Dhule Constituency 2024 : 'धुळ्यात भाजपचा प्रचारक ठरणार काँग्रेससाठी लाभदायक'

Loksabha Election 2024 : धुळे मतदासंघांत तयारी नसताना काँग्रेसला मिळतो आहे सामाजिक मतांचा पाठिंबा. तयारीनिशी प्रचारात उतरलेला भारतीय जनता पक्ष या सामन्यात पाहता पाहता काँग्रेस आणि भाजप यांच्यातील लढत चुरशीची बनली आहे.
BJP Congress
BJP Congress Sarkarnama

BJP Vs Congress News : धुळे मतदारसंघात काँग्रेस उमेदवाराची अवस्था अपुरी तयारी आणि बंडखोरीची डोकेदुखी अशी झाली आहे. दुसरीकडे सर्व तयारीनिशी प्रचारात उतरलेला भारतीय जनता पक्ष या सामन्यात पाहता पाहता काँग्रेस (Congress) आणि भाजप यांच्यातील लढत चुरशीची बनली आहे.

धुळे लोकसभा मतदारसंघात (Dhule Constituency) गेल्या तीन निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे. मतदारसंघातील सामाजिक विभागणीचा फायदा झाल्याने भाजप नशीबवान ठरला. मात्र यंदाची निवडणूक अगदीच वेगळी ठरते आहे.

ज्या मुद्द्यांवर भारतीय जनता पक्ष देशभरात निवडणूक जिंकण्याचे नियोजन करीत आहे. नेमके तेच मुद्दे धुळे मतदार संघात भाजपच्या उमेदवाराच्या मार्गातील अडथळे ठरतो आहे. त्यामुळे काँग्रेस नशीबवान आणि भाजप (BJP) परेशान अशी येथील स्थिती आहे.

सोमवारी माघारीची मुदत संपल्यानंतर धुळे मतदारसंघात 18 उमेदवार शिल्लक आहेत. मात्र महत्त्वाचे म्हणजे, वंचित बहुजन आघाडीचे अब्दुल रहमान यांचा अर्ज बाद झाला. परिणामी आता महायुती भाजपचे डॉ सुभाष भामरे आणि महाविकास आघाडी काँग्रेसच्या डॉ शोभा बच्छाव यांच्यात थेट सामना होत आहे.

गेल्या तीन निवडणुकांमध्ये असे पहिल्यांदाच घडले आहे. प्रत्येक निवडणुकीत सामान्यतः मालेगाव शहर आणि धुळे येथून अल्पसंख्यांक समाजातील एक उमेदवार काँग्रेसची वाट रोखण्यासाठी विरोधक म्हणून मैदानात असतो. यंदा त्याबाबत भाजपच्या बच्छाव नशीबवान ठरल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

BJP Congress
Bhivandi Lok Sabha 2024 News : आजारपणानंतर शरद पवार पुन्हा मैदानात; आता कल्याण, भिवंडीकडे मोर्चा

धुळे मतदारसंघात धुळे शहर आणि मालेगाव शहर या दोन मतदारसंघात 'एमआयएम'चे आमदार आहेत. या पक्षाने यंदा जाणीवपूर्वक निवडक मतदारसंघ वगळता अन्यत्र उमेदवार उतरविलेले नाही. त्यांचे उमेदवार प्रामुख्याने अल्पसंख्यांक मतदारांच्या विभागणीचे काम करतात. या पक्षाचा त्यादृष्टीने धुळे लोकसभा मतदारसंघात प्रभाव आहे.

या पक्षाने केलेल्या नियोजनातून काँग्रेस पक्षाला आता मैदान मोकळे मिळाले आहे. वंचित आघाडीने केलेला मत विभागणीचा प्रयत्न फेल ठरला आहे. एक प्रकारे हे सर्व करण्यासाठी भारतीय जनता पक्ष एरवी पडद्यामागून बरीचशी रसद उपलब्ध करून देत असतो.

त्याचा अप्रत्यक्ष फायदा भाजपला होतो. यंदा तसे घडणार नाही. काँग्रेस पक्षाला धुळे शहर आणि मालेगाव शहर येथून मोठा फायदा मिळाला आहे. या सर्व राजकीय घडामोडी भाजपची चिंता वाढविणाऱ्या आहेत.

BJP Congress
Dr. Subhash Bhamre: डॉ. भामरे प्रचार सोडून भुजबळांच्या भेटीला; नेमकं काय घडलं?

भाजपचे भामरे तिसऱ्यांदा मतदारांचा कौल घेत आहे. यंदा त्यांच्या उमेदवारी पक्षातील तब्बल नऊ इच्छुकांनी विरोध केला होता. त्यातील तीन उमेदवार भामरे यांचे कट्टर विरोधक आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर देखील भारतीय जनता पक्षाने उमेदवार बदलावा, असे प्रयत्न झाले. त्यासाठी भाजपच्या काही नेत्यांनीच केंद्रीय नेतृत्वाला एसएमएस ई-मेल आणि अन्य मार्गांनी संदेश पाठविले होते.

भामरे यांना प्रचाराला सुरुवात करताना या सर्व इच्छुकांना आणि नाराजांना बरोबर घेण्यात अनेक अडचणी येत आहेत. त्यामुळे अद्यापही त्यांना प्रचारात सूर गवसण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागणार आहेत.

विशेषतः धुळे जिल्ह्यातील धुळे ग्रामीण, दोंडाईचा आणि सटाणा या मतदारसंघात मराठा मतांवर त्यांची भिस्त असते. तिसऱ्यांदा निवडणूक करीत असल्याने भामरे यांच्याबाबत अँटी इन्कमबन्सी आहे. त्यावर मात करण्यासाठी भामरे सध्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत. त्याला तोड म्हणून काँग्रेसने देखील जोरदार नियोजन केले आहे.

BJP Congress
Lok Sabha Election 2024: दहशतवाद, सीमेबाहेरून ट्विट, मुस्लिमांना आरक्षण; PM मोदींनी व्यक्त केली भीती

काँग्रेसच्या बच्छाव यांना बाहेरच्या उमेदवार म्हणून पक्षातील बंडखोर आणि नाराजांचा सामना करावा लागला होता. त्या सगळ्यांना प्रचारात सहभागी करण्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले आहे. विशेष म्हणजे या सर्व प्रचारात काँग्रेस पेक्षाही शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आघाडी घेतली आहे.

भारतीय जनता पक्ष ज्या मराठा पॅटर्नवर भर देत असतो, त्याचे अनुकरण काँग्रेसने केले आहे. उद्या सटाणा आणि मालेगाव भागात प्रभाव असलेल्या मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या सभासदांचा मेळावा होणार आहे. या संस्थेचे सभासद काँग्रेसच्या बच्छाव यांना पाठिंबा जाहीर करेल. यातून निवडणुकीचा राग रंग बदलण्याची शक्यता आहे.

ही सर्व समीकरण अचानक काँग्रेसच्या बाजूने अनुकूल बनली आहेत. त्याचा फायदा डॉक्टर बच्छाव किती घेतात. हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. त्यामुळे सुरुवातीला एकतर्फी वाटणारी ही निवडणूक भाजपसाठी आता चुरशीची बनली आहे.

गेली दहा वर्ष केंद्रात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाने विकासाच्या आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर 400 पार ची घोषणा केली आहे. मात्र निवडणूक जशी पुढे गेली तसे भाजपचा प्रचार हिंदू मुस्लिम या अंगाने पुढे जाऊ लागला आहे.

हा प्रचार धुळे मतदारसंघात भाजपला अत्यंत प्रतिकूल ठरत आहे. बहुतांशी मतदारांचे ध्रुवीकरण होऊन ते काँग्रेसकडे वळन्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप ज्या प्रचारावर देशात जिंकण्याचा दावा करते, तोच प्रचार डोळ्यांमध्ये भाजपला अडचण निर्माण करतो आहे, असा विरोधाभास धुळे मतदार संघात आहे.

BJP Congress
Fadnavis and Vikhe News : बाळासाहेब विखेंचे स्वप्न पूर्ण करण्याची फडणवीसांची ग्वाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com