MLC Election : विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक; फोडाफोडी, घोडेबाजार टाळण्यासाठी महायुतीचा प्लॅन तयार? महाविकास आघाडीला कितपत संधी?

By-election five seats Maharashtra News : या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत फोडाफोडी, घोडेबाजार टाळण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीने त्यांची रणनिती ठरवली आहे. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला आमदारकीची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
MVA- Mahayuti
MVA - MahayutiSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठे यश मिळवले होते. या विजयामुळे महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यानंतर अवघ्या चार महिन्यानंतर होत असलेल्या या निवडणुकीत पाचही जागांवर विजय मिळवण्याचे आव्हान महायुतीसमोर असणार आहे. दुसरीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने महविकास आघाडी निवडणूक रिंगणात कसा टिकाव धरणार? याची उत्सुकता आहे. या पाच जागांच्या पोटनिवडणुकीत फोडाफोडी, घोडेबाजार टाळण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीने त्यांची रणनिती ठरवली आहे. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाला आमदारकीची लॉटरी लागणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

चार महिन्यापूर्वी राज्यात पार पडलेल्या विधानसभा निवडणुकांनंतर रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या मध्ये भाजपच्या तीन, राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या एक आणि शिवसेना (Shivsena) शिंदे गटाच्या एका आमदारासाठी ही निवडणूक होणार आहे.

या विधानसभा निवडणुकीत विधानपरिषदेवर असलेले भाजपचे आमदार, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कराड यांच्यासह शिवसेनेकडून आमशा पाडवी आणि अजित पवार गटाकडून राजेश विटेकर यांच्या जागा रिक्त झाल्या आहेत. या रिक्त जागांसाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कुणाची लॉटरी लागणार याची उत्सुकता लागली आहे.

MVA- Mahayuti
Shivsena News : उद्धव ठाकरेंचा सातबारा कोरा होणार; आशिष जयस्वालांचा राऊतांना टोला

विधानसभा सदस्यामधून विधानपरिषदेसाठी निवडून द्यायच्या पाच जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत आहे. हे बहुमत लक्षात घेता पाचही जागा त्यांनाच मिळतील असे चित्र आहे. हे पाच सदस्य नोव्हेंबरमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले होते. त्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. त्यामुळे या पाच जणांचा कार्यकाळ वेगवेगळा असणार आहे. या आमदाराचा कार्यकाळ वेगवेगळा असणार असल्याने विरोधकांना संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

MVA- Mahayuti
Khadse vs Shivsena : मुक्ताईनगरमधील हाडवैर! छेडछाड प्रकरणानंतर वादाला नव्याने फोडणी

विरोधकांना जिंकण्याची संधीच नाही

या निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने जी अधिसूचना जारी केली आहे. त्या आधीसुचनेत या पाच जागांची निवडणूक एकाच दिवशी पण वेगवेगळी निवडणूक घ्यावी असे म्हटले आहे. याचा अर्थ प्रत्येक जागेसाठी जिंकण्यासाठीचा कोटा हा वेगवेगळा असणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विरोधकांना जिंकण्याची संधी नाही.

दुसरीकडे ज्यांचा कार्यकाळ एकाच वेळेस समाप्त होतो. त्या तीन जागांची निवडणूक एकत्र व अन्य दोन जागांची निवडणूक वेगवेगळी झाली असली तरी जिंकण्यासाठीचा कोटा विरोधकाकडे नसणार आहे. त्यामुळे ही निवडणूक जवळपास बिनविरोध होणार असल्याचे लक्षात येते.

MVA- Mahayuti
Tanaji Sawant : आरोग्य विभागात घोटाळ्याचा आरोप, मुख्यमंत्र्यांची स्थगिती; अखेर तानाजी सावंतांनी भडास काढली, म्हणाले...

एवढा मिळणार कालावधी

अजित पवार (Ajit Pawar ) गटाकडून ज्यांना आमदारकीची संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वा पाच वर्षाचा असणार आहे तर शिंदेसेनेकडून संधी मिळेल त्याचा कार्यकाळ सव्वातीन वर्षाचा असणार आहे. भाजपकडून ज्यांना आमदारकी मिळेल त्याचा कार्यकाळ 13 महिन्याचा असणार आहे. त्यामुळे भाजपकडून दुसऱ्या फळीतील एक, दोन जणांना संधी दिली जाण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

MVA- Mahayuti
Tanaji Sawant : वादग्रस्त विधानं, हजारो कोटींच्या घोटाळ्यांचे गंभीर आरोप अन् बरंच काही..! तानाजी सावंतांच्या पाठीमागचं 'शुक्लकाष्ठ' संपेचना...

विधानपरिषदेच्या या पोटनिवडणुकीमुळे पाच नवीन कार्यकर्त्यांना आमदार होण्याची संधी प्राप्त होणार आहे. त्यामध्ये तीन भाजपाचे एक-एक आमदार शिंदे आणि अजित दादा गटाचे असतील. महायुती झाल्यानंतर अनेक ठिकाणी बंडखोरी टाळावी यासाठी काहींना विधान परिषदेवर पाठवण्याचे आश्वासन दिले गेले आता त्यात अनेक इच्छुक आहेत यामुळे नेमकी कोणाला संधी मिळते याकडे लक्ष असणार आहे.

MVA- Mahayuti
Dhananjay Munde : संतोष देशमुख हत्या प्रकरणी मुंडेंचा गेम ओव्हर; फडणवीसांनी दिला मोठा आदेश

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com