BJP Jalgaon Politics : जळगाव जिल्ह्यातील नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहराऐवजी मुक्ताईनगर तालुक्यातून जाणार आहे, असे भूसंपादनाचे जिल्हाधिकारी कार्यालयाचे पत्र मीडियामध्ये प्रसिद्ध झाले होते. याबाबत खासदार खडसे यांनी आपली भूमिका मांडली आहे.
नियोजित तळोदा -बऱ्हाणपूरमहामार्ग रावेर तालुक्यासाठी ही तितकाच महत्त्वाचा आहे. मुक्ताईनगर तालुक्यातून एक महामार्ग आधीच जात असल्याने हा नियोजित महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे आणि त्यामुळे रावेर तालुक्याचा विकास होणे खासदार म्हणून माझ्यासाठी महत्त्वाचे आहे, असे खासदार खडसे यांनी सांगितले. तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari ) यांनी खासदार खडसे यांच्या मतदारसंघातूनच महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास गडकरी यांनी मंजुरी दिली असल्याचे समजते.
याबाबत ‘न्हाई’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक जळगाव येथे 5 जानेवारीला होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे यांनी दिली. नियोजित तळोदा -बऱ्हाणपूर हा राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहरातून व तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल, याबाबतचे प्राथमिक आश्वासन गडकरी यांनी दिले.
खासदार रक्षा खडसे यांनी २०१४ पासून यासाठी केंद्रीय मंत्री गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकारी कार्यालयाने भूसंपादनाबाबतचे पाठविलेले पत्र हे अंतिम नाही. ‘न्हाई’च्या अधिकाऱ्यांनी याबाबतचे प्राथमिक पत्र मला दाखविल्यानंतर मी तातडीने हा राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून नेण्यास विरोध केला आहे, असे देखील रक्षा खडसे म्हणाल्या.
नागपूर आणि भोपाळ येथील ‘न्हाई’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधला आहे. आगामी बैठकीत हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातूनच नेण्याचा निर्णय होईल, असा विश्वास खासदार खडसे यांनी व्यक्त केला. हा राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातून जाणे केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रावेर शहराचा यापूर्वी म्हणावा तसा विकास झालेला नाही. या राष्ट्रीय महामार्गाच्या निमित्ताने का असेना पण काही प्रमाणात विकास होऊ शकेल, असे खासदार खडसे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.