Shashikant Shinde NCP President : रोहित पवार, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे यांना बाजूला सारून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे यांची निवड झाली आहे. या तीन मातब्बरांना डावलून शिंदे यांचीच निवड पवारांनी का केली याबद्दल माहिती जाणून घेऊया.
रोहित पवार हे आमदार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवारांचे नातू आहेत. ऑलरेडी घरामध्ये अजित पवारांनी वेगळा मार्ग पत्करला आहे आणि त्यातच अजून एका घरातल्याच व्यक्तीला मोठं करणे पवारांना परवडणार नाही.
एकीकडे सुप्रिया सुळे राष्ट्रीय उपाध्यक्ष आहेत आणि दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष म्हणून जर घरातलीच व्यक्ती बसवली तर घराणेशाहीचा मोठा ठपका पक्षावरती बसेल आणि आत्ताची परिस्थिती बघता पवार रिस्क अजिबात घेणार नाहीत. दुसरीकडे रोहित पवारांचे वय कमी आहे त्यांचं नेतृत्व पक्षांमध्ये असलेले सीनियर नेते स्वीकारतील का हा ही मुद्दा आहे.
दुसरं नाव जितेंद्र आव्हाड हे राष्ट्रवादीचं ओबीसी नेतृत्व आहेत. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आणि विशेषतः मुंबई-ठाण्यासाठी त्यांचं नाव महत्त्वाचं असूनही पवारांनी त्यांना डावललंय आणि याचं कारण म्हणजे आव्हाडांचा आक्रमक स्वभाव. त्यांची आक्रमकता विरोधकांशी लढायला नक्कीच उपयोगी होते.
मात्र पक्षांमध्ये इतकं आक्रमक नेतृत्व, तेही पक्ष अडचणीत असतानाच्या काळात ठेवणं काहीसं कठीण होऊ शकतं, लोक नाराज होऊ शकतात. आव्हाड स्पष्टवक्ते आणि काहीसे फटकळ असल्यामुळे त्यांना थेट प्रदेशाध्यक्ष करण्याची रिस्क पवारांनी घेतली नसावी. दुसरीकडे राष्ट्रवादीवरती मराठा समाजाचा पक्ष असा शिक्का असताना आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा शिगेला असताना ओबीसी आव्हाडांना प्रदेशाध्यक्ष करण याचाही विचार पवारांनी नक्कीच केला असावा.
तिसरं नाव राजेश टोपे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार प्रदेशाध्यक्ष करताना तो शक्यतो सगळ्यांना सांभाळून घेणारा असावा, सर्वांशी चांगले संबंध राखणारा असावा असा जर नॉम पवारांनी लावला असेल तर राजेश टोपे त्यामध्ये नक्कीच बसत होते. पण मग त्यांना का घेतलं नसेल याचं कारण म्हणजे सध्या ते आमदार नाहीत आणि दुसरं ते पश्चिम महाराष्ट्रातून न येता, मराठवाड्यातून येतात.
आत्ताच्या घडीला त्यातल्या त्यात बरी पक्ष बांधणी ही पश्चिम महाराष्ट्रात आहे. आगामी काळामध्ये त्यांनी प्रत्येक वेळी मुंबई पुण्यामध्ये येऊन काम करणे कठीण होऊ शकते आणि म्हणूनच राजेश टोपेंच्या नावावर फुली मारली
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शशिकांत शिंदेच का? कारण ते पश्चिम महाराष्ट्रातून येतात आणि पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. शिंदे हे मराठा समाजातून येतात सध्या मराठा आरक्षणाची लढाई जोरदार आहे. राष्ट्रवादी हा मराठा प्राबल्य असणारा पक्ष म्हणून ओळखला जातो. शशिकांत शिंदे हे इतक्या सगळ्या पक्ष फुटीमध्ये सुद्धा पवारांसोबत अत्यंत प्रामाणिक राहिले, इतकच नाही तर पवारांनी सांगितलं म्हणून लोकसभा सुद्धा त्यांनी लढवली.
अशावेळी त्यांना त्याचं फळ देणं अपेक्षित होतं आणि तेच पवार देत आहेत. जाता जाता अजून एक म्हणजे महायुतीमध्ये अजितदादा मुख्यमंत्री झाल्यानंतर पवारांच्या पार्टीतून पहिल्यांदा अभिनंदनला कोणी केला असेल तर ती व्यक्ती होती शशिकांत शिंदे. त्यामुळे पक्ष फुटल्यानंतर सुद्धा जुन्या सहकाऱ्यांशी अजूनही नातं टिकवून असलेल्या प्रदेशाध्यक्ष अशी सुद्धा त्यांना ओळख प्राप्त होणार आहे.
अर्थात पक्ष वाढवण्यापासून ते स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा उभं राहण्यापर्यंत मोठा आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे. जयंत पाटलांनी सात वर्ष काम करून पक्षाला इथपर्यंत आणलं, आता त्याच्या पुढे नेण्याचं काम शिंदेंवरती असणार आहे. ते या कामात किती सफल होतील बघावं लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.