Jitendra Awhad News : देशप्रेमाच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी थेट देशाचा तिरंगा ध्वज बदलण्याचा उद्योग शिर्डी येथील मेळाव्यात केल्याच्या चर्चा होत आहेत. त्यांनी थेट देशाच्या तिरंगा हा ‘हिरवा’ झाल्याचा दाखला देत, तो नागपूरच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर फडकविल्याचे भाषणाच्या ओघात ठोकून दिले. (Latest Marathi News)
आव्हाडांना देशाचा झेंडा ‘हिरवा’ करण्याची घाई तर झाली नाही ना, असा प्रश्न यातून निर्माण होतो. यावर आव्हाड काही प्रतिक्रिया देतील की, नाही असा प्रश्न उपस्थित होतो. थेट देशाचं प्रतिक, सन्मान असलेला तिरंगा हा ‘हिरवा’ कसा होईल, असा साधा विचार आव्हाड यांच्या सारख्या नेत्यांना नसावा हे आश्चर्यजनक आहे. वादग्रस्त विधानाच्या नादात त्यांनी जाणीवपूर्वक थेट तिरंगाच ‘हिरवा’ केला का असा प्रश्न निर्माण होतो. आरएसएस ही हिंदूत्ववादी संघटना आहे. हे आव्हाडांना माहित असताना उगाच ‘हिरवा’ झेंडा आरएसएसच्या कार्यालयावर लावल्याचा नवा दाखला देण्यामागे आव्हाडांचा हेतू काय, याचा ही शोध घेण्याची गरज आहे. राज्यातील राजकीय वातावरण गढूळ असताना ‘हिरवा’ च्या नावाखाली आव्हाड सामाजिक वातावरण गढूळ तर करत नाही, असा संशय बळावत आहे.
'हे भांडण विचारांच्या विरोधात आहे. फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांसाठी लढायचे आहे. शिवाजी महाराजांसाठी लढायचे आहे. तुम्हाला माहित आहे का? हिरवा झेंडा आरएसएसच्या कार्यालयावर कधी लागला. माहित आहे कोणाला? १९९३ साली कोणी लावला. काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांनी घुसून लावला. त्यांच्यावर आज ही केसेस सुरु आहेत. कसल्या देश प्रेमाच्या गोष्टी शिकवता?’ असे आव्हाड म्हणाले.
आव्हाडांना देशाचा झेंडा तिरंगा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यात तिरंगा याची आठवण नसावी इतके ते विसरभोळे नसतील. केवळ राजकीय विरोधासाठी विरोध आणि वादग्रस्त विधान आव्हाडांनी टाळले असते तर बरे झाले असते, असा सुर नेत्यांमध्ये आहे. आव्हाडांना देशाचा झेंडाच ‘हिरवा’ करण्याची घाई तर झाली नाही ना, अशी विचारणा सुरु झाली आहे. कुणाचे लांगुनचालन करण्यासाठी आव्हाडांना तिरंगा ‘हिरवा’ करायचा आहे. असा ही नवा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.
भगवा आणि हिरवा याच्यात तर नवा वाद आव्हाडांना उभा करायचा तर नाही, अशी शंका उपस्थित होते. राजकीय विरोध असावा. पण, तो करताना देशांच्या प्रतिकांचा सन्मानाला तडा जाणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. आरएसएसने तिरंगा त्यांच्या मुख्यालयात लावला नाही. हा मुद्दा सांगताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी हिरवा झेंडा नागपूर येथे कार्यालयात लावला हा जावईशोध, आव्हाडांनी कसा केला? असा प्रश्न निश्चित उपस्थित होतो.
अयोध्येत राम मंदिर उदघाटन सोहळा जवळ आल्यामुळे जितेंद्र आव्हाडांना थेट रामाला बहुजन करण्याच्या नादात राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असा नवा दावा केला आहे. त्यावरुन जोरदार वाद सुरु असताना आव्हाडांनी शिर्डी येथील याच मेळाव्यात गांधी आणि नेहरु यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले, हे ठासून सांगण्याची गरज व्यक्त केली. हे सांगताना त्यांनी गांधी हे ओबीसी होते म्हणून त्यांना विरोध झाल्याचा दाखला दिला. तर गांधींवर 1947, 1935, 1938, 1942 मध्ये हल्ले झाल्याचा दाखला दिला. ते हल्ले पाकिस्तान निर्मितीच्या पूर्वी झाले, पच्चावन्न कोटींच्या विरोधांपुर्वीचे होते, संविधानच्या निर्मितीच्या पुर्वीचे हे हल्ले गांधींवर झाले, असे दाखले आव्हाडांनी दिले.
तसेच, गांधी हे ओबीसी होते म्हणून त्याच्यावर हल्ले झाले असा दावा करण्यास ही आव्हाड यांनी मागेपुढे पाहिले नाही. तर गांधी हत्या ही जातीयवादामुळे झाल्याचे आव्हाड म्हणाले. राजकारणात आपण वाहत जातो. राम बहुजनाचा आहे. शिकार करुन खाणारा राम, तो आमचा आहे आमच्या बहुजनाचा राम, तुम्ही जिथे सर्व आम्हाला शाकाहारी बनावयाला जाता आहात. तिथे आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत. आम्ही आज मटन खातो आहोत. हा रामाचा आदर्श आहे तो शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता. चौदा वर्ष जंगलात राहणारा माणूस कुठे जाणार हो शाकाहारी शोधायला. जे बोलतो ते खरे बोलत असतो मी असे ही सांगायला आव्हाड विसरले नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.