Road Accident : वाढत्या अपघातांनी चिंतेत भर, पालकांना घ्यावी लागणार 'ही' काळजी

Road accident problem : रस्ता सुरक्षेची स्थिती चिंताजनक आहे. वाहतुकीचे नियम पाळण्यासाठी कुचराई केली जाते. त्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. मुंबई, पुण्यात नुकतेच झालेले अपघात चिंता वाढवणारे आहेत. वाहनाचा अतिवेग आणि चालक दारूच्या नशेत असणे, ही अपघाताची प्रमुख कारणे आहेत. अशा अपघातांना आळा कसा घालायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
Road Accident
Road AccidentSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Road Accident : साधारण 2010-11 हे वर्ष असेल. सर्व शाळांमधून रस्ता सुरक्षेचे धडे दिले जात होते. विद्यार्थ्यांसाठी काही गुणांची परीक्षाही त्या विषयावर घेण्यात आली होती. वाहतुकीच्या नियमांबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होऊ लागली होती. यासाठी पुढाकार घेतलेल्या दोन्ही अधिकाऱ्यांची बदली झाली आणि हा उपक्रमही बाजूला पडला. 'उस्मानाबाद पॅटर्न' म्हणून म्हणून हा उपक्रम नावाजला गेला होता.

अपघातांची संख्या वाढली आहे. पुण्यात (Pune) अलीकडेच डंपरने तिघांना चिरडले. कुर्ल्यातही असाच अपघात झाला. त्यामुळे रस्ते सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जागरूकतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. धाराशिवचे तत्कालीन सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी रस्ते सुरक्षा आणि वाहतुकीच्या नियमांच्या अभ्यासक्रमाची पुस्तिका तयार केली होती.

तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. प्रवीण गेडाम यांच्या पुढाकाराने शाळांमध्ये तो उपक्रम राबवण्यात आला होता. चव्हाण हे आता लातूर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत, तर डॉ. गेडाम हे नाशिकचे विभागीय आयुक्त आहेत. पिंपरी चिंचवड येथे कार्यरत असताना चव्हाण यांनी तेथेही हा उपक्रम राबवला होता. नंतर कोरोनाची साथ आली आणि उपक्रम बाजूला पडला.

नाशिकचे विभागीय आय़ुक्त डॉ. प्रवीण गेडाम म्हणतात, की धाराशिव येथे राबवलेला उपक्रम उपयुक्त होता, मात्र शाळेत (School) विद्यार्थ्यांना शिकवायचे तरी काय काय, हाही प्रश्न आहेच. वाहतुकीचे नियम आणि खरेतर सर्वच प्रकारची सार्वजनिक वर्तणूक हे प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीचा भाग असली पाहिजे. मुलांच्या शालेय शिक्षणादरम्यान अभ्यास आणि इतर उपक्रमांद्वारे शाळांनी आणि शिक्षकांनी देखील यादृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे.

रस्ता सुरक्षा, वाहतुकीच्या नियमांचे पालन या बाबी मुलांच्या जडणघडणीचा भाग असायला हव्यात. वाहतुकीच्या नियमांचा, रस्ता सुरक्षेचा अभ्यासक्रमात समावेश झाला तर विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होईल. ही प्रक्रिया दीर्घ अशी वाटते, पण ती अत्यंत उपयुक्त आहे, असे चव्हाण यांना वाटते. अपघातांची कारणे शोधण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. त्या समितीचे कामकाज निरंतर चालू असते.

Road Accident
Hingoli Crime : धुळा कोळेकर ते विलास मुकाडे; पोलिसांच्या बेछूट गोळीबाराला पायबंद कसा घालणार?

अपघात (Accident) कसा झाला, नेमकी चूक कोणाची होती, याचे विश्लेषण केले जाते. त्यानंतर त्यावर उपाययजोना केल्या जातात. न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील या समितीत आरटीओ, पोलिस, सार्वजनिक बांधकाम आदी सर्व विभागांचा समावेश आहे, असे चव्हाण यांनी सांगितले. वाहनांचा अतिवेग आणि नशेच्या अंमलाखाली असलेले चालक, हे भारतातील रस्ते अपघातांचे मुख्य कारण आहे. रस्तेही फारसे चांगले नाहीत.

Road Accident
Ghatkopar Accident : घाटकोपरमध्ये कुर्ला बेस्ट बस अपघाताची पुनरावृत्ती, भरधाव टेम्पोने अनेकांना चिरडलं, महिलेचा जागीच मृत्यू

वाहनांत तांत्रिक बिघाडांमुळेही अपघात होत असतात. पुण्यातील वाघोली येथे डंपरने 9 जणांना चिरडले, त्यात तिघांचा मृत्यू झाला. या डंपरचा चालक दारूच्या नशेत होता. मृतांमध्ये 22 वर्षांचा तरुण, एक वर्षाची मुलगी आणि दोन वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. वाघोली पोलिस ठाण्याच्या समोरील फूटपाथवर हे सर्वजण झोपले होते. ते कामाच्या शोधात विदर्भातून पुण्यात आले होते. रविवारी मध्यराक्षी एकच्या सुमारास हा अपघात झाला होता.

शुक्रवारी घाटकोपर येथेही असाच अपघात झाला. भरधाव टेम्पोने पाच ते सहा जणांना चिरडले. त्यात एका महिलेचा मृत्यू झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा भीषण अपघात झाला. वेग नियंत्रित असता तर चालकाचे नियंत्रण सुटले नसते. अतिवेगामुळेच हा अपघात झाला, चालक दारूच्या नशेत होता, असे अपघतास्थळावर उपस्थित लोकांचे म्हणणे होते. त्यापूर्वी, कुर्ल्यात तर हादरवून टाकणारा अपघात झाला होता. बेस्टच्या बसने अनेक गाड्यांना धडक देऊन लोकांना चिरडले होते. त्यात आठ जणांचा मृत्यू झाला होता.

अशा अपघातांच्या बातम्या सातत्याने कानावर पडत असतात. हिट अँड रनची (Hit and run) प्रकरणे तर ताजीच आहेत. दोषींना शिक्षा होते, काही दोषी सुटून जातात. हिट अँड रन प्रकरणातील काही बडे संशयित आरोपी निर्दोष सुटले आहेत. अशा प्रकारांमुळे वाहनचालकांमध्ये बेफिकीरी वाढण्याचाा धोका नाकारता येत नाही. अपघाताची अनेक प्रकरणे न्यायालयात प्रलंबित राहतात. त्यामुळे प्रकरणांची तीव्रता कमी होते. सर्वोच्च न्यायालयाच्या समितीचे काम सुरू असले तरी तेही दीर्घकालीन असेच आहे. जागरूकता आणि कायद्याची काटेकोर अंमलबजावणी झाली तर अपघातांना आळा बसू शकतो.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com