Jayant Patil : इस्लामपुरात कोणत्या पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'? जयंत पाटलांची प्रतिष्ठा पणाला...

Jayant Patil and Nishikant Patil Political equation : विकासकामांतील उणिवा व जयंत पाटील यांच्या मालकीच्या कारखान्याकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक या मुद्द्यावर मतदार आपल्याला निवडून देतील असा दावा निशिकांत पाटलांचा आहे.
jayant Patil, Nishikant Patil
jayant Patil, Nishikant PatilSarkarnama
Published on
Updated on

Sangli News: इस्लामपूर (Islampur) विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील यांच्या विरोधात इतिहासात पहिल्यांदाच सर्व पारंपारिक विरोधक एकत्र आल्याने निशिकांत पाटील यांनी कडवे आव्हान उभे केले आहे. दोन्ही बाजूकडून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. प्रारंभी जयंत पाटलांना सहजसोपी वाटणारी निवडणूक आता काटे की टक्कर वर जाऊन पोहचली आहे.

गेल्या 35 वर्षांच्या आपल्या विकासकामांवर व जनसंपर्कावर आपण सहज निवडून येऊ असा विश्वास जयंत पाटील यांना आहे, तर विकासकामांतील उणिवा व जयंत पाटील यांच्या मालकीच्या कारखान्याकडून ऊस उत्पादकांची पिळवणूक या मुद्द्यावर मतदार आपल्याला निवडून देतील असा दावा निशिकांत पाटलांचा आहे.

इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात जयंत पाटील सलग सात निवडणूका सहज जिंकले आहेत. आजपर्यंत त्यांना कोणत्याही निवडणूकीत फारसे कष्ट करावे लागले नव्हते. मात्र राष्ट्रवादीच्या फुटीनंतर होणारी ही पहिली निवडणूक आहे.

राष्ट्रवादी अजितदादा गटाने जयंत पाटलांना (Jayant Patil) मतदारसंघात अडकवून टाकण्यासाठी पुर्वाश्रमीचे जयंत पाटलांचे समर्थक निशिकांत पाटील यांना अजितदादा गटाकडून उमेदवारी देत मोठे आव्हान निर्माण केले. जयंत पाटील यांच्या सहकारी साखर कारखानदारीचे जाळे, दूध संघ, राजारामबापू बँक, शिक्षण संस्था यांच्या माध्यमातून गावोगाव कार्यकर्त्यांचे केडर या जमेच्या बाजू आहेत.

jayant Patil, Nishikant Patil
Vinod Tawde : विनोद तावडेंना पैसे वाटताना पकडले? 'या' दोन महिला नेत्यांनी भाजप अन् निवडणूक आयोगाला सुनावलं! पाहा VIDEO

या बरोबरच राज्याच्या मंत्रीमंडळात आजपर्यंत मोठ्या पदावर मिळालेल्या मंत्रीपदाच्या संधीमुळे त्यांनी तालुक्यातील विकासकामे मोठ्या प्रमाणात केली आहेत. गावोगाव त्यांचा असलेला संपर्क त्यांना या निवडणूकीत तारुन नेईल. तर निशिकांत पाटील यांनी नगराध्यक्ष पदाच्या कार्यकाळात इस्लामपूर शहरासह तालुक्यात भाजप सरकारच्या माध्यमातून केलेली विकासकामे व त्यातून आलेला गावोगाव संपर्क ही निशिकांत पाटील यांची जमेची बाजू आहे.

jayant Patil, Nishikant Patil
Vinod Tawde Latest News : मोठी बातमी! विनोद तावडे अन् भाजप उमेदवार नाईकांना निवडणूक आयोगाचा दणका!

प्रकाश हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यातील लोकांना कोविडकाळात केलेली मदत निशिकांत पाटील यांना फायद्याची ठरु शकते. या बरोबरच तालुक्यातील सर्व विरोधी गट त्यांच्या बरोबर आहेत. त्याचाही फायदा होऊ शकतो. प्रचारादरम्यान जयंत पाटील व निशिकांत पाटील या दोघांच्याही सभांना मतदारसंघात मोठा प्रतिसाद होता. जयंत पाटलांना रोखण्यासाठी निशिकांत पाटील यांना मोठे कष्ट घ्यावे लागतील.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com