Eknath Shinde : शिवसेनेच्या बोलबच्चन मंत्री, आमदारांना एकनाथ शिंदेंनी झापलं : गोगावलेंमुळे सगळेच तावडीत सापडले

Shivsena Politics : मंत्री भरत गोगावलेंनी तळकोकणात जाऊन थेट नारायण राणेंनाच आंगारवर घेतलं. त्यांनी राणेंवर केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरू झाला आहे.
Eknath Shinde on Bharat Gogawale
Eknath Shinde on Bharat Gogawalesarkarnama
Published on
Updated on

Kokan Politics : मंत्री आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्या एका विधानामुळे कोकणात भाजप विरुद्ध शिवसेना असा वाद पेटला होता. माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल बोलताना गोगावले यांची गाडी सुसाट सुटली होती. या विधानामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही चांगलीच अडचण झाली. पण शिंदे यांना अडचणीत आणणारे गोगावले एकटेच नाहीत. यापूर्वीही मंत्री योगेश कदम, माजी मंत्री रामदास कदम, आमदार संतोष बांगर, संजय गायकवाड अशा नेत्यांची फौजच शिवसेनेत आहे.

यावर उपाय म्हणून आता एकनाथ शिंदे यांनी मंत्री आणि आमदारांचे कान टोचत, कमी बोला आणि जास्त काम करा अशा कानपिचक्या दिल्या आहेत. पण या कानपिचक्या सर्वात जास्त भरत गोगावलेंसाठी होत्या अशा आता चर्चा सुरू झाल्या आहेत. गोगावले यांनी रायगडमध्ये पाकमंत्रिपदावरून रान उठवल्यामुळे महायुतीत मतभेद असल्याचे समोर आले. पालकमंत्रिपदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेना समोर आली आहे. अशात भरत गोगावले यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जाऊन पुन्हा नव्या वादाला निमंत्रण दिले.

गोगावले यांनी सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांना बोलताना भाजपचे माजी केंद्रीय मंत्री तथा विद्यमान खासदार नारायण राणे यांचा दाखला दिला. तसेच त्यांच्या प्रमाणेच राजकारण करा, असा कानमंत्र दिला. पण त्यांनी वापरलेल्या शब्दांमुळे आता राज्याच्या राजकारणातच खळबळ उडाली.

Eknath Shinde on Bharat Gogawale
Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिंदेंच्या मनात बंडाची भीती? शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आणला 'हा' महत्त्वाचा प्रस्ताव

नारायण राणे राजकारणात असेच वर गेले नाहीत. यासाठी त्यांनी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या आहेत. तर मर्डरही... वैगेरे असे म्हटले होते. ज्यानंतर आता तळकोकणात राजकारण जोरदार तापले होते.

कोकणातील भाजप नेत्यांसह राज्यातील भाजपच्या नेत्यांनी यावरून नाराजी व्यक्त केली होती. हे नाराजी नाट्य सुरू असतानाच मंत्री नितेश राणे यांनी गोगावलेंना चहासाठी निमंत्रित करत एक चहा त्यांनी घ्यावा म्हणजे त्यांचे अज्ञान दूर होईल. त्यांच्या ज्ञानात थोडी भर पडेल, असा टोला लगावला होता. पण गोगावले यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर स्टेजवर असणारे उद्योग मंत्री उदय सामंत, माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी चकार शब्दही काढलेले नाहीत. यावरून भाजपच्या अनेक नेत्यांच्या भुवया उंचावल्या होत्या.

यानंतर आता मुंबईत झालेल्या कार्यकरणीच्या बैठकीत शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे यांनी गोगावलेंचा मुद्दा धरत थेट मंत्री आणि आमदारांची शाळा घेतली. त्यांनी सर्वांना कानपिचक्या देत विरोधकांना उघडे करता करता स्वत: उघडं पडाल अशी वक्तव्य टाळा. आपल्यातच क्लेश निर्माण होतील असे बोलू नका. तुमचा एक शब्द हा आपल्या पक्षाच्या शिस्तीला मारक ठरत आहे. त्यामुळे कमी बोला आणि जास्त काम करा. तुमच्या कामाची ब्रेकिंग न्यूज होऊ द्या. आता चुकीचा शब्द टाळा असे आदेश दिले.

Eknath Shinde on Bharat Gogawale
Eknath Shinde : शिंदेंचा थेट इशाराच! गोगावलेंसह आमदार आणि मंत्र्यांना कानपिचक्या, म्हणाले, 'तुमचा एक चुकीचा शब्द...'

या आदेशानंतर गोगावलेंना आता उपरती झाली आहे. "मला तसे काही बोलायचे नव्हते. माझ्या बोलण्याची तसा उद्देश नव्हता. पण आता शब्द बाहेर पडलेच आहेत. त्यामुळे सॉरी.... आम्ही माफी मागतो. त्यांचे आमचे-त्यांचे (नारायण राणे) संबंध चांगले आहेत. मी त्यांच्याशी बोलणार आहे." असे त्यांनी म्हणून या मुद्द्यावर आता पडदा टाकला आहे. पण गोगावलेंच्या या वक्तव्यामुळे रायगडप्रमाणेच तळकोकणातही महायुतीत मिठाचा खडा पडला आहे. याचे पडसाद आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये पडू शकतात, असेही शक्यता येथे वर्तवली जातेय....

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com