Kolhapur Political News : लोकसभा २०१९ च्या निवडणुकीत आमचं ठरलं या फॅक्टरमुळे कोल्हापूर मतदारसंघाची निवडणूक गाजली होती. राज्यातील सत्ता नाट्यामुळे यंदा हा फॅक्टर चालण्याची शक्यता फारच कमी आहे. मागील निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेले नेते हे प्रचाराच्या निमित्ताने एकत्रच खांद्याला-खांदा लावून मैदानात असणार आहेत.
आता कोल्हापूर लोकसभेत सहा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण बदल झाले. सहापैकी चार विधानसभा मतदारसंघात महायुतीचे बलस्थाने कायम आहेत. मात्र महाविकास आघाडीने शाहू महाराज यांच्या रूपाने टाकलेल्या डावानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील जनता कोल्हापूरच्या छत्रपतींच्या सोबत राहणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या स्वप्नाला साथ देणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.
कोल्हापूर उत्तर, कोल्हापूर दक्षिण आणि करवीर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार काँग्रेसचे आहेत. महाविकास आघाडीसाठी ही बलस्थान आहेत. शिवाय इतर विधानसभा मतदारसंघात शाहू महाराज (Shahu Maharaj Chhatrapati) यांच्याबद्दल आदर असणारा प्रचंड मतदार महाविकास आघाडीच्या बाजूने असणार आहे. त्याचबरोबर राधानगरी, कागल, चंदगड हे एकतर्फी महायुतीच्या सोबत असणारे मतदारसंघ आहेत. मात्र सहा विधानसभा मतदारसंघात लोकसभा निवडणुकीची जोडणा ही विधानसभा निवडणुकीच्या धर्तीवरच करावी लागणार आहे. त्याचे आव्हान जिल्ह्यातील सर्वच नेत्यांसमोर असणार आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
महायुतीमधील सर्वच लोकप्रतिनिधींवर विधानसभेतील विरोधकांना या लोकसभा निवडणुकीत एकत्र करण्याचे आव्हान पालकमंत्री हसन मुश्रीफ, राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), खासदार संजय मंडलिक यांच्यासमोर आहे. शिवाय विधानसभेला त्यांची भूमिका काय असणार, हे सांगणे देखील कठीण आहे. अशा परिस्थितीत महायुती या लोकसभा निवडणुकीत कोणते डावपेच आखून महायुतीतील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादीतील नेत्यांना एकसंघ करून निवडणुकीला सामोरे जाईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.
दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये हीच परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीत एकत्र आले असताना विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांना देखील कोणता शब्द देण्यात येणार याचे मोठे आव्हान काँग्रेस नेते सतेज पाटील (Satej Patil), शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांच्यावर आहे. दरम्यान, या सर्व घडामोडीवर 'सरकारनामा'ने कोल्हापूर जिल्ह्यातील सहा लोकसभा मतदारसंघात राजकीय बेरजेचे विश्लेषण मांडले आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.