Radheshyam Mopalwar : लोककल्याण राहिले लांब, मोपलवार स्वतःचेच कल्याण करून झाले मोकळे!

MLA Rohit Pawar Maharashtra Government Assembly Session : आमदार रोहित पवार यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादग्रस्त सेवानिवृत्त आयएएस अधिकारी राधेश्याम मोपलवार हे चर्चेत आले आहेत.
Radheshyam Mopalwar
Radheshyam MopalwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्य सरकार योजना आखते, कायदे तयार करते. त्याची अंमलबजावणी प्रशासनामार्फत केली जाते. आयएएस अधिकारी हे या प्रशासकीय व्यवस्थेत सर्वात वर असतात. लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करताना लोकांचा विचार बाजूला टाकून स्वतःचे उखळ पांढरे करण्याचा मोह अनेक अधिकाऱ्यांना आवरत नाही.

सेवानिवृत्त आयएएस अधिकारी राधेशाम मोपलवार हे अशाच अधिकाऱ्यांपेकी एक. त्यांनी स्वतःचेच प्रचंड कल्याण केल्याचे आता समोर येत आहे. दोन पत्नी, कन्या, भाऊ आणि स्वत:च्या नावावर त्यांनी प्रचंड माया जमा केल्याचा आरोप होत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राधेश्याम मोपलवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मोपलवार यांनी 3000 कोटी रुपयांची मालमत्ता देश, विदेशात गोळा केली आहे, असा आरोप रोहित पवार यांनी केल्यानंतर ते चर्चेत आले आहेत.

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar : घोटाळेच घोटाळे! दोन बायका अन् मुलींच्या नावावर बक्कळ पैसा! 'समृद्धी'ने मोपलवार झाले मालामाल

मोपलवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांच्याही जवळचे आहेत. त्यामुळेच 2018 मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतरही मोपलवार यांची राज्य रस्ते विकास महामंडाळाचे उपाध्यक्ष, कार्यकारी संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्यांच्यावर विशेषतः समृद्धी महामार्गाच्या उभारणीची जबाबदारी सोपवण्यात आली. या कामातच मोपलवार यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

राधेश्याम मोपलवार यांचे शिक्षण नांदेड येथे झाले. ते अभ्यासात हुशार होते. त्यांच्या सामाजिक जाणीवाही प्रगल्भ होत्या. त्यातूनच ते विद्यार्थी चळवळीत आले. डाव्या पक्षाशी संबधित विद्यार्थी चळवळीत त्यांनी काम केले. नंतर त्यांना त्यावेळच्या मराठवाडा ग्रामीण बँकेत नोकरी लागली. बँकिंग क्षेत्रात डाव्या कामगार संघटनांचा प्रभाव अधिक आहे. मोपलवार हेही एआयबीईए या डाव्या विचारसरणीच्या कामगार संघटनेत सक्रिय झाले.

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar: CM का बहुत याराना लगता है! 5 मुख्यमंत्री, 7 वेळा मुदतवाढ; मोपलवारांवर सत्ताधाऱ्यांची मेहेरनजर

काही वर्षांनी मोपलवार एमपीएससी उत्तीर्ण झाले. उपजिल्हाधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. 1995 मध्ये त्यांचे आयएएस म्हणून प्रमोशन झाले. महत्वाच्या पदांवर त्यांनी काम केले. मोपलवार हे नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्याचे रहिवासी आहेत.

नांदेडला गुरु-ता-गद्दी सोहळा झाला, त्यावेळी ते तेथे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री होते. गुरु-ता-गद्दी सोहळ्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार कोटींचा निधी मंजूर केला होता. ती कामे मोपलवार यांच्याच देखरेखीखाली पूर्ण झाली होती. तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास टाकला होता. दोन हजार कोटींच्या निधीतून नांदेडमध्ये अनेक विकासकामे करण्यात आली. रस्त्यांचीही कामे करण्यात आली. त्या रस्तेकामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. रस्त्यांची आता दुरावस्था झाली आहे.

मोपलवार यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तशा परिस्थितीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले, मात्र आपल्या भूतकाळाचे स्मरण त्यांनी ठेवले नाही. लोकांचे, गरीबांचे कल्याण करण्याऐवजी त्या निधीवर त्यांनी मोठ्या प्रमाणावर डल्ला मारला, हे रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरून उघड झाले आहे.

Radheshyam Mopalwar
Radheshyam Mopalwar : तेलगी प्रकरण, मोपलवार आणि अनिल गोटेंचा आरोप !

मोपलवार यांनी कोकणचे विभागीय आयुक्त, ठाण्याचे विभागीय आयुक्त म्हणून काम पाहिले. ठाणे येथे विभागीय आयुक्त असताना त्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी जवळीक वाढली. दरम्यानच्या काळात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही त्यांची जवळीक वाढली होती. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र या जवळिकीमुळे त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकली नाही.

2018 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांना मुदतवाढ देत समृद्धी महामार्गाच्या कामाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. डिसेंबर 2022 पासून समृद्धी महामार्गावर एकूण 1282 छोटे, मोठे अपघात झाले आहेत. या अपघातांत 135 जणांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे या महामार्गाची ‘समृद्धी’ झाली का, असा प्रश्न उपस्थित होत असताना आता राधेश्याम मोपलवार मात्र समृद्ध झाल्याचे समोर येत आहे.

हलाखीच्या परिस्थितीतून आलेल्या अधिकाऱ्याच्या सामाजिक जाणीवा समृद्ध असतात. तशा त्या मोपलवार यांच्याही होत्या, मात्र पैशांचा मोह कुणाला नसतो. पैशांच्या मोहापुढे त्या जाणीवा फिक्या पडल्या आणि प्रचंड माया गोळा करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही, असे रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरून दिसत आहे. अनेक धडाडीचे, प्रामाणिक अधिकारी साइड पोस्टला काम करत आहेत. सरकार कोणतेही असो, परिस्थिती अशीच असते. सत्ताधाऱ्यांच्या पुढे-पुढे करणाऱ्या अधिकाऱ्यांना मात्र मोपलवार यांच्यासारखी 'समृद्धी' प्राप्त होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com