Dharashiv Politics : भूमची नगरपालिका जोरात अन् मिनी मंत्रालय मात्र कोमात

Dharashiv News : शहरातील कामे होत असली तरी ग्रामीण भागातील कामे रखडल्यामुळ शेतकऱ्यांच्याही अडचणी वाढल्या आहेत.
Dharashiv Politics :
Dharashiv Politics : Sarkarnama
Published on
Updated on

अब्बास सय्यद

Paranda- Bhum Political News : निवडणुका लांबल्यामुळे गेल्या २२ महिन्यांपासून भूम ( धाराशिव) नगर परिषद, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पाच गटांतील विकासकामे थंडावली आहेत. त्यातच पालिकेच्या प्रशासकांनी लक्ष घातल्यामुळे शहरातील कामे होत आहेत. पंचायत समितीचे प्रशासक मात्र सक्रिय नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. गोठ्यापासून शेततळ्यासह शेतरस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत.

जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समिती वगळता पालिकेच्या प्रभागांमध्ये कामे सुरू आहेत. प्रशासक तानाजी चव्हाण यांचे या कामांवर लक्ष असते. सत्ताधाऱ्यांनी सुरू केलेली कामे ते पूर्णत्वास नेत आहेत. पालिकेवर शिंदे गटाची सत्ता होती. शहराला पाणीपुरवठा, वीजपुवठा सुरळीत केला जात आहे. मात्र, मिनी मंत्रालय म्हणून पाहिल्या जाणाऱ्या पंचायत समितीचे प्रशासक मात्र कधी सुटीवर असतात, तर कधी प्रभारींवर कामाचा भार असतो. येथील गोठ्यापासून शेततळे आणि शेतरस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात रखडली आहेत. जी कामे झाली आहेत, त्यात मोठा भ्रष्टाचार झाल्याची चर्चा तालुक्यात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dharashiv Politics :
Manoj Jarange Patil Sabha : 'जरांगेंच्या सभेला हिंसक वळण देण्याचा डाव होता'; ठाकरे गटातील नेत्याचा गंभीर आरोप

निवडणुकांबाबत अनिश्चितता

पंचायत समितीसमोर विविध गावांतील नागरिकांचे मागण्यांसाठी उपोषण सुरू असते. पंचायत समितीवर शिंदे गटाचे पालकमंत्री तानाजी सावंत यांचे वर्चस्व होते. निवडणुका कधी होणार, याबाबत अनिश्चितता आहे. निवडणुका जाहीर झाल्या तर नगरपालिकेवर ज्या पक्षाची सत्ता येईल त्यानंतर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीची समीकरणे ठरणार आहेत. पालिका निवडणुकीत जो पक्ष विजयी होईल, त्या पक्षाची बाजू भक्कम राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.

मात्र, गेल्या दोन वर्षांत राजकारणात मोठा बदल झाला आहे. कोणता झेंडा हाती घ्यावा अशी अवस्था गावपुढाऱ्याची झाली आहे. राज्य पातळीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीचा परिणाम ग्रामीण भागात जाणवतो आहे. फोडाफोडीत भाजप राज्य पातळीवर यशस्वी ठरला असला तरी परंडा तालुक्यात भाजपचा म्हणावा तितका प्रभाव दिसत नाही. परंडा, भूम शहरात शिंदे गटाचा तर परंडा ग्रामीणमध्ये ठाकरे गटाचा प्रभाव आहे. त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसची तिथे मोठी ताकत आहे. या गटातटाच्या राजकारणामुळे सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे.

मुख्याधिकारी म्हणून आल्यानंतर भूम पालिकेच्या निवडणुका लांबल्या आणि येथे प्रशासक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. या काळात सत्ताधाऱ्यांनी जे काम केले आणि जे राहिलेले काम मी माझ्या काळात पूर्ण केले. काही कामे प्रगतिपथावर आहेत, असे प्रशासक तानाजी चव्हाण यांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Dharashiv Politics :
Shiv Sena Party Crisis : मोठी बातमी ! ठाकरेंना धक्क्यांवर धक्के; सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com