Pankaja Munde : पत्नीच्या आत्महत्येनंतर अनंतचा फोन आला, पंकजा मुंडेंनी काय घडलं ते सांगितलं

PA Anant Garje Gauri Death : पंकजा मुंडे यांचा पीए अनंत गर्जे याला पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, गौरीच्या आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
PA Anant Garje Gauri Death Pankaja mundeSarkarnama
Published on
Updated on

Pankaja Munde News : मंत्री पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डाॅ. गौरी गर्जे यांनी शनिवारी गळफास घेत आत्महत्या केली. या प्रकरणात वरळी पोलिस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. दरम्यान, या प्रकरणावर मंत्री पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या, शनिवारी सायंकाळी अनंतचा फोन माज्या दुसर्‍या पीएच्या फोनवर आला. त्याने आक्रोश करत सांगितले की त्याची पत्नी गौरीने आत्महत्या केली आहे. ही गोष्टी माझ्यासाठी खूप धक्कादायक होती.

मी पोलिसांना योग्य तपास करून हे प्रकरण हाताळण्याच्या सूचना केल्या आहेत.मी गौरीच्या वडिलांशी बोलले ते प्रचंड दुःखी आहेत. या प्रकरणात पोलिसांनी कारवाईत कोणताही कसूर ठेऊ नये, असे देखील पंकजा मुंडे म्हणाल्या.

गौरीच्या वडिलांनी गौरीने आत्महत्या नव्हे तर तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप केला आहे. अनंत याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. गौरी हिला घरात गर्भपात करण्यासंदर्भात काही कागदपत्र मिळाली होती. त्यावर अनंतचे पती म्हणून नाव होते. या संदर्भात गौरीने घरच्यांना सांगू नये म्हणून अनंत गौरीवर मानसिक दबाव टाकून तिला आत्महत्येची धमकी देत होता. तसेच आत्महत्या करताना तिचे नाव चिठ्ठीत लिहिन असे म्हणत होता.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Pune Politics: अजित पवार- उद्धव ठाकरेंच्या पक्षाची युती; दौंड नगरपालिका निवडणूक रंगतदार होणार

अनंतला पोलिसांकडून अटक

गौरीच्या आत्महत्ये प्रकरणी अनंतसह त्याचा भाऊ आणि बहीण यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर अनंत फरार होता. मात्र, रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली.मिळालेल्या माहितीनुसार अनंत मध्यरात्री एकच्या सुमारास पोलिसांना शरण आला.

हत्या नसून आत्महत्याच...

गौरीचे आई-वडिलांनी ही हत्या नसून आत्महत्या असल्याचा आरोप केला आहे. करुणा मुंडे यांनी देखील हे आत्महत्येचे प्रकरण नसून हत्येचे प्रकरण आहे. पोलिस गुन्हा दाखल करून घेत नव्हते तेव्हा गौरीच्या नातेवाईकांनी आपल्याला फोन केला होता, असे देखील सांगितले.

PA Anant Garje Gauri Death Pankaja munde
Sunil Tatkare : गोगावलेंनी नगरपंचायतीवर भगवा फडकवत राष्ट्रवादीला धक्का दिला, तेथेच तटकरेंनी शिवसेनेचा काटा काढला, इशाराही देत म्हणाले, 'गद्दारांना माफी...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com