
Congress leaders switching BJP : तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली 2022 मध्ये शिवसेनेत उभी फूट पडली, त्यानंतर '50 खोके एकदम ओके' ही घोषणा राज्याच्या राजकारणात कायमच चर्चेत आली. ती आज देखील चर्चेत आहे. या घोषणेने एवढी डोकेदुखी वाढली की, एकनाथ शिंदेंनी न्यायालयात धाव घेतली. पण मुंबई उच्च न्यायालयाने '50 खोके एकदम ओके', अशी घोषणा देणं हा गुन्हा नसल्याचा निकाल दिला.
राज्यासह देशात प्रसिद्ध झालेल्या या घोषणेचा जनक काँग्रेसचे जालनामधील माजी आमदार कैलास गोरंट्याल आता भाजपच्या वाटेवर असल्याची बातमी समोर आली आहे. या बातमीमुळे राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. नाराज कैलास गोरंट्याल त्यांचा अंतिम निर्णय कधी जाहीर करतील, याकडे आता लक्ष लागलं आहे.
शिवसेनेत (Shivsena) बंडाळी केल्यानंतर एकनाथ शिंदे हे, सुरतमार्गे गुवहाटीला गेले. तिथं शिवसेनेचे शहाजीबापू पाटील यांचा, 'काय झाडी, काय डोंगर, काय हाॅटेल, एकदम ओके', असा डायलाॅग व्हायरल झाला. पुढं एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर सत्ता स्थापन केली. यात आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप झाला. महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. एकनाथ शिंदे अन् भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर '50 खोके एकदम ओके' घोषणा प्रसिद्ध झाली. हीच घोषणा बंडखोरांची आजही डोकेदुखी ठरते आहे.
'50 खोके एकदम ओके' या घोषणेला जन्म देणारे जालना मधील काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) आता भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती समोर आली आहे. ही घोषणा जन्माला कशी आली, हे देखील कैलास गोरंट्याल यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
छत्रपती संभाजीनगर वादग्रस्त नेत्याला कैलास गोरंट्याल यांच्या मध्यस्थीने काॅलेज मिळवून दिलेलं आहे. आता तोच नेता गोरंट्याल यांच्याविरोधात आहे. याच काॅलेजमधील एक शिक्षक गोरंट्याल यांच्याकडे एकटा आला होता. त्यावेळी शिक्षकाने शिवसेनेतील सर्व बंडखोर गुवहाटीला गेल्याचे गोरंट्याल यांना सांगितले. गोरंट्याल यांनी देखील होकारार्थी मान करत, हो करेक्ट, असे म्हटले. कैलास गोरंट्याल यांनी संबंधित शिक्षकाला, कशासाठी आलात? असा प्रश्न केल्यावर, त्याने 50 खोक्यांची ऑफर आहे तुमच्यासाठी!, असा किस्सा गोरंट्याल यांनी स्वतः एका मुलाखतीत सांगितला आहे.
या किस्स्यानंतर काही दिवसांनी कैलास गोरंट्याल हे मुंबईला गेले. तिथं काँग्रेस नेत्यांना या ऑफरचा प्रकार सांगितला. आपल्याला लोकं ऑफर देत आहे, तुम्ही काहीतरी करा! त्याचवेळी शहाजीबापू पाटील यांचा, 'काय झाडी, काय डोंगर, एकदम ओके', हा डायलाॅग चर्चेत होता. त्याचवेळी कैलास गोरंट्याल यांच्या डोक्यात, या डायलाॅगला रिप्लाय देताना, '50 खोके, एकदम ओके!', असा डायलाॅग दिला. हा डायलाॅग, ही घोषणा पुढं राज्यसह देशात फेमस झाली.
ही घोषणा एवढी फेमस झाली की, सत्ताधारी एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी ठरली. अनेकदा या घोषणेवर वादाचे प्रसंग झाले. सर्वसामान्यांच्या तोंडात आजही घोषणा एकदम बाहेर पडते. या घोषणेवर बंदी घालावी यासाठी एकनाथ शिंदे यांनी न्यायालयात देखील धाव घेतली होती. मुंबई उच्च न्यायालयाने '50 खोके एकदम ओके' अशी घोषणा देणं हा गुन्हा नसल्याचा निकाल दिला. आता ही घोषणेचा जनकच कैलास गोरंट्याल काँग्रेसमध्ये नाराज असल्याची बातमी समोर आली आहे.
कैलास गोरंट्याल यांना शेरोशायरीची आवड आहे, भाजपच्या वाटेवर आहात, वरिष्ठ नेत्यांशी चर्चा झाली आहे, यावर बोलतांना त्यांनी 'आईना बनने का हर्जाना तो भरना है मुझे। टूट तो कब का चूका हूँ बस बिखरना है मुझे। कम से कम इतना बता दे मेरी सादा दिली और कितने इम्तिहानों से गुजरना है मुझे?', आणि 'हज़ारों जवाबों से अच्छी है मेरी खामोशी, न जाने कितने राजों कों पडदा रखती है', असा शेर सुनावत काँग्रेसला सूचक इशारा दिला.
काँग्रेसमध्ये नाराज असलेले कैलास गोरंट्याल यांना उद्या (शनिवारी) खासदार कल्याण काळे यांची भेट घेणार आहे. तिथं काय तोडगा निघतो, याकडे आता लक्ष असले आहे. पण आता थांबणार नाही, असे सांगून कैलास गोरंट्याल यांनी काँग्रेसला धक्का देणार, अशी तयारी केल्याचे दिसते. काँग्रेसमध्ये एकाकी पडल्याचे खंत गोरंट्याल यांना आहे. पक्ष नेतृत्व अन् वरिष्ठांकडून न्याय मिळत नसल्याची खंत, गोरंट्याल यांनी बोलावून दाखवली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.