Kolhapur Assembly Election News : उत्तरेत दगा तर दक्षिण, करवीरमध्ये तडा? तडजोडीचा फटका ठाकरे गटाच्या भवितव्याला

Mahavikas Aghadi Kolhapur News: पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत हक्काची जागा काँग्रेसला दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी आग्रही भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे. मात्र विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचा ठाम दावा आहे. मात्र प्रत्येक वेळी ठराविक पदाधिकार्‍यांच्या तडजोडीमुळे ठाकरे गटाला डावलले जाते, असा आरोप निष्ठावंत शिवसैनिकांचा आहे.
Kolhapur Mahavikas Aghadi News
Mahavikas Aghadi NewsSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News: आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत उमेदवारांची भाऊगर्दी आहे. बऱ्याच मतदारसंघातील जागा वाटपाचा तिढा सुटल्यानंतर कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या जागेवरून महाविकास आघाडीत स्थानिक पातळीवर घमासान सुरू आहे. मागील पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या हक्काची जागा काँग्रेसला दिल्यानंतर या मतदारसंघावर शिवसेनेचा अखंडित भगवा फडकवत ठेवण्यासाठी शिवसैनिक आग्रही आहेत.

अशातच हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे घेण्यासाठी स्थानिक स्तरापासून ते वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने ही जागा काँग्रेसकडे जाणार अशी चर्चा आहे. मात्र पोटनिवडणूक आणि लोकसभेत शिवसैनिकांनी जो समंजसपणा दाखवला, तो विधानसभा निवडणुकीला दाखवतील, ही शक्यता फार कमी आहे. कारण एकेकाळी शिवसेनेचे सहा आमदार आणि दोन खासदार असलेल्या जिल्ह्यात शिवसेनेने एकच आमदार मिळवला. तोही शिंदेगटाकडे गेला. राज्यातील सत्ता गोंधळानंतर महाविकास आघाडीला चांगले दिवस आले असताना कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसने गरुड झेप घेतली आहे.

उत्तरची जागा ठाकरे गटाला मिळाल्यास उमेदवार कोण?

शिवसेना ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले उमेदवार शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर रविकिरण इंगवले यांचे उतर विधानसभा मतदारसंघात (Vidhan sabha Constituency) पारडे जड आहे. शिवाय त्यांना पेठा-पेठांमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा गट आहे. विशेष म्हणजे स्व.विष्णुपंत इंगवले यांच्या सामाजिक कार्यामुळे त्यांची ओळख आहे. शिवाय ते चार वेळा कोल्हापूर महानगरपालिकेत निवडून आलेले आहेत. शिवाय त्यांचा शहरातील कानाकोपऱ्यात त्यांचा मोठा संपर्क आहे.

कार्यकर्ते आणि निष्ठावंत शिवसैनिकांची फौज त्यांच्या मागे उभी राहू शकते. शहरातील कार्यकर्त्यांची फौज आणि जनमत धरून असा 25 हजार मतांचा एक गठ्ठा ही इंगवले यांची मोठी जमेची बाजू आहे. महायुतीचे संभाव्य उमेदवार राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना अंगावर घेऊन राजकारण करण्याची त्यांची सवय आहे. इंगवले हे क्षीरसागर यांना आव्हान देऊ शकतात. कारण पक्ष वाढीबरोबर कोल्हापूर उत्तरची जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी यासाठी हजारो संख्येच्या उपस्थित त्यांनी रॅली काढत उमेदवारीची मागणी केली होती.

उत्तर विधानसभा निवडणुकीत सध्या ठाकरे गटाकडून दुसरे उमेदवार जिल्हा प्रमुख संजय पवार इच्छुक आहेत. संजय पवार यांना गतवेळच्या महापालिका निवडणुकीत पराभव सहन करावा लागला होता. राज्यसभेतही भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पराभव स्वीकारावा लागला होता. कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक लढवायची झाल्यास किमान स्वतःचा वीस ते पंचवीस हजाराचा मतदानाचा गट्टा असल्यास त्याचा फायदा होतो. मात्र पवार यांच्या बाजूला तसा मतदारांचा गट्टा कमी आहे.

महिना भरापूर्वी शिवसेना ठाकरे (Shivsena Thackeray) गटाचा मेळावा शाहू स्मारक भवन येथे पार पडला. या मेळाव्यात कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा नाक आहे. अशी भावना शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी बोलून दाखवली. हा मतदारसंघ ठाकरे गटाकडे घेण्यासाठी शिवसेनेचे उपनेते संजय पवार, शहराध्यक्ष कसोटीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र काँग्रेसने या मतदारसंघावर आपला दावा कायम केला आहे.

खाजगीत शिवसैनिकांचा रोष

पोटनिवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत हक्काची जागा काँग्रेसला दिल्यानंतर विधानसभा निवडणुकीत ही जागा शिवसेना ठाकरे गटाला मिळावी, अशी आग्रही भूमिका शिवसेना ठाकरे गटाची आहे. मात्र विद्यमान आमदार काँग्रेसचा असल्याने या मतदारसंघावर काँग्रेसचा ठाम दावा आहे. मात्र प्रत्येक वेळी ठराविक पदाधिकाऱ्यांच्या तडजोडीमुळे ठाकरे गटाला डावलले जाते. असा आरोप निष्ठावंत शिवसैनिकांचा आहे. उत्तरची जागा न मिळाल्यास करवीर, दक्षिणेत हिसका दाखवण्याची भाषा बोलून दाखवत आहेत. शिवाय महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या ठिकाणी दगाफटका होऊ शकतो.

Kolhapur Mahavikas Aghadi News
Kolhapur Politics : 'मविआ'तील इच्छुकांची धाकधूक वाढली; मतदार संघाच्या अदलाबदली...

पदाधिकारी नेमकं चुकतात कुठ?

वास्तविक पाहता लोकसभा निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला कोल्हापूर जिल्ह्यात अच्छे दिन आले आहेत. यापूर्वीही शिवसेना एकत्र होती त्यावेळी जिल्ह्यात प्रत्येक मतदारसंघात शिवसेनेची निर्णायक ताकद होती. मात्र ठराविक पदाधिकारी यांच्या होणाऱ्या राजकीय वाटाघाटीमुळे शिवसैनिकांना अडचण निर्माण झाले.

राज्यातील पहिली महाविकास आघाडी कोल्हापूर महानगरपालिकेच्या सत्ता स्थापना वेळ निर्माण झाली. राज्यात भाजप शिवसेना युती असताना जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस (Congress) नेत्यांच्या सोबत हात मिळवणी केली. त्यांनतर अंतर्गत कुरघोडी होऊन शिवसेनेत दोन गट पडले. राज्यात शिवसेनेचे दोन गट अस्तित्वात आल्यानंतर महाविकास आघाडीत असणारा ठाकरे गट हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी विचारधारी सोबत राहिला.

प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार असताना जुन्या गटाने मर्यादित अपक्ष ठेवला. असा आरोप आता निष्ठावंत शिवसैनिकांकडून होत आहे. लोकसभा निवडणुकीतही तेच पाहायला मिळाले. कोल्हापूरची जागा सोडल्यानंतर सांगलीच्या जागेवर तडजोडी झाली. मात्र निकालानंतर त्याचे वेगळेच परिणाम दिसून आले. तडजोडीचा फटका शिवसेना खात्री गटाला कोल्हापूर जिल्ह्यात बसला. हे लोकसभा निवडणूक निकालानंतर दिसणारे. मात्र या निकालामुळे निष्ठावंत शिवसैनिक काँग्रेसवर संतप्त आहे.

निष्ठावंत शिवसैनिकांचा रोष हा उपनेते संजय पवार आणि माजी जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांच्यावरच दिसून येतो. मात्र लोकसभा निवडणुकीत माजी जिल्हाध्यक्ष आणि आता शिवसेना शिंदे गटाचे नेते मुरलीधर जाधव यांच्यावर कारवाई झाल्यानंतर उघडपणे बोलण्यास शिवसैनिक टाळतात.

Kolhapur Mahavikas Aghadi News
Kolhapur Politics : 'मविआ'तील इच्छुकांची धाकधूक वाढली; मतदार संघाच्या अदलाबदली...

पूर्वइतिहास काय सांगतो?

या पूर्वीचा शहर मतदारसंघाचं इतिहास पहाता स्व.रामभाऊ चव्हाण जिल्फाप्रमुख असताना माजी आमदार दिलीप देसाई ,सुरेश साळोखे आणि राजेश क्षीरसागर या तिघांनाही अनपेक्षितपणे शहरप्रमुखला उमेदवारी देवून आमदार केल्याचा इतिहास आहे. त्यामुळे यावेळी देखील वरिष्ठांकडून ऐनवेळी रविकिरण इंगवले यांचे नावाला वरिष्ठांकडून पसंती मिळण्याची चिन्हे आहेत.

नेमक राजकारण काय होऊ शकते?

उत्तर विधानसभा मतदारसंघात ठाकरे गटाला डावलल्यास कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) करवीरमध्ये काँग्रेसला महागात पडू शकत. दक्षिण विधानसभा मतदारसंघात आमदार ऋतुराज पाटील हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील. सध्या सतेज पाटील यांचे नेतृत्व राजकीय पातळीवरचे आहे. त्यांना जिल्ह्यात लक्ष केंद्रित करावी लागणार आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेकडून कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील जागा मागितले जात आहे.

जर उत्तरची जागा न मिळाल्यास माजी मंत्री सतेज पाटील यांची डोकेदुखी वाढू शकते. कारण 2019 च्या निवडणुकीत करवीर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार पी एन पाटील यांनी शिवसेनेचे उमेदवार माजी आमदार चंद्रदीप नरके यांचा सुमारे 22000 मतांनी पराभव केला होता. यावेळी माजी मंत्री सतेज पाटील यांच्या गटाने पूर्ण ताकतीनिशी पी एन पाटील यांना मदत केली होती. मात्र राज्यातील फुटीच्या राजकारणानंतर संपूर्ण जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदलली आहेत.

Kolhapur Mahavikas Aghadi News
Kolhapur Political Crime : पोलिसानेच रचला शिवसेना शहाध्यक्षाच्या खुनाचा प्लॅन; पन्नास लाखांचे जप्ती प्रकरण

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू महाराज यांना करवीर मधून 70 हजारांचे मताधिक्य मिळाले आहे. त्यामुळे त्यामुळे या मतदार संघात निष्ठावंत शिवसैनिक ठाकरे गटाची 40, हजार हक्काची मते आहेत. तसा करवीर विधानसभा मतदारसंघ हा शहराच्या नजीक असल्याने शिवसैनिक आणि इतर पदाधिकार्‍यांची रोज ये-जा कोल्हापूर शहरात असते. त्यामुळे कोल्हापूर शहरातील पदाधिकार्‍यांशी त्यांची जवळीक आहे. अशा परिस्थितीत उत्तरची जागा शिवसेना ठाकरे गटाला न मिळाल्यास करवीर मधील निष्ठावंतांची एक फळी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला दगा फटका देऊ शकते.

माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील यांचं होम पीच म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दक्षिण विधानसभा मतदारसंघात शाहू महाराजांना लोकसभा निवडणुकीत अपेक्षित आघाडी मिळालेली नाही. दक्षिण मतदारसंघात 2019 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार अमल महाडीक यांचा काँग्रेसचे उमेदवार ऋतुराज पाटील यांनी सुमारे 42 हजार मतांनी पराभव केला होता. मात्र हे मताधिक्य लोकसभा निवडणुकीत घटल्याच स्पष्ट झाले.

दक्षिण मतदारसंघात श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना केवळ साडेपाच हजार मतांचे मताधिक्य मिळाले आहे. सध्या उत्तरच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात प्रचंड चुरस आहे. लोकसभा निवडणुकीत केवळ सहा हजाराचे मताधिक्य शाहू महाराज छत्रपती यांना दिल्यानंतर दक्षिण मध्ये काँग्रेसला धोक्याची घंटा आहे. अशा परिस्थितीत उत्तर ची जागा न दिल्यास निष्ठावंतांचा एक गट दक्षिण मध्ये महाविकास आघाडीच्या विरोधात काम करण्याची तयारी करत आहे. जर आमच्या हक्काची जागा आम्हाला दिल्यास जिल्ह्यातील सर्वच उमेदवारांमागे निष्ठावंतांची ताकद उभी करू असा शब्दही खाजगी मध्ये शिवसैनिक देताना दिसतात.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com