Eknath Shinde News : 'धर्मवीरा'चा 'नाथ', शिंदेंच्या पाठीशी गुरूचा हात!

Anand dighe News : ठाणे व परिसरात त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता अशी आनंद दिघेंची ओळख होती. त्यामुळे अनेक शिवसैनिक त्यांच्यासाठी मोठ्या निष्ठने काम करीत होती.
Ekanath shinde, Anand Dighe
Ekanath shinde, Anand Dighe Sarakrnama
Published on
Updated on

Political News : ठाण्यातील शिवसेनेचे सर्वोच्च नेते ते राज्याचे मुख्यमंत्री अशी एकनाथ शिंदे यांनी ओळख निर्माण करण्यासाठी खूप मोठी मेहनत घेतली. ही ओळख तयार करण्यामध्ये त्यांचे गुरु व शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचे महत्त्वाचे योगदान आहे. दिघे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टाकलेली जबाबदारी शिंदे यांनी स्वीकारून त्याला न्याय दिला. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांना गुरूस्थानी मानतात. त्यांच्यामधील हे गुरूशिष्याचे नाते शिंदे यांनी नेहमीच सांगितले आहे. 2019 मध्ये मंत्रिपदाच्या शपथविधीच्या प्रसंगीही शिंदे यांनी दिघे यांच्या नावाने शपथ घेतली होती.

महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी दोन वर्षांपूर्वी शपथ घेतली. कोणाच्याही ध्यानीमनी नसताना एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत त्यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड केले होते. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपच्या पाठींब्याने त्यांनी महायुतीचे सरकार स्थापन करीत एकनाथ शिंदे (Ekanath Shinde) यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. (Eknath Shinde News)

एकनाथ शिंदेंनी जेव्हा महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शपथ घेतली. तेव्हा त्यांनी आपल्या शपथविधीची सुरवातच, “शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून व धर्मवीर आनंद दिघे साहेबांना स्मरण करून अशी शपथ घेतो” अशी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्रीपदाची शपथ बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे यांचे स्मरण करुन शपथविधी घेतली. त्यामुळे आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांच्यातील असलेले गुरु शिष्याचे नाते जनतेसमोर आले.

ठाणे व परिसरात त्याकाळी बाळासाहेब ठाकरेंवर निस्सीम प्रेम करणारा कार्यकर्ता अशी आनंद दिघेंची ओळख होती. त्यामुळे अनेक शिवसैनिक त्यांच्यासाठी मोठ्या निष्ठने काम करीत होती. या कार्यकर्त्यात भरच पडत होती. त्याकाळी ठाणे व परिसरात आनंद दिघे यांच्या नावाचे मोठे वलय होते.

Ekanath shinde, Anand Dighe
Video Amit Shah : महाराष्ट्रात भाजपच्या नेतृत्वात युतीचे सरकार करायचे का? अमितभाईंचा सवाल

शिवसैनिकाच्या मदतीला धावून जाणारा नेता अशी दिघेंची ओळख होती. राजकारणात त्यांच्याकडे कोणतेच मोठे पद नव्हते. मात्र, ठाणे परिसरातील सर्व खासदार, आमदार, महापौर ते त्याकाळी ठरवत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे ते निकटवर्तीय होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्यांच्या शब्दाला मोठी किंमत होती.

एकनाथ शिंदे हे मुळचे सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यातील आहेत. काही कामानिमित्त एकनाथ शिंदे यांचं कुटुंब मुंबईतील ठाणे जिल्ह्यात स्थायिक झाले होते. शिक्षण घेत असतानाच त्यांना त्यावेळी मराठी माणसाचा पक्ष म्हणून शिवसेना नावारूपाला आली होती. त्यामुळे एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे आणि शिवसेनेचे चाहते झाले होते. त्या काळातच ठाणे जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंद दिघे होते.

Ekanath shinde, Anand Dighe
Video Devendra Fadnavis : आदेशाची वाट पाहू नका, ठोकून काढा; देवेंद्र फडणवीसांचे फर्मान

ठाणे परिसरात एकदा साखरेचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला होता. त्यावेळी दिघे यांनी एकनाथ शिंदें यांच्यावर कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या डोक्यावर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते.अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली. त्या दिवशी आनंद दिघेना त्यांनी जिंकल होते.

या घटनेनंतर शिंदे व दिघे यांच्यात चांगले नातेसंबंध तयार झाले. शांत स्वभाव, अभ्यासू नेतृत्व, एकनिष्ठ माणूस म्हणून एकनाथ शिंदे हे आनंद दिघेंचे विश्वासू बनले. आनंद दिघेंचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदेंना ओळख मिळाली. त्यानंतर येथूनच त्यांना राजकारणात संधी मिळत गेली. कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नसलेले एकनाथ शिंदे हे ठाणे महानगरपालिकेत दोन वेळेस नगरसेवक म्हणून निवडून आले. कामातून त्यांनी जनमानसात आणि शिवसेना पक्षात स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली.

Ekanath shinde, Anand Dighe
Pune BJP Convention : 'देवाभाऊ म्हणजेच महाराष्ट्राचा विकास'; पुण्याच्या अधिवेशनात दिसली भाजपच्या विधानसभा प्रचाराची झलक

त्यानंतर 2001 साली आनंद दिघे यांचा अपघाती मृत्यू झाला. यामुळे एकनाथ शिंदेनां मोठा धक्का बसला होता. नेहमी आधार देणारी व्यक्ती निघून गेल्याने त्यांना मोठे दुःख झाले. त्यानंतर 2004 साली त्यांनी पहिल्यांदा आमदारकी लढवली आणि ते आमदार झाले. 2009, 2014 मध्येही ते आमदार म्हणून निवडून आले.

2014 साली शिवसेना विरोधी बाकावर बसल्यानंतर एकनाथ शिंदे यांना विरोधी पक्षनेते पद देण्यात आले होतं. त्यानंतर पुन्हा ते सत्तेत सहभागी झाले ते मंत्रिमंडळात मंत्रीही हॊते. त्यानंतर 2019 साली महाविकास आघाडीची सत्ता आली. त्याबेली अडीच वर्ष एकनाथ शिंदे यांनी नगरविकास खात्याची जबाबदारी स्वीकारली.

त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडत 22 जून 2022 ला त्यांनी शिवसेनेत बंड केले. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यानंतर भाजपच्या पाठींब्याने महायुतीचे सरकार स्थापन करीत एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळेसपासून आजपर्यंत ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. या सर्व घडामोडीनंतरही त्यांनी गुरु या नात्याने शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचे महत्त्वाचे योगदान असल्याचे वारंवार स्पष्ट केले आहे.

Ekanath shinde, Anand Dighe
Video Devendra Fadnavis : 'लाडकी बहीण'च्या विरोधात स्ट्रॅटेजी ठरली; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली भीती

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com