Shiv Sena Party Crisis : मोठी बातमी ! ठाकरेंना धक्क्यांवर धक्के; सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde : शिवसेना पक्षाबाबत आता सर्वोच्च न्यायालयात दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Delhi News: केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबतच्या दिलेल्या निर्णयाविरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 31 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती. मात्र, ही सुनावणी आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. शिवसेना पक्षाबाबत आता सर्वोच्च न्यायालयात दिवाळीनंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेतील फुटीनंतर एकनाथ शिंदेंनी खरी शिवसेना आपलीच आहे, असा दावा केला होता. त्यानंतर हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेलं होतं. निवडणूक आयोगाने दोन्ही बाजूंचा (ठाकरे आणि शिंदे) युक्तिवाद ऐकल्यानंतर शिवसेना नाव आणि पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय दिला होता. या निर्णयामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला होता.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
MLA Disqualification News : आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणात मोठी अपडेट; राहुल नार्वेकर घेणार 'ही' भूमिका ?

निवडणूक आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असून, 31 ऑक्टोबरला ही सुनावणी पार पडणारी होती; पण आता पुन्हा एकदा ही सुनावणी लांबणीवर पडली आहे. त्यामुळे पुढची सुनावणी किती तारखेला होती, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाबाबतच्या दिलेल्या निर्णयाविरोधातील दाखल याचिकेवर गेल्यावेळी होणारी सुनावणी पुढे ढकलली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात 31 ऑक्टोबरला सुनावणी अपेक्षित होती, पण ही सुनावणीही पुढे ढकलल्याने आता पुढची सुनावणी कधी होते, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Shiv Sena Party Crisis : मोठी बातमी ! ठाकरेंना झटका; सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com