Raju Shetti
Raju Shetti Sarkarnama

Raju Shetti : 'शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर...'; राजू शेट्टींचा कारखानदारांना थेट इशारा

Swabhimani Shetkari Sanghatana: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आक्रमक
Published on

Kolhapur News: "जे लोकं जिल्हा बँकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढले, ते लोकं आता एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मातीत घालण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्वत:च्या तुंबड्या भरून घेण्यासाठी शेतकऱ्यांना देशोधडीस लावणार असतील, तर मी स्वस्थ बसणार नाही.

शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल, तर मी कोणालाही अंगावर घेण्यास तयार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिला. 2 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मोटार सायकल रॅलीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी शिरोळ येथील निवासस्थानी प्रमुख पदाधिकारी यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते.

Raju Shetti
Raju Shetti: हुपरी पोलिसांची कारखानदारांवर मेहेरबानी ? कर्नाटकातील ऊस बंदोबस्तात महाराष्ट्रात आणण्याचा ठेका; शेट्टींचा आरोप

"जिल्ह्यातील साखर कारखानदार एकत्र येऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दुसरा हप्ता देण्यास नकार देऊन चालू गळीत हंगामातील एफआरपी जाहीर करून गळीत हंगाम सुरू करत आहेत. हे आम्हाला मान्य नाही. पुढील वर्ष साखर उद्योगासाठी चांगले जाणार आहे.

साखरेला जवळपास 3600 पासून ते 4200 रुपयांपर्यंत दर मिळणार आहेत. यामुळे यावर्षी एफआरपी आम्हाला मान्य नसून ऊस परिषदेत जो दर ठरेल तो घेतल्याशिवाय आम्ही हंगाम सुरू देणार नाही", असा थेट इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोटारसायकल रॅली कार्यकर्त्यांनी शांततेने पूर्ण करून ज्या ठिकाणी ऊसतोडी सुरू आहेत, त्या बंद कराव्यात. ज्या ठिकाणी पोलिस बळाचा वापर केला जाईल, तिथे गांधीजींच्या मार्गाचा अवलंब करावा. मात्र, जर कारखानदारांनी दादागिरी केली, तर जशास तसे उत्तर द्या. वेळप्रसंगी कायदा हातात घेऊन या ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यास वकिलांची फौज दाखल करू, मात्र आपल्या घामाच्या दामासाठीची लढाई जिंकूनच शांत बसायचे आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले.

दरम्यान, या वेळी सावकर मादनाईक, विठ्ठल मोरे, वैभव कांबळे, राम शिंदे, शैलेश आडके, सचिन शिंदे, सागर शंभूशेटे, रामचंद्र फुलारे, राजगोंडा पाटील, अजित पाटील, राजाराम देसाई यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Edited By- Ganesh Thombare

Raju Shetti
Maharashtra Drought: जत तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले; संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची गाडी फोडली

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com