Modi Trump News : ट्रम्प अन् मोदींच्या फोनवरील संवादात निघाला वादाचा मुद्दा; दोघांनीही सेट केला नॅरेटिव्ह...

Donald Trump and Narendra Modi phone call highlights : डोनाल्ड ट्रम्प हे सोशल मीडियातून अनेक महत्वाच्या घडामोडींवर भाष्य करत असतात. अनेक महत्वाच्या घोषणाही त्यांनी सोशल मीडियातून केल्या आहेत. त्यामध्ये ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत.
Narendra Modi And Donald Trump
Narendra Modi And Donald TrumpSarkarnama
Published on
Updated on

Impact of Modi-Trump talks on international relations : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस. त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पण जगातील सर्वात शक्तीशाली देशाचे अध्यक्ष असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्वातआधी आदल्यादिवशीच शुभेच्छा देण्यात आघाडी घेतली. त्यांनी थेट फोनवरून पंतप्रधान मोदींशी संवाद साधला अन् त्यानंतर सोशल मीडियात पोस्ट केली. पण ही पोस्ट करताना त्यांनी पंतप्रधानांचा नरेंद्र... असा एकेरी उल्लेख करत सूचकपणे वादाच्या मुद्द्यावरूनही मोदींचे आभार मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी रात्रीच फोनवर बोलणे झाले. याची माहिती मोदींनी 10.53 वाजता एक्सवर पोस्ट करत दिली. या पोस्टमध्ये त्यांनी ट्रम्प यांचे आभार मानताना त्यांचा उल्लेख ‘माय फ्रेंड’ असा केला. तुमच्याप्रमाणेच मीही भारत आणि अमेरिकेतील आंतराष्ट्रीय संबंध नव्या उंचीवर नेण्यासाठी कटिबध्द आहे. यूक्रेन संघर्षातून मार्ग काढण्यासाठी तुमच्या प्रयत्नांना आमचा पाठिंबा असल्याचेही मोदी म्हणाले.

ट्रम्प हे सोशल मीडियातून अनेक महत्वाच्या घडामोडींवर भाष्य करत असतात. अनेक महत्वाच्या घोषणाही त्यांनी सोशल मीडियातून केल्या आहेत. त्यामध्ये ते नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. पण मोदींना शुभेच्छा दिल्यानंतर त्याची माहिती सोशल मीडियातून देण्यात ते मागे पडले अन् पंतप्रधान मोदींनी यावेळी त्यात आघाडी घेतली. ट्रम्प यांच्याआधीच पोस्ट करत मोदींनी नॅरेटिव्ह सेट केला. त्याच आधारावर जवळपास पाऊन तासाने ट्रम्प यांनी सोशल मीडियात पोस्ट करत मोदींनी फोनवर बोलणे झाल्याचे जगाला सांगितले.

Narendra Modi And Donald Trump
Sharad Pawar-Kalmadi News : कलमाडी रुग्णालयात, शरद पवार भेटीला; 1991 मध्ये पंतप्रधानपदासाठी लावली होती ‘फिल्डींग’, काय घडलं होतं?

ट्रम्प यांची पोस्ट मोदींनी सेट केलेल्या नॅरेटिव्हवरच असल्याचे स्पष्टपणे दिसते. त्यांनी मोदींचा उल्लेख माय फ्रेंड असाच केला. थोड्या वेळापूर्वीच माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले. मी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. ते खूप चांगले काम करत आहेत, असे ट्रम्प यांनी म्हटले. त्यानंतर त्यांनी मोदींचा नरेंद्र.. असा एकेरी उल्लेख केला. पुढे त्यांनी म्हटले की, रशिया आणि यूक्रेनमधील युध्द थांबविण्यासाठी तुमच्या मदतीबद्दल आभार.

ट्रम्प यांनीही एकप्रकारे नॅरेटिव्ह सेट करण्याचेच काम केले. सध्या दोन्ही देशांमध्ये व्यापारविषयक कराराबाबत चर्चा सुरू झाली आहे. रशिया आणि यूक्रेनमधील युध्दाच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारताला यापूर्वीच गंभीर इशारे देत 50 टक्के टेरिफ लादला आहे. रशियाकडून तेल खरेदी थांबवावी, अन्यथा आणखी टेरिफ लादण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. पण भारताने माघार घेतलेली नाही. त्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वादाची ठिणगी पडलेली आहे.

Narendra Modi And Donald Trump
Nupur Bora Case : सरकारी नोकरीत केवळ 5 वर्षे, महिला अधिकाऱ्याच्या घरात सापडली 2 कोटींची रोकड व दागिने; मुख्यमंत्रीही चक्रावले

वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाच या दोन्ही नेत्यांमध्ये यूक्रेन संघर्षाच्या मुद्द्यावर फोनवर चर्चा झाली असावी. त्याचे संकेत दोघांच्या सोशल मीडियातील पोस्टवरून दिसते. भारत रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या भूमिकेवर ठाम आहे. आता दोन्ही नेत्यांमधील चर्चा आणि सोशल मीडियातील त्यांची माय फ्रेंडच्या पोस्टने तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.

ऑपरेशन सिंदूरचीही किनार

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्ष झाला. दोन्ही देशांतील संघर्ष आपल्या मध्यस्थीमध्ये थांबल्याचा दावा ट्रम्प यांनी अनेकदा केला. त्यांचे हे तुणतुणे अजूनही सुरूच असते. पण पंतप्रधान मोदींनी संसदेतही हा दावा फेटाळून लावला आहे. त्यावरूनही दोन्ही नेत्यांमधील संबंध ताणले गेल्याची चर्चा होती. मात्र, पंतप्रधान मोदी यांनी एकदाही ट्रम्प यांचे थेट नाव घेत ते खोटे बोलत असल्याचे भाष्य केलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com