Amol Kolhe News : गेल्या काही दिवसांपासून खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) नाराज असल्याच्या चर्चा अधून-मधून होत असतात. याचे कारणही तसचे आहे, अमोल कोल्हे अनेक वेळा सूचक प्रतक्रिया देतात त्यामुळे ही चर्चा होते. मात्र, अमोल कोल्हे हे हेतू पुरस्सरच अशी उक्ती करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
अमोल कोल्हे हे अनेक दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) कार्यक्रमांना फारसे दिसत नाहीत. त्यातच वेगवेगळी वक्तव्य किंवा ट्वीट करुन चर्चा घडवून आणतात. त्यांनी केलेल्या विधानांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही प्रतिक्रिया द्याव्या लागतात. कोल्हे यांच्या पक्षांतरांच्या चर्चा नियमीत होत असतात. त्यामुळे शिरुरमधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम आहे.
मात्र, कोल्हे अशी कृचीच का करतात की त्यामुळे चर्चा होईल, आणि संभ्रम निर्माण होईल, याचे कारणही सांगितले जाते. त्याचे कारण जे राजकीय वर्तुळात चर्चिले जात आहे, त्यामध्ये असे सांगितले जाते की, कोल्हे वेगवेगळी वक्तव्य करुन आणि आपल्या कृतीतूनही भाजपमध्ये जाण्याच्या चर्चा घडून आणतात. भाजपमध्ये (BJP) जाण्याच्या चर्चेमुळे मतदारसंघात नेमकी काय प्रतिक्रिया उमटते याची ते चाचरणी करत आहेत का? असे बोलले जाते.
भाजपमध्ये प्रवेश केला तर मतदारसंघातील मतदारांचा कल कसा असेल याचा अंदाज कोल्हे या चर्चांमधून घेत असावेत असे राजकीय जाणकार सांगतात. मात्र, यामुळे कोल्हे यांच्या प्रतिमेला तडा जात असल्याचेही बोलले जाते. नियमित अशा चर्चा झाल्यास कार्यकर्ते नाराज होतील आणि त्यामुळे राजकीय अडचण होऊ शकते. कोल्हे हे मतदारसंघात वेळ देत नाहीत, अशी टीका विरोधकांकडून नियमीत होत असते, त्यातच या चर्चा यामुळे कार्यकर्ते दुखवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी अमोल कोल्हे यांनी जागतिक पुस्तक दिनानिमित्त फेसबुकवर दोन फोटो शेअर केले होते. पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकंची बोलणे' हे पुस्तक होते. तर दुसऱ्या फोटोत नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी' नावाचे पुस्तक होते. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले. त्यावरुन त्यांनी खुलासाही केला.
कोल्हे म्हणाले, ''माझ्या पोस्टमध्ये एक पुस्तक होते शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकंची बोलणे' आणि दुसरे पुस्तक होते नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी'. बातम्या लगेच सुरू झाल्या. नक्की अमोल कोल्हेंना सुचवायचंय काय? अमोल कोल्हेंना फक्त एवढेच सुचवायचे होते की विचारधारा कुढलीही असली तरी तिचा विरोध करायचा असला तर तिचा आधी अभ्यास करावा लागतो. हे जास्त महत्वाचे आहे. हे फक्त तुमच्या वाचणातून येते. हे तुमच्या साहित्यातून येते. जेव्हा साहित्यातून तुमचे समाजमन हे सुसंस्कृत बनत जाते. तेव्हा न कळत राजकीय साक्षरता येते'' असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.
दरम्यानच्या काळात '' कोल्हे यांनी एक वक्तव्य केले होते. त्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांची पोरं आहोत. आणि शेतकऱ्यांच्या जातीचे एक वैशिष्टये आहे. आम्ही ऊगाच औत खांद्यावर घेऊन कधी हिंडत नाही. तर वारा आणि आभाळ बघून शेत कधी नांगरायचे हे ठरवतो. असे सूचक वक्तव्य केले होते. त्यामुळे भाजप प्रवेशाची चर्चा झाली होती. तसचे चिंचवड आणि कसबापेटच्या पोटनिवडणुकीत कोल्हे राष्ट्रवादीचे स्ट्रार प्रचारक होते. मात्र, कोल्हे प्रचाराकडे फिरलेच नाही. त्यामुळे ते नाराज आहेत अशी चर्चा झाली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.