Ravindra Dhangekar: पुणे महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना तयार करण्याचे आदेश येताच धंगेकरांनी टाकला नवा बॉम्ब

PMC Election 2024 : आजी-माजी नगरसेवक, आमदार पक्षप्रवेशासाठी तयारीत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय धोरण ठरतंय याच्या परिस्थितीत हे नेते असून धोरण निश्चिती झाल्यानंतर हे प्रवेश घडून आणण्यात येतील असं रवींद्र धंगेकर म्हणाले.
Ravindra Dhangekar shivsena .jpg
Ravindra Dhangekar shivsena .jpgSarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी सैन्य तयार आदेशाची वाट, धंगेकरांचा स्वबळाचा नारा ! सुरुवात केली आहे. महायुती होईल का नाही याबाबत आद्यप स्पष्टता आली नसली तरी सर्वच पक्षांनी आपापल्या परीने तयारी सुरू ठेवली आहे. पुण्यामध्ये देखील शिंदेंच्या सेनेकडून सर्वच्या सर्व महापालिकांच्या जागांवर तयारी सुरुवात करण्यात आली असून वेळ पडल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचं शिंदेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांनी सांगितले आहे. रवींद्र धंगेकर, पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली. या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी शिंदेसाहेब यांना पुण्यामध्ये सेनेच्या वाढत चाललेल्या प्रभावाबाबत माहिती दिली. मोठ्या प्रमाणात माजी नगरसेवक आणि पदाधिकारी शिंदेसेनेमध्ये येण्यासाठी इच्छुक असल्याचे देखील यावेळी सांगण्यात आलं.

त्यामुळे पुणे महापालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढण्याची आपली तयारी असून प्रत्येक प्रभागांमध्ये उमेदवार देण्याच्या दृष्टिकोनातून तयारी करण्यात येत आहे. त्यामुळे जर एकनाथ शिंदेसाहेबांनी (Eknath Shinde) जर तसे आदेश दिल्यास आम्ही सर्व जागा स्वबळावरती लढू, असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

बैठकीदरम्यान आणि शिंदेसाहेबांना विनंती केली आहे की सर्व 165 जागांवर लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी पुण्यातील कार्यकर्ते हे सक्षम आहेत. सैन्य तयार आहे फक्त आपण आदेशाची वाट पाहत असल्याचं धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar shivsena .jpg
Nagpur Municipal Elections 2025: चार सदस्यांच्या प्रभागाने वाढले शिवसेना, राष्ट्रवादीचे टेंशन

पक्षप्रवेशासाठी अनेक लोक संपर्क करत आहेत काही बैठका देखील होत आहेत. शिंदेसाहेबांच्या पक्षांमध्ये येण्यासाठी मोठा ओघ पाहायला मिळत आहे.त्यामुळे पुढील काही काळामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश पाहायला मिळतील.

आजी-माजी नगरसेवक, आमदार पक्षप्रवेशासाठी तयारीत आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय धोरण ठरतंय याच्या परिस्थितीत हे नेते असून धोरण निश्चिती झाल्यानंतर हे प्रवेश घडून आणण्यात येतील असं रवींद्र धंगेकर म्हणाले.

Ravindra Dhangekar shivsena .jpg
ACB Navi Mumbai raid : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाकडे पगारी उत्पन्नापेक्षा तब्बल 300 पट संपत्ती...

पक्षप्रवेशाच्या तयारीमध्ये अनेकजण आहेत. मात्र युती- आघाडी होणार का ? न झाल्यास आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल का? या प्रतीक्षेमध्ये अनेक नेते आहेत. त्यामुळे पॉलिसी डिसिजनबाबत स्पष्टता आल्यानंतर अनेक प्रवेश घडून आणण्यात येतील. मात्र, याबाबतचा सर्वस्वी निर्णय हा एकनाथ शिंदेंचा असून राज्य पातळीवर युती होणार का? नाही याबाबत त्यांच्याकडूनच निर्णय होणार आहे. त्यांच्याकडून स्वबळाचा निर्णय आल्यास आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्यास तयार असल्याचे देखील धंगेकर म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com