मुंबई : राष्ट्रवादी काॅंग्रेसने केंद्रीय तपास संस्थांच्या विरोधात आक्रमक बाणा काय ठेवला असून आता थेट हल्ला करण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या विरोधातच केंद्रीय तपास संस्था कारवाई करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून होत असतो. तर दुसरीकडे भाजपमध्ये गेल्याने ईडी वगैरे काही मागे लागत नाही. त्यामुळे सुखाने झोप येते, असे वक्तव्य काही नेते करतात. आता या नेत्यांची झोप उडविण्याचे काम राष्ट्रवादीने हाती घेतले आहे.
या संदर्भातील माहिती राष्ट्रवादी काॅंग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली. ईडीने आज मलिक यांच्या घरावरच छापे टाकल्याचे वृत्त होते. ते मलिक यांनी फेटाळले आणि आपण अशा कारवायांना घाबरणार नसल्याचे स्पष्ट केले. उलट भाजपच्या ज्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत त्या केसमध्ये ईडीने काय कारवाई केली आहे, याची विचारणा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिष्टमंडळ ईडी कार्यालयात जाणार असल्याचा निर्णय पक्षाने घेतल्याची माहिती त्यांनी दिली.
भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून संकलित करण्यात आली असल्याचे सांगतानाच संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत. भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही, हे तपास का थांबले आहेत याची माहिती घेणार आहोत, असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्यांना करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.