Barack Obama : बुद्धीमान, विचारशील, निष्ठावंतः 'अ प्रॉमिस्ड लँड' या ओबामांच्या पुस्तकात मनमोहन सिंगांचे कौतुक

Barack Obama on Manmohan Singh: अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या 'अ प्रॉमिस्ड लँड' या पुस्तकात माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. बुद्धीमान, विचारशील नेता, असा उल्लेख त्यांनी केला आहे.
Obama on Manmohan Singh
Obama on Manmohan SinghSarkarnama
Published on
Updated on

Dr Manmohan Singh Death: भारतातील आर्थिक सुधारणांचे जनक, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाला धक्का बसला आहे. जगभरात त्यांना आदराचे स्थान होते. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांच्या एका पुस्तकार डॉ. सिंग यांच्याबद्दल विचार मांडले आहे. डॉ. मनमोहन सिंग बोलतात, तेव्हा जग त्यांना ऐकत असेत, असे ओबामा २०१० मध्ये म्हणाले होते.

डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री नवी दिल्लीतील एम्समध्ये निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. अर्थमंत्री, पंतप्रधान असताना डॉ. मनमोहन सिंग यांनी देशाची आर्थिक घडी नीटनेटकी केली होती. जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली होती.

बराक ओबामा यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीवर 'अ प्रॉमिस्ड लँड' हे पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी डॉ. सिंग यांचे कौतुक केले आहे. त्यांच्याशी संबंधित अनेक विषयांबाबत या पुस्तकात लिहिले आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये हे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

Obama on Manmohan Singh
Raj Thackeray : 'न बोलता, जे करून दाखवलं ते अनेकांना..!' राज ठाकरेंची सूचक पोस्ट

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना बराक ओबामा हे भारत दौऱ्यावर आले होते. भारताच्या पहिल्याच दौऱ्यात डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत झालेल्या चर्चांचा उल्लेख त्यांनी या पुस्तकात केला आहे. डॉ. सिंग हे बुद्धीमान, विचारवंत आणि निष्ठावंत आहेत. भारतातील आर्थिक सुधारणांचे ते शिल्पकार आहेत, असे ओबामा यांनी या पुस्तकात लिहिले आहे. यासह त्यांनी डॉ. सिंग यांच्याबाबत आणखीही बरीच माहिती या पुस्तकात लिहिली आहे. बराक ओबामा हे नोव्हेंबर 2010 मध्ये पहिल्यांदा भारताच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते.

Obama on Manmohan Singh
Manmohan Singh Daughter : मनमोहन सिंग यांचा जावई IPS तर जाणून घ्या तीन मुली काय करतात?

डॉ. मनमोहन सिंग हे शांत, संयमी, मितभाषी, विनम्र स्वभावाचे होते. प्रचंड विद्वत्ता असलेल्या डॉ. सिंग यांनी भाषेची मर्यादा कधीही ओलांडली नाही. बोलण्यापेक्षा काम करण्यावर त्यांचा अधिक भर राहत असे. मितभाषी असले तरी पंतप्रधान म्हणून त्यांनी 10 वर्षांत 111 पत्रकार परिषदा घेतल्या. पत्रकारांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे दिली होती.

प्रचंड विद्वत्ता असतानाही त्यांच्या अंगी असलेली विनम्रता जगाला भावली होती. जून 2010 मध्ये कॅनडात झालेल्या जी -20 मध्येही ओबामा यांची डॉ. सिंग यांच्यासोबत भेट झाली होती. त्यावेळी ते म्हणाले होते, डॉ. मनमोहन सिंग बोलतात, तेव्हा त्यांना सारे जग ऐकत असते.

ओबामा यांच्यानुसार, भारतात मुस्लिमांच्या विरोधात निर्माण होत असलेले वातावरण, त्यामुळे वाढत असलेला भाजपचा प्रभाव, यावर डॉ. सिंग यांनी चिंता व्यक्त केली होती. धार्मिक आणि जातीय मुद्द्यांच्या आधारावर समाजाची दिशाभूल करणे खूप सोपे असते. आपल्या हितासाठी राजकीय नेत्यांना या बाबींचा वापर करणे अवघड नसते.

केवळ भारतच नव्हे, तर जगातील कोणत्याही देशात असे होऊ शकते. ओबामा यांनी डॉ. सिंग यांच्या मतांशी सहमती दर्शवली होती. युरोपातील उदारतावाद आणि लोकशाहीसमोरील आव्हानांवरही त्यांनी चर्चा केली होती.

Obama on Manmohan Singh
Manmohan Singh : पाकिस्तानात जन्म, रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर अन् सलग दोनवेळा पंतप्रधान; मनमोहन सिंग यांची डोळे दिपवणारी कारकीर्द

डॉ. सिंग यांनी भारत - पाकिस्तान संबंधांवरही भाष्य केले होते. मुंबईवरील 26-11 च्या हल्ल्यांनंतर दोन्ही देशांत तणाव निर्माण झाला होता. अण्वस्त्रसज्ज असलेल्या पाकिस्तानसोबत तणावपूर्ण संबंधांची त्यांना चिंता होता. पाकिस्तानच्या गुप्तहेर संघटनेचा लष्कर ए तौयबासारख्या अतिरेकी संघटनेशी संबंधांच्या आरोपांमुळे द्विपक्षीय संबंध सुधारण्यात अडचणी येत असल्याचे डॉ़. सिंग यांनी चर्चे दरम्यान सांगितले होते.

जागतिकीकरण आणि आर्थिक संकटांच्या परिणामांची त्यांना जाणीव होती. त्यांचे विचार भारतापुरते मर्यादित नव्हते, तर जागतिक राजकारण आणि अर्थव्यवस्थेवरही त्यांची पकड होती, असेही ओबामा यांनी लिहिले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com