Devendra Fadnavis : भुजबळ, मुनगंटीवारांच्या मदतीने मी विरोधी पक्षाला ‘त्या गोष्टी’चे ट्रेनिंग देईन; देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत घोषणा

Maharashtra Budget Session : गृह विभागाचे विषय पुन्हा अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडले आहेत. विरोधकांना आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागेल. जे महत्वाचे विषय आहेत, पण, त्याची चर्चा व्हायची राहून गेली आहे. ते विषय अंतिम आठवडात प्रस्तावात आले पाहिजेत.
Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal-Sudhir Mungantiwar
Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal-Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 25 March : विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज उत्तर दिले. ते देताना विरोधी पक्षांनी गृहविभागाच्या चर्चेत जे मुद्दे आले होते, तेच पुन्हा अंतिम आठवडा प्रस्तावात आले आहेत, असे सांगून फडणवीस यांनी विरोधकांना उघडे पाडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षात कसं काम करायचं, याचं प्रशिक्षण विरोधी पक्षांना हवे असेल तर मी त्यासंदर्भात प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर छगन भुजबळ आणि सुधीर मुनंगटीवार यांचीही मदत घेईन, अशी घोषणाच फडणवीस यांनी केली.

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, गृह विभागाचे विषय पुन्हा अंतिम आठवडा प्रस्तावात विरोधकांनी मांडले आहेत. विरोधकांना आता विरोधी पक्षाच्या भूमिकेत जावे लागेल. जे महत्वाचे विषय आहेत, पण, त्याची चर्चा व्हायची राहून गेली आहे. ते विषय अंतिम आठवडात प्रस्तावात आले पाहिजेत. विरोधकांना विरोधी पक्षात कसं काम करायचं, याचं प्रशिक्षण हवे असेल तर मी त्यासंदर्भात प्रशिक्षण द्यायला तयार आहे. गरज पडली तर छगन भुजबळ आणि सुधीर मुनंगटीवार यांचीही मदत मी घेईन.

लोकशाहीमध्ये सक्षम विरोधी पक्ष हा महत्वाचा आहे. सक्षमता ही संख्येवर ठरत नाही. छगन भुजबळ (chhagan bhujbal) एकटेच होते, तरीही संपूर्ण सभागृह डोक्यावर घ्यायचे. पण, योग्य विषय ते घ्यायचे. भास्करराव जाधव तुमच्यासारखा ज्येष्ठ सदस्य असतानाही अंतिम आठवडा प्रस्तावावर अन्याय झालेला दिसत आहे. पण, तुम्ही विविध प्रश्नावर बोललात, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal-Sudhir Mungantiwar
Prashant Koratkar : कोरटकर तेलंगणात काँग्रेसवाल्यांच्या घरी लपून बसला होता; फडणवीसांनी सत्ताधारी आमदारांच्या तोंडून राज्यापुढे आणले...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, गृहमंत्री असल्यामुळे प्रत्येक गोष्टीचा संबंध माझ्याशी जोडला जातो. तुमच्या लक्षात आलं पाहिजे की, २०२२-२४ मलाच टार्गेट करायचे. पण, परिणाम असा झाला की लोकांनी आम्हाला आधीच्या पेक्षा रेकॉर्ड ब्रेक बहुमत दिले आहे. पण, त्याच्यातून तुम्ही काय शिकतच नाही, त्यामुळे कारायचे काय, असा माझ्यासमोर प्रश्न आहे.

Devendra Fadnavis-Chhagan Bhujbal-Sudhir Mungantiwar
Ashok Pawar Politic's : अशोक पवारांनी तोंडात घास देऊन मानेवर बुक्की मारली, त्रास सोसावा लागला; साथ सोडलेल्या नेत्याने सांगितली आपबिती

कुठलही घटना घडली की मलाच लगेच सगा-सोयराच करून टाकतात. माझा सगासोयरा जरी अपराधी असली तरी त्याला शिक्षा करायला मी कधीच मागे पुढे पाहणार नाही. कारण, माझा सगा हा भारताचं संविधान आहे आणि माझे सोयरे हे महाराष्ट्रातील तेरा कोटी जनता आहे, त्यामुळे मी कुठल्याही व्यक्तीला झुकतं माप देणार नाही. समाजाचा शत्रू मग तो कोणत्याही पक्षाचा असली तरी त्याना सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी पुन्हा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com