Maharashtra Political leaders : कोणतंही प्रकरण असूद्या, 'त्या' नेत्यांची नावं आलीच म्हणून समजा! ही घ्या यादी...

Political Controversies in Maharashtra : गुंड नीलेश घायवळ प्रकरणातही मोठी राजकीय लिंक समोर आली. विरोधकांकडून राम शिंदे, संतोष बांगर यांची थेट नावे घेण्यात आली. तर सत्ताधारी भाजपकडून रोहित पवारांवर निशाणा साधण्यात आला.
Maharashtra Politics
Maharashtra PoliticsSarkarnama
Published on
Updated on

Impact of Scandals on Maharashtra’s Political Landscape : मागील काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकीय वतुर्ळात अनेक महत्वाच्या घडामोडी घडल्या आहेत. अनेक अराजकीय घटनांचे थेट राजकीय नेत्यांशी कनेक्शन जोडले जात आहेत. राजकीय नेत्यांसह काही सामाजिक कार्यकर्त्यांकडूनही ही प्रकरणे समोर आणली जात आहे. त्यामुळे महाराष्ट्रात सध्या कोणतंही प्रकरण बाहेर येऊद्या, त्यात काही ना काही राजकीय लिंक असल्याचे समोर आले आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात आतापर्यंत अशी अनेक उदाहरणे आहेत. पण मागील काही महिन्यांतील उदाहरणे घेतली तरी त्याची तीव्रता समजू शकेल. त्याची बरीच लांबलचक यादी आहे. काही महत्वाच्या प्रकरणांवरच प्रकाश टाकला तरी राजकीय नेत्यांची लागेबांधे कसे-कुठे असतात, याची झलक पाहायला मिळेल. त्यातून महाराष्ट्राच्या समृध्द राजकीय संस्कृतीचा कसा ऱ्हास होत चालला आहे, हे दिसते. 

महिला डॉक्टर आत्महत्या

फलटण येथील एका महिला डॉक्टरने चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली. तिच्या तळहातावरील सुसाईड नोटवरून या प्रकरणात एक पोलीस उपनिरीक्षकासह आणखी एका व्यक्तीचा हात असल्याचे स्पष्ट दिसते. पण हळूहळू तिची पोलीस आणि चौकशी समितीला लिहिलेली पत्रं बाहेर आली अन् त्यासोबत या प्रकरणाचे राजकीय कनेक्शनही. चौकशी समितीला केलेल्या खुलाशामध्ये पीडितीने एका खासदार आणि त्यांच्या दोन पीएचा उल्लेख केल्याचे समोर आले आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले. आता हे खासदार कोण, याचा मात्र खुलासा झालेला नाही.

Maharashtra Politics
Assembly election : 26व्या वर्षी कोट्यवधींची संपत्ती; वडील मंत्री, लेकाची दुसऱ्या राज्यात आमदारकीची फिल्डींग...

घायवळ प्रकरण

गुंड नीलेश घायवळ प्रकरणातही मोठी राजकीय लिंक समोर आली. विरोधकांकडून राम शिंदे, संतोष बांगर यांची थेट नावे घेण्यात आली. तर सत्ताधारी भाजपकडून रोहित पवारांवर निशाणा साधण्यात आला. हे प्रकरण राज्यात चांगलेच गाजले. घायवळच्या भावाला शस्त्र परवाना देण्यावरून गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही विरोधकांनी आसूड ओढले. एकाच प्रकरणात अनेक राजकीय नेत्यांवर आरोप झाले, हे विशेष.

जैन बोर्डिंग जमीन विक्री

सध्या पुण्यात जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण चांगलेच गाजत आहे. शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांच्याकडून थेट केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना टार्गेट करण्यात आले आहे. जमीन व्यवहाराशी मोहोळ यांचा संबंध जोडत धंगेकर यांनी राजकीय वातावरण तापलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही मोहोळ यांच्यावर आरोप केले होते. याप्रकरणी जैन समाजही आक्रमक झाला आहे.

Maharashtra Politics
Phaltan doctor death update : फलटण प्रकरणात डॉ. धुमाळांकडूनच मोठा खुलासा; चौकशी समितीच्या अहवालानंतर ‘ते’ प्रकरण तिथंच संपलं होतं...

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण

तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातही राजकीय कनेक्शन समोर आले. माजी नगराध्यक्षाचे पती विनोद उर्फ पिटू गंगणे यांनी पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. या प्रकरणाचे कनेक्शन मुंबईपर्यंत असल्याची चर्चा त्यावेळी होती. प्रामुख्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती.

नाशिकमध्ये खंडणीखोर

नाशिकमधील आरपीआय’ नेता आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे याची धक्कादायक प्रकरणी बाहेर येत आहे. त्याच्यासह दोन्ही मुलांविरुद्ध नव्याने खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे लोंढे यांच्या अडचणीत वाढ झाली. प्रकाश लोंढे आणि त्याची दोन्ही मुले भूषण आणि दीपक यांच्याविरोधात खंडणीचा नवा गुन्हा दाखल झाला. नाशिकमधील सातपूर पोलिसांनी ही कारवाई केली.

ही काही मोजकी प्रकरणे आहेत. त्याआधीही राज्यात सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील राजकीय लिंकवरून खळबळ उडाली होती. राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या होत्या. बीडमधील नेत्यांकडूनच एकमेकांवर आरोप केले जात होते. त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटले. राज्यात पोर्शे कार अपघात प्रकरणही चांगलेच गाजले. या प्रकरणातही थेट एका विद्यमान आमदाराचे नाव समोर आले होते. पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. या प्रकरणानेही राज्य सरकारची डोकेदुखी वाढविली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com