Nitesh rane : नितेश राणेंचे ठीक आहे पण संयमी सुरेश खाडेंकडूनही द्वेषांची भाषा...

Hate speech controversy News : मेळाव्यावेळी आता माजी मंत्री व भाजप नेते सुरेश खाडे यांनी सर्वांसमोरच मुक्ताफळे उधळली आहेत.
suresh khade, Nitesh rane
suresh khade, Nitesh rane Sarakarnama
Published on
Updated on

Mumbai News : नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कणकवली विधानसभा मतदारसंघातून भाजपचे नेते नितेश राणे यांनी तिसऱ्यांदा विजयाची हॅट्ट्रिक केली. त्यानंतर नवनिर्वाचित मंत्री म्हणून पदभार घेतल्यानंतर नितेश राणे यांचे वादग्रस्त विधान समोर आले. 'केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात,' असे आक्षेपार्ह विधान नितेश राणे यांनी केले होते. आता त्याच पावलावर पाऊल टाकत सांगलीतील हिंदू गर्जना मेळाव्यावेळी आता माजी मंत्री व भाजप नेते सुरेश खाडे यांनी सर्वांसमोरच व्यासपीठावरून मी दलित असलो तरी मिरज या मिनी पाकिस्तानमधून सलग चारवेळा विजयी होत चौकार मारला असल्याचे सांगत मुक्ताफळे उधळली आहेत.

मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी चारच दिवसापूर्वी राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथून निवडून येतात. केरळचे सगळेच अतिरेकीच त्यांना मतदान करत आहेत. मी खरे बोलतोय. अतिरेक्यांना हाताशी धरूनच हे लोक खासदार झालेले आहेत, असे आक्षेपार्ह विधान यावेळी नितेश राणे यांनी केले होते. पुण्यातील सासवड येथे शिवप्रताप दिन अफजलखानाचा वधाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला नितेश राणे उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे विधान केले होते.

suresh khade, Nitesh rane
Suresh Khade : शिंदे अन् अजितदादांच्या नाकावर टिच्चून मंत्री खाडे म्हणतात,'लाडकी बहीण योजना फडणवीसांचीच...'

एकदा वाद ओढवून घेणे ही राणे कुटुंबाची खासियतच झाली आहे. त्यांच्याकडे बोट दाखवणाऱ्या कोणत्याच नेत्याला ते सोडत नाहीत. तर काही नेते मंडळींशी त्यांचे गेल्या अनेक दिवसांपासून हाडवैरच आहे. विशेषतः गेल्या पाच वर्षांपासून नितेश राणे यांनी मुस्लिम समाजाबद्दल अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. प्रत्येक ठिकाणी ते मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करून वाद ओढवून घेत असतात.

suresh khade, Nitesh rane
Sudhir Mungantiwar : खतपाणी घातल्याने कुठलाही नेता मोठा होत नाही; मुनगंटीवारांचा टोला कुणाला?

गेल्या पाच वर्षाच्या काळात राज्याचे सामाजिक व न्याय मंत्री असलेल्या सुरेश खाडे (Suresh Khade) यांची ओळख एक संयमी नेते अशीच राहिली आहे. आतापर्यंतची त्यांची राजकीय कारकीर्द पहिली तर त्यांनी कधी वादग्रस्त विधान केलेले नाहीत. विशेषतः मुस्लिमबहुल मतदारसंघ अशी ओळख असलेल्या मिरज विधानसभा मतदारसंघातून सलग चार वेळा ते निवडून आले आहेत. त्यांनी ही सांगलीतील भरसभेतच मुस्लिम समाजाबद्दल द्वेष निर्माण करणारी विधाने करीत नव्या वादाला तोंड फोडले आहे

suresh khade, Nitesh rane
Sudhir Mungantiwar News : मुनगंटीवारांना जोरगेवारांकडून ‘मिस्ड कॉल’; फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजर का? सांगितले कारण...

यावेळी माजी मंत्री सुरेश खाडे यांनी मिरज मतदारसंघाबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. हिंदू गर्जना मेळाव्यात बोलताना खाडे म्हणाले की, सभागृहात मराठी माणूस राहील की नाही, असा प्रश्न कधीकधी पडतो. नितेश राणे जे म्हणतात त्यासोबत आम्ही आहोत. विधानसभेला 'कटेंगे तो बटेंगे' या नाऱ्यामुळे मोठा विजय मिळाला, सभागृहाला विरोधी पक्षनेतासुद्धा राहिला नाही. आपण येथे घोषणा देताना हिंदू राष्ट्र ही घोषणा दिली. हिंदू राष्ट्र झालं तर मग काही चिंता नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरेश खाडे यांनी मिरज विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केला. मी जरी दलित असलो तरी हिंदू आहे. या मतदारसंघातून सलग चार वेळा विजय मिळवत चौकार मारला असल्याचे सांगत सर्वसामान्यांच्या मनाला चीड येईल, असे वक्तव्य त्यांनी केले. त्यामुळे येत्या काळात नवा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.

suresh khade, Nitesh rane
Devendra Fadnavis News : शरद पवारांचे 'संघ' कौतुक, फडणवीसांंनी दिले मोठे संकेत; म्हणाले, 'राजकारणात अशक्य...'

राज्यात भाजप सत्तेत आल्यानंतर काही नेत्यांना वादग्रस्त विधाने टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र, त्याची अंमलबाजवणी होताना दिसत नाही. त्याचवेळी राज्य सरकारला अडचणीत आणणारे विधाने कटाक्षाने टाळा, अशा सूचना काही वाचाळवीरांना दिल्या होत्या. त्यामुळे काही जणांनी टीका करणे टाळले तरी काही मंडळी अशी विधाने करीतच आहेत. राज्यात नवे सरकार येऊन महिनाभराचा कालावधी झाला आहे. त्यातच एक नव्हे तर बीडमधील सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण व परभणी हिंसाचार प्रकरणानंतर पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला. या दोन घटनांमुळे राज्य सरकार बॅकफूटवर गेल्याचे चित्र आहे.

त्यातच आता सुरेश खाडे यांनी द्वेष पसरवणारे वक्तव्य करीत विरोधकांच्या हाती आयते कोलीत दिले आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून आता विरोधी पक्षांकडून राज्य सरकारची कशाप्रकारे कोंडी केली जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून दुसरीकडे अशास्वरुपाची वादग्रस्त वक्तव्ये टाळण्यासाठी भाजपकडून काय उपाययोजना केली जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

suresh khade, Nitesh rane
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी नाराज नगरसेवकांना सुनावले; म्हणाले, 'अडचणीच्या काळात पक्षाला ब्लॅकमेल करणे योग्य नाही'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com