Sudhir Gadgil : काय करावं आणि काय नाय! बाजार समिती त्रिभाजनाचा निर्णय सरकारचा, श्रेय लाटतोय भाजपचा आमदार

BJP On Market Committee's decision : नुकसात राज्यातील महायुती सरकराने 'तालुका तेथे बाजार समिती' असा निर्णय घेतला. यामुळे राज्यात 21 जिल्ह्यांमध्ये 65 तालुक्यांच्या ठिकाणी नव्याने बाजार समित्यांची स्थापणा होणार आहे.
Sudhir Gadgil, Mahayuti And On Sangli Market Committee
Sudhir Gadgil, Mahayuti And On Sangli Market Committeesarkarnama
Published on
Updated on

Sangli News : काही वर्षापासून बहुचर्चित असणाऱ्या 'तालुका तेथे, बाजार समिती' धोरणानास राज्य सरकारने मंजुरी दिली. यामुळे सांगली जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यांसाठी स्वतंत्र बाजार समिती स्थापन केली जाईल. या निर्णयाला काँग्रेस आणि अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी विरोध केला आहे. तर भाजप आमदार गोपिचंद पडळकर यांची गोची झाली आहे. पण या निर्णयाचे स्वागत भाजप आमदार सुधीर गाडगीळ करताना दिसत असून ते श्रेय घेताना दिस आहेत. यामुळे सध्या सांगलीमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

सन २००६ पासून बाजार समितीच्या त्रिभाजनाचा मुद्दा रखडलेला होता. जो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गी लावला. महायुती सरकारच्या पहिल्या शंभर दिवसांच्या विकास आराखड्याप्रमाणे विविध प्रकल्पांना गती देण्याचे धोरण फडणवीसांनी हाती घेतले आहे. त्याप्रमाणे 'तालुका तेथे बाजार समिती'चा निर्णय घेण्यात आला आहे. आता या निर्णयाचे स्वागत काही जिल्ह्यांमध्ये होत असून काही ठिकाणी विरोध होताना दिसत आहे. सध्या या निर्णयाला पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर बाजार समित्यांच्या संचालक मंडळासह सभापतींचा विरोध आहे. तर या निर्णयाविरोधात न्यायालयात जाण्याची तयारी केली जातेय. याबाबत काहीच दिवसांमध्ये तिन्ही जिल्ह्यातील बाजार समिती संचालक आणि सभापतींची बैठक होणार आहे.

दरम्यान 'तालुका तेथे, बाजार समिती' धोरण आपल्या प्रय्तनामुळे झाल्याचे आता भाजप आमदार सुधीर गाडगीळ सांगत आहेत. यामुळे काम सरकारचं, निर्णय महायुतीचा आणि श्रेय लाटतायतं गाडगीळ अशी चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. याबाबत गाडगीळ यांनी आपण मुख्यमंत्र्यांकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे सांगताना त्रिभाजनामुळे मिरजेवरील अन्याय दूर होणार असल्याचा दावा केलाय.

Sudhir Gadgil, Mahayuti And On Sangli Market Committee
Sudhir Gadgil : पश्चिम महाराष्ट्रात भाजपला धक्का! आमदाराने घेतला मोठा निर्णय

चार दिवसांपूर्वी त्यांनी, शासनाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन केल्यामुळे मिरज तालुक्यासाठी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती स्वतंत्र झाली आहे. त्यामुळे मिरज तालुक्यावरील अन्याय दूर होणार होईल अशी प्रतिक्रिया दिली होती.

हा विषय मांडूनही प्रलंबित होता. पण हा विषय सातत्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच पणनमंत्री जयकुमार रावल यांच्यासमोर आपण मांडला. विधिमंडळातही या बाजार समितीच्या त्रिभाजनाची मागणी लावून धरली. तसेच प्रत्येक तालुक्यासाठी स्वतंत्र बाजार समिती अस्तित्वात आहे. केवळ सांगली जिल्ह्यातील जत, कवठेमहांकाळ व मिरज यांचीच संयुक्त बाजार समिती आहे, हेही सरकारच्या निदर्शनास आणले होते.

यानंतरच मुख्यमंत्र्यांनी राज्यात नव्याने होणाऱ्या 68 बाजार समित्यांत जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यांचा समावेश केला. यामुळे येथे आता स्वतंत्र कृषी उत्पन्न बाजार समिती स्थापन होणार असल्याचे त्यांनी म्हटलं होते. तसेच त्यांनी याबाबत एक पोस्ट शेअर केली असून त्यात त्यांनी, माझ्या प्रयत्नामुळे आज सांगली जिल्ह्यासाठी तीन तालुक्याला कृषी उत्पन्न बाजार समितीचे मागणी राज्य सरकारने मंजूर केली त्याबाबत आज सर्व व्यापारी असोसिएशनच्या वतीने माझा सत्कार करण्यात आला त्याबद्दल आभार..!! असेही म्हटलं आहे. पण आता या वक्तव्यांमुळे गाडगीळ श्रेय घेण्यासाठी घडपडत असल्याचे म्हटलं जात आहे.

Sudhir Gadgil, Mahayuti And On Sangli Market Committee
Sangli Assembly Election : छत्रपती शिवाजी महाराज मंडई ‘हायटेक’ करणार : आमदार सुधीर गाडगीळ

पण या निर्णयाविरोधात सांगलीतील दुष्काळी भागातील संचालकांसह नेत्यांकडून तीव्र विरोध होताना दिसत आहे. स्वतंत्र बाजार समिती झाल्यास दुष्काळी आणि उत्पन्नाचे स्रोत कमी असलेल्या जत आणि कवठेमहांकाळ उपबाजा आवार बंद पडतील असा दावा संचालक मंडळ आणि नेत्यांनी केला आहे. तसेच या निर्णय मागे घेण्याची मागणी केली आहे. याबाबत अपक्ष खासदार विशाल पाटील यांनी देखील विरोध करताना थेट न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com