Bhausaheb Wakchaure : 2014 मध्ये ऐनवेळी साथ सोडणारे भाऊसाहेब वाकचौरे ठाकरेंना पुन्हा 'लकी' ठरणार का?

Lok Sabha Election 2024 : 2014 मध्ये दिलेली संधी देऊनही वाकचौरेंनी ठाकरेंना तोंडघशी पाडले होते. यानंतरही त्यांच्या हाती विश्वासाने मशाल सोपावली.
Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Uddhav Thackeray, Bhausaheb WakchaureSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar Political News : माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे तसे लकीच म्हणावे लागतील. उद्धव ठाकरेंनी 2014 मध्ये भाऊसाहेब वाकचौरेंना संधी दिली होती. परंतु त्यांनी ऐनवेळी शिवबंधन सोडले. एकदा तोंडघशी पाडलेले असतानाही उद्धव ठाकरेंनी खूप विश्वासाने भाऊसाहेब वाकचौरेंच्या हाती निष्ठेची मशाल सोपावली आहे. आता महाविकास आघाडीतील नाराज आणि इच्छुक असलेल्यांची समजूत काढण्याची कसरत वाकचौरेंना करावी लागणार आहे. त्यामुळे यावेळी वाकचौरे ठाकरेंच्या विश्वासास पात्र ठरणार का, अशी चर्चा सुरू आहे.

भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Wakchaure) प्रशासकीय यंत्रणेत सुरूवातीला ते गटविकास अधिकारी होते. पुढे साई-मंदिराचे कार्यकारी अधिकारी झाले. प्रशासकीय कामकाजात तरबेज असलेल्या भाऊसाहेब वाकचौरे पुढे 2009 मध्ये थेट शिर्डीचे खासदार झाले. ही जणू काही लाॅटरी लागली. शिर्डी मतदारसंघावर तसे विखे यांचे वर्चस्व राहिलेले! परंतु 2009 मध्ये शिर्डी मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Lok Sabha Election 2024 : साताऱ्यासाठी चढाओढ! उदयनराजेंनी दंड थोपटले, पण अजित पवार गटाची भूमिका काय?

हीच संधी साधत वाकचौरे यांनी प्रशासकीय सेवेतून निवृत्ती घेतली. शिवसेनेत प्रवेश केला आणि 2009 साली रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athwale) यांना पराभूत केले. रामदास आठवले यांच्या पराभवामुळे कुठेतरी मराठा बहुल असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जातीय किनार होती. तसेच आपल्या जिल्ह्यातील आपला माणूस, अशी देखील भावनिक साथ मतदारांनी वाकचौरेंना दिली.

भाऊसाहेब वाकचौरे 2009 मध्ये खासदार झाल्यानंतर त्यांची राजकीय वाटचाल सर्वस्वी विखेंवर अवलंबून राहिली. विखे सांगतील, तसा त्यांचा राजकारणात भर राहिला. असे असले तरी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी वाकचौरेंना 2014 च्या लोकसभा निवडणुकीत सुरूवातीलाच उमेदवारी जाहीर केली. परंतु वाकचौरे यांनी विखेंच्या म्हणण्यानुसार शिवसेनेला ऐनवेळी सोडचिठ्ठी देत काँग्रेस पक्षात प्रवेश करत लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी शिवसेना-भाजप युती होती.

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Rajendra Gavit News : पालघरसाठी राजेंद्र गावितांच्या उमेदवारीला भाजपकडून अगोदर झाला विरोध मात्र नंतर..!

वाकचौरेंनी दगा दिल्यानंतर शिवसेनेने सदाशिव लोखंडेंना (Sadashiv Lokhande) संधी दिली. लोखंडेंनी वाकचौरेंना पराभूत केले. पक्षातूनच मदत न मिळाल्याने पराभव झाल्याचा आरोप वाकचौरे यांनी केला होता. या लोकसभेनंतर वाकचौरेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपमध्ये प्रवेश केला. श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी आमदारकी लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला. काँग्रेसकडून लढणारे भाऊसाहेब कांबळे तिथे दुसर्‍यांदा आमदार झाले. शिवसेनेकडून निवडणूक लढविणारे लहू कानडे तिसर्‍या क्रमांकावर राहिले.

लोकसभा आणि विधानसभा 2019 मध्ये भाऊसाहेब वाकचौरे यांनी शांत राहण्याचा निर्णय घेतला. शिवसेना फुटल्यानंतर विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे नेतृत्व मान्य केले. त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवाराचा उद्धव ठाकरेंकडून शोध सुरू झाला. हीच संधी साधत लोकसभा 2024 साठी निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य करत वाकचौरे यांनी भाजपला 'राम राम' केला.

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
Loksabha Election 2024 News : सांगलीच्या जागेवरून पृथ्वीराज चव्हाणांच्या घरात खलबत्तं; तडजोड करून कॉंग्रेस लढवणार

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या धरसोड वृत्तीमुळे त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातूनच विरोध होत आहे. शिवसेनेचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीही वाकचौरेंसारखाच शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारी मिळावी, यासाठी तयारी सुरू केली होती. परंतु कांबळेंनी ऐनवेळी ठाकरे गटाची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात सामील झाले आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाची (Shirdi) विचार केल्यास सुरूवातीलापासून शिवसेना उद्धव ठाकरेंसोबत राहिला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून अजून उमेदवार जाहीर झालेले नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे शिर्डीसाठी कायमच आग्रह धरला आहे. त्यामुळे कामाला लागण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्याचा दावा करत खासदार सदाशिव लोखंडे मतदारसंघात पुन्हा अॅक्टिव्ह झाले आहेत.

खासदार लोखंडे यांच्यावर पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्तेच नाराज असल्याचे सांगितले जाते. गत पाच वर्षात त्यांनी मतदारसंघात संपर्क न ठेवल्याचा आरोप होत आहे. याचा फायदा भाऊसाहेब वाकचौरे घेणार नाहीत, असे होणार नाही. तरी देखील खासदार लोखंडे यांना शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर झाल्यास माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि खासदार लोखंडे यांच्या सरळ लढत होणार असून त्याकडे राज्याचे लक्ष आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray, Bhausaheb Wakchaure
High Court News : सत्तारांकडून सरकारी निधीचा गैरवापर; आठ आठवड्यात निर्णय घ्या..

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com