Sudhir Mungantiwar News : मुनगंटीवारांना जोरगेवारांकडून ‘मिस्ड कॉल’; फडणवीसांच्या कार्यक्रमाला गैरहजर का? सांगितले कारण...

Devendra Fadnavis in Chandrapur Kishor Jorgewar : विधानसभा निवडणुकीदरम्यान किशोर जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला सुधीर मुनगंटीवार यांचा विरोध असल्याचे जगजाहीर होते.
Sudhir Mungantiwar
Sudhir MungantiwarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी चंद्रपूरच्या दौऱ्यावर आहेत. पण त्यांचे पक्षातील सहकारी आमदार सुधीर मुनगंटीवार मुंबई मुक्कामी असल्याने चर्चांना उधाण आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री मारोतराव कन्नमवार यांची 125वी जयंतीनिमित्त भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात मनुगंटीवार यांची अनुपस्थितीवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना काल आपल्याला या कार्यक्रमाचे निमंत्रण मिळाले. जोरगेवारांचा ‘मिस्ड कॉल’ही होता, असे सांगितले. त्यावरूनही आता चर्चा सुरू झाल्या आहेत. मुनगंटीवारांनी जोरगेवारांचा फोन घेतला नाही का किंवा पुन्हा कॉल केला की नाही, असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sudhir Mungantiwar
Local Body Elections 2025 : इच्छुकांची पुन्हा जुंपणार! स्थानिक स्वराज्य निवडणुकीनंतरच महामंडळाच्या नियुक्ती शक्य

मुंबईत शिफ्टींगचे काम सुरू असून आजचा दिवस आहे. उद्या शिर्डीलाही जायचे आहे, त्यामुळे चंद्रपुरात कार्यक्रमाला नसल्याचा खुलासा मुनगंटीवारांनी केला आहे. याबाबत फडणवीस यांच्याशीही चर्चा झाल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांसह चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक आजी-माजी खासदार-आमदार उपस्थित होते.

विधानसभा निवडणुकीदरम्यान जोरगेवार यांच्या भाजप प्रवेशाला मुनगंटीवार यांचा विरोध असल्याचे जगजाहीर होते. पण त्यानंतरही जोरगेवार यांनी भाजपमध्ये प्रवेश करत उमेदवारीही मिळवली. ते विजयीही झाले. त्यावेळी मुनगंटीवारांची नाराजी समोर आली होती. तसेच मंत्रिपद न मिळाल्यानेही ते नाराज असल्याची चर्चा होती.

Sudhir Mungantiwar
Walmik Karad : 'कराड दाऊदच्या बरोबरीचाच'; काँग्रेस नेत्याची सडकून टीका

सर्व ‘वारां’चा सन्मान करतो – फडणवीस

कार्यक्रमात बोलताना फडणवीस यांनी मुनगंटीवारांसह वडेट्टीवार आणि जोरगेवारांचे नाव घेतले म्हटले की, चंद्रपूर हा वार आणि वाघांचा जिल्हा आहे. आम्ही वार आडनाव असलेल्या लोकांचा नेहमी सन्मान करतो. आम्ही हेगडेवारांचे अनुयायी आहोत, सर्व वारांचा सन्मान करतो, असे फडणवीस म्हणाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com