फडणवीसांचा घाम निघणार; मित्रपक्षानं धरला काँग्रेसचा हात

निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला बळ मिळालं असून भाजपला धक्का बसला आहे.
Goa Congress, Devendra Fadnavis
Goa Congress, Devendra Fadnavis Sarkarnama

पणजी : गोव्यामध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक (Goa Assembly Election) होणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गोवा भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. पण यावेळची निवडणूक त्यांच्यासाठी सोपी नसेल, अशी चिन्ह आहेत. मित्रपक्षानंच काँग्रेसचा (Congress) हात धरल्याने फडणवीसांना निवडणूक जिंकण्यासाठी घाम गाळावा लागणार असल्याचे चित्र आहे.

गोव्यात 2017 मध्ये मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्काखाली सरकार स्थापन करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टी (GFP)ने भाजपला पाठिंबा दिला होता. या पक्षाचे तीन आमदार असले तरी ते थेट सत्तेत सहभागी झाले नव्हते. आगामी निवडणुकीच्या तोंडावर एप्रिल महिन्यात पक्षाच्या अध्यक्षांनी गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहित एनडीएमधून बाहेर पडत असल्याचे जाहीर केलं.

Goa Congress, Devendra Fadnavis
वानखेडेंचं जात प्रमाणपत्र खरं की खोटं? समितीनं बजावलं समन्स

त्यानंतर हा पक्ष स्वतंत्रपणे लढणार की काँग्रेस वा तृणमूल, आपचा हात धरणार याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तृणमूल काँग्रेसशी हात मिळवणी करण्याचे संकेत सातत्याने मिळत होते. पण मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आमदार विनोद पालेकर व अपक्ष आमदार प्रसाद गांवकर यांच्यासोबत दिल्लीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतरच दोन्ही पक्षांमध्ये आघाडी झाल्याचे निश्चित करण्यात आले.

राहुल गांधी यांनीच मंगळवारी सायंकाळी ट्विट करून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, गोव्यामध्ये सकारात्मक बदल करण्यासाठी गोवा फॉरवर्ड पार्टीने काँग्रेसला सहकार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या सहयोगाबद्दल आनंदी आहे. विजय सरदेसाई, विनोद पालेकर आणि प्रसाद गांवकर यांच्यासोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे राहुल यांनी म्हटलं आहे.

गोव्यातील लोकशाही विरोधी भाजप सरकारला खाली खेचण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत, असं सरदेसाई यांनी या भेटीनंतर सांगितले. दोन्ही पक्षांची आघाडी झाल्याने गोव्यात खिळखिळ्या झालेल्या काँग्रेसला बळ मिळल्याची चर्चा आहे. एकीकडे भाजप अऩ् दुसरीकडे आप व तृणमूल काँग्रेसनंही राज्यात जोर लावला आहे. त्यामुळे काँग्रेसला सरदेसाई यांची साथ मिळाल्याने ताकद वाढली आहे. तर भाजपसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता असल्याने फडणवीस यांना जोरदार तयारी करावी लागणार असल्याची चर्चा रंगली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com