आहेत. तर त्यांच्या पत्नी स्नेहलता या विधानसभेच्या सदस्य आहेत. आता मंत्री असलेले पुत्र दीपक प्रकाशही राज्यपाल नियुक्त आमदार होती. दीपक यांच्या पत्नी साक्षी यांनाही बिहार राज्य नागरिक परिषदेमध्ये संधी मिळणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

कुटुंबातील सर्व सदस्यांना राजकारणात सेट करणाऱ्या कुशवाह यांच्यासमोर भाजपने लोटांगण का घातले, असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. घराणेशाहीला कडाडून विरोध करणाऱ्या भाजपकडून कुशवाह यांची घराणेशाहीला मात्र प्रोत्साहन दिले जात आहे. उपेंद्र कुशवाह हेही भाजपच्या कोट्यातूनच राज्यसभेवर गेले आहे. आता त्यांच्या लेकालाही आपल्या नेत्यांचा बळी देत भाजप आमदार करणार आहे.

BJP legal notice to Omar Abdullah
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

कुशवाह यांच्या पक्षाचा बिहारमधील काही मतदारसंघात दबदबा आहे. त्यामुळे भाजपकडून त्यांना दुखावले जात नसल्याची चर्चा आहे. त्यांच्या पक्षाचे केवळ चार आमदार असले तरी काही मतदारसंघामध्ये निर्णायक मतदान आहे. दरम्यान, कुशवाह यांच्या पक्षात मात्र त्यांच्याच कुटुंबात पदे मिळत असल्याने आमदार तसेच पदाधिकाऱ्यांनी काही महिन्यांपूर्वी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com