तळ कोकणात शिवसेना अन् भाजपचा मास्टरस्ट्रोक! विद्यमान आमदार भास्कर जाधव आणि शेखर निकम यांचा गेम होणार?

konkan politics : तळ कोकणातील राजकारणात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चुरस वाढली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही आघाड्या सत्ता हस्तगत करण्यासाठी मोर्चेबांधणी करत आहेत.
konkan politics
konkan politicssarkarnama
Published on
Updated on

Summary :

  1. तळ कोकणात महायुती आणि महाविकास आघाडीने स्थानिक निवडणुकांसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

  2. महायुतीने रत्नागिरीतील गुहागर आणि चिपळूण मतदारसंघावर दावा करत वातावरण तापवलं आहे.

  3. शिवसेना भास्कर जाधवांना लक्ष्य करत आहे, तर भाजपचे लक्ष अजितदादांच्या आमदारावर आहे.

Ratnagi News : कोकणाचा मध्यबिंदु म्हणून ओळख असलेला चिपळूण आणि गुहागर तालुका सध्या राजकारणाचा केंद्रबिंदु झाला आहे. भाजप, शिवसेना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अशा साऱ्याच पक्षातील राजकारण इथे दरदिवशी बदलताना दिसत आहे. महायुती असली तरी भाजपच शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा गेम करत आहे. ही गेम करताना न कळत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही जखम झाली आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेनेकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मोकळा करण्याची जणू मोहीमच आखली आहे.

काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते, उद्योगमंत्री उदय सामंत आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपण चिपळूण आणि गुहागरकडे लक्ष देणार असे सांगितले होते. या दोन्ही ठिकाणी शिवसेनेचा आमदार विजयी होण्याच्या दृष्टीने पाऊले उचलणार, असा इरादा त्यांनी बोलून दाखवला होता. त्यानंतर भाजप नेते, मंत्री नितेश राणे यांनी देखील आपण चिपळूणमध्ये कमळ फुलवू असा दावा केला होता. या नेत्यांनी त्यादृष्टीने आता पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. पक्षप्रवेश, राजकीय मेळावे यांनी इथले वातावरण ढवळून निघाले आहे.

konkan politics
konkan Politic's : भरत गोगावलेंच्या पालकमंत्रिपदासाठी आता उदय सामंत करणार मुख्यमंत्र्यांकडे शिष्टाई; स्वातंत्र्यदिनी ध्वजवंदनासाठी प्रयत्नशील

शिवसेनेचा शिवसेनेला धक्का :

विधानसभा निवडणुकीत भास्कर जाधव यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना, उदय सामंत यांनी अथक प्रयत्न केले. ऐनवेळी राजेश बेंडल यांच्या रुपाने कुणबी कार्ड वापण्यात आलं. मात्र भास्कर जाधव यांचा निसटता विजय झाला. ते मंत्री होतील अशी अटकळ बांधली जात होती पण राज्यात पुन्हा महायुतीचेच सरकार सत्तेत आले. आज जाधव यांना विरोधी पक्षनेते पदही अजून मिळालेले नाही. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही त्यांना घेरण्यासाठी महायुतीने तयारी केली आहे. मतदारसंघातील त्यांची पकड संपवण्यासाठी विरोधकांनी फिल्डिंग लावली आहे.

विधानसभा निवडणुकीत जाधव यांच्या खांद्याला खांदा लावून महायुतीच्या विरोधात लढलेल्या बाळाशेठ जाधव यांच्यासह दापोलीच्या 14 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यापाठोपाठ नुकताच जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर आणि जिल्हा परिषद सदस्य नेत्रा ठाकूर यांनी देखील भास्कर जाधव यांची साथ सोडली. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. आपल्या संपर्कात अजूनही त्यांचे काही प्रमुख चेहरे असून ते कामासाठी, निधीसाठी आपल्याकडे येत असल्याचा दावा देखील रामदास कदम यांनी केला होता.

प्रशांत यादव यांचा भाजपप्रवेश :

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षालाही धक्का देण्याचे नियोजन मंत्री उदय सामंत यांनी केले होते. प्रशांत यादव शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरु होती. ते उदय सामंत आणि त्यांचे बंधू, राजापूरचे आमदार किरण सामंता यांच्या संपर्कात होते. त्याचवेळी नितेश राणे यांनी चिपळूणच्या राजकारणात एन्ट्री घेतली. सामंत यांच्यावर कुरघोडी करत यादव यांना भाजपकडे वळवले. शिवसेनेच्या वाटेवर असणारे प्रशांत यादव आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

इथे भाजपने केवळ शिवसेनेकडे जाणारा नेताच पळवला असं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार शेखर निकम यांच्याविरोधात 2029 मधील उमेदवारही जाहीर केला आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अवघ्या 6 हजार मतांनी प्रशांत यादव मागे पडले. शेखर निकम आमदार झाले. पण आता यादव यांना येत्या पाच वर्षात भाजपकडून ताकद दिली जाईल. त्याच्या जोरावर 2029 च्या विधानसभा निवडणुकीत चिपळूण मतदार संघातून तेच आमदारही होतील, असा विश्वास नितेश राणे यांनी व्यक्त केला आहे.

त्याचवेळी राणे यांनी प्रशांत यादव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळण्यासाठी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही दिले आहेत. या संकेतांमुळे आणि प्रशांत यादव यांच्या प्रवेशामुळे भाजप भक्कम होणार आहेच. पण शिवसेना विरूद्ध भाजप विरूद्ध अजितदादा असा वाद सुरू झाला आहे. तिसऱ्या बाजूला राणे यांनी सामंत यांच्यावर निधीवाटपातील दुजाभावाचे थेट आरोप केले. आमदारांना 20 कोटी रुपये मिळतात आणि खासदार नारायण राणे यांना केवळ 5 कोटी कसे मिळतात? असा सवालच राणे यांनी विचारला होता. इथेही महायुतीतील बेबनाव पुढे आला होता.

konkan politics
Konkan Shivsena Politics : ठाकरे गटाला कोकणात पुन्हा जोरदार धक्का! प्रमुख नेत्यासह पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेला रामराम

FAQs :

प्रश्न 1: गुहागर-चिपळूणवर दावा कोणी केला आहे?
👉 महायुतीने या दोन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे.

प्रश्न 2: शिवसेनेचे लक्ष्य कोण आहेत?
👉 शिवसेना भास्कर जाधवांना घेरण्याच्या तयारीत आहे.

प्रश्न 3: भाजपचे लक्ष कुठे आहे?
👉 भाजपचे लक्ष अजितदादांच्या आमदारावर केंद्रित आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com