Kunal Kamra controversy : कुणाल कामरा प्रकरणात आक्रमक शिंदेसेना विरोधक अन् नेटकऱ्यांच्या 'गुगली'मुळे अडचणीत

Kunal Kamra vs ShivSena : स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यासाठी हे संबोधन वापरल्यानंतर कार्यकर्ते पेटून उठले आणि येथेच शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होऊन बसली. शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा यांचा कार्यक्रम झाला त्या स्टु़डिओची तोडफोड केली आहे.
Rahul Solapurkar, Prashant Koratkar, Eknath Shinde
Rahul Solapurkar, Prashant Koratkar, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Kunal Kamra controversy : शिवसेनेतून फूटन बाहेर पडणाऱ्यांना गद्दार असे संबोधले जाते. छगन भुजबळ, नारायण राणे आदी नेते बाहेर पडले त्यावेळीही त्यांच्यासाठी शिवसैनिकांनी हे संबोधन वापरले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि त्यांच्यासोबत बाहेर पडलेल्या आमदार, खासदारांसाठीही असे संबोधून आधीच वापरून झाले आहे.

आधी जे बाहेर पडले होते, त्यांच्यासाठी शिंदे आणि त्यांच्या आमदारांनीही गद्दार असे संबोधन वापरलेच असणार. स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) यांनी एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता त्यांच्यासाठी हे संबोधन वापरल्यानंतर कार्यकर्ते पेटून उठले आणि येथेच शिंदेंच्या शिवसेनेची अडचण होऊन बसली. शिंदे यांच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा यांचा कार्यक्रम झाला त्या स्टु़डिओची तोडफोड केली आहे.

कामरा यांच्याविरोधात तक्रारही दाखल झाली आहे. देशभरात त्याचे पडसाद उमटत आहेत. शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी कामरा यांच्याविरोधात प्रतिक्रिया देण्यासाठी हिरीरीने समोर येत आहेत. शिवसेनेच्या (Shivsena) या भूमिकेमुळे कामरा यांचा तो व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. कामरा यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर केलेल्या या व्हिडिओला 38 लाखांपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आक्रमक झालेल्या शिवसेनेसमोर या प्रकरणामुळे अनपेक्षित असे संकट निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल सोलापूरकर, (Rahul Solapurkar) प्रशांत कोरटकर यांनी शिवराय, शंभूराजे यांच्याबाबत अवमानास्पद विधाने केली आहेत. त्यांच्या विरोधात शिंदे आणि त्यांची शिवसेना आक्रमक का झाली नाही? असा प्रश्न आता विरोधी पक्षांचे नेते आणि समाजमाध्यमांतही उपस्थित केला जाऊ लागला आहे.

शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेकडे, सरकारकडेही या प्रश्नाचे कोणतेही उत्तर नाही, असे दिसत आहे. शिंदे यांच्याविषयी अनेकदा वापरले गेलेले संबोधन कुणाल कामरा यांनी गीताच्या विडंबनातून पुन्हा एकदा वापरले. त्यावर कार्यकर्ते आक्रमक होतात, मात्र शिवरायांच्या अपमानावर आक्रमक होत नाहीत, असा संदेश समाजात गेला आहे. या वादानंतर कुणाल कामरा यांनी प्रतिक्रिया दिली असून, मी जे बोललो, तेच अजित पवार हेही एकनाथ शिंदेंबद्दल (Eknath Shinde) बोलले आहेत, असे ते म्हणाले आहेत.

Rahul Solapurkar, Prashant Koratkar, Eknath Shinde
Sushma Andhare On Eknath Shinde : 'गद्दार' म्हणून चर्चेत कोण आणतंय, शिंदेंनी आजूबाजूला बसणारे तपासावे! अंधारे यांचा थेट फडणवीसांकडे इशारा..

त्यामुळे शिंदे आणि शिवसेनेला बॅकफूटवर जावे लागणार आहे. कामरा जे बोलले ते खरेच आहे. अजितदादाच काय, उद्धव ठाकरे, त्यांचे आमदार, खासदार, कार्यकर्ते आणि लोकही शिंदे यांच्याबद्दल आधी असे बोललेलेच आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून शिंदे आणि त्यांच्या आमदार, खासदारांबद्दल अद्यापही ते संबोधन वापरलेच जात आहे. लोक समाजमाध्यमांत अजूनही त्याचा सर्रास वापर करत असतात.

कामरा यांनी सादर केलेल्या वि़डंबनात्मक गीतावर शिवसेना नको तितकी आक्रमक झाली. त्याचा शिवसेनेला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही. झाला तर तोटाच होईल. तो कसा, हे पाहा. शिवसेना सत्तेत आहे. सत्ताधाऱ्यांनी तोडफोड करणे म्हणजे त्यांचा कायद्यावर विश्वास नाही, असा अर्थ होतो. शिवाय, शिवराय, शंभूराजांच्या अपमानावर शिंदे, त्यांची शिवसेना आक्रमक झाली नाही.

ज्यांचे नाव घेऊन राजकारण करतो, त्या शिवरायांच्या अपमानावर शिंदे आणि शिवसेना आक्रमक का झाली नाही, असा प्रश्न आता लोक उपस्थित करत आहेत. या प्रश्नाचे उत्तर नसल्यामुळे एकनाथ शिंदे यांची मोठी कोंडी झाली आहे. कामरा यांनी केलेल्या विडंबनावर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्यावर अशी टीका आधीपासूनच झाली आहे, मात्र त्याला कामाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे.

Rahul Solapurkar, Prashant Koratkar, Eknath Shinde
Kunal Kamra Latest Video : हम होंगे कंगाल..! कुणाल कामराने पुन्हा शिवसेनेला ललकारलं; नवीन गाण्याचा व्हिडीओ पोस्ट

त्यामुळे आपल्या 80 पैकी 60 जागा निवडून आल्या आहेत, असे शिंदे म्हणाले आहेत. शिंदे यांची भूमिका अशी समंजस असेल तर तोडफोड करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कान त्यांनी उपटायला हवेत. कार्यकर्त्यांच्या आततायीपणामुळे शंदेंची शिवसेना बॅकफूटवर गेली आहे. शिवराय, शंभूराजांचा अपमान झाला त्यावेळी आक्रमकता का दाखवली नाही, या कळीच्या प्रश्नाला शिंदे यांना सामोरे जावे लागत आहेत.

विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या जागांवर आश्चर्य व्यक्त झाले होते. त्याच्या सहा महिने आधी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीचा मोठा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीत लाडकी बहीण योजनेने महायुतीला तारले, असे सांगितले जाते. विरोधकांनी अन्य आरोपही केले आहेत.

मात्र त्याबाबत त्यांच्याकडे कायदेशीर पुरावे नाहीत. त्यामुळे केवळ कामामुळे लोकांनी भरभरून जागा दिल्या, असे जे शिंदे म्हणताहेत त्यावर मतमतांतरे आहेत. यापूर्वी अनेकदा वापरून झालेले असले तरी गद्दार हे संबोधन शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेसाठी जिव्हारी लागणारे आहे. शेवटपर्यंत हे संबोधन त्यांची पाठ सोडणार नाही, असे दिसत आहे. आक्रमक होऊन कार्यकर्त्यांनी जणू त्याची प्रचीतीच दिली आहे.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com