BJP President News : PM मोदींनी भाजपच्या अध्यक्षपदाबाबत दिले मोठे संकेत; शहा, नड्डांची परंपरा नितीन नबीन कायम राखणार?

BJP National Working President : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे २०१० मध्ये राष्ट्रीय महासचिवपद आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. ते जवळपास सहा वर्षे या पदावर होते.
Nitin Nabin with Narendra Modi
Nitin Nabin with Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

BJP organisational post : भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी बिहारमधील मंत्री नितीन नबीन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीने भाजपची आगामी काळातील रणनीती स्पष्ट झाली आहे. पक्ष अजूनही राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी योग्य नेत्याच्या शोधात असताना नितीन नबीन यांची नियुक्ती झाली आहे. भाजपच्या राष्ट्रीय अध्यपदाच्या इतिहासाकडे पाहिल्यास नितीन नबीन ही परंपरा कायम राखणार, या चर्चांना आता उधाण आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांच्या नियुक्तीनंतर शुभेच्छा देताना तसे संकेत दिले आहेत. पंतप्रधानांनी सोशल मीडियात पोस्ट करत म्हटले आहे की, ‘आगामी काळात त्यांची ऊर्जा आणि कटिबध्दता आमच्या पक्षाला आणखी सक्षम बनवेल, असा विश्वास आहे.’ हा विश्वास व्यक्त करताना त्यांनी नबीन यांचे तोंडभरून कौतुकही केले आहे.

नितीन नबीन यांनी एक कट्टर कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पक्ष संघटनेचा चांगला अनुभव असलेले ते एक तरूण आणि मेहनती नेते आहेत. बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून त्यांचे काम अत्यंत प्रभावी राहिले आहे. त्याचप्रमाणे लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांनी समर्पित भावनेतून काम केले आहे. विनम्र स्वभावासोबतच ते तळागाळात काम करणारे नेते म्हणून ओळखले जात असल्याचे पंतप्रधान म्हणाले आहेत.

Nitin Nabin with Narendra Modi
BJP working president : देशाच्या राजकारणातील मोठी बातमी; भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षांच्या नावाची घोषणा, मोदी-शहांचे पुन्हा धक्कातंत्र

काय आहे अध्यक्षपदाची परंपरा?  

नितीन नबीन यांची नियुक्ती भाजपच्या अध्यक्षपदाच्या परंपरेशी जोडली जाऊ लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव किंवा कार्यकारी अध्यक्षच पुढे जाऊन राष्ट्रीय अध्यक्ष बनल्याची ही परंपरा आहे. त्यामुळे नितीन नबीन यांच्याकडेच आता राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पाहिले जाऊ लागले आहे. ही परंपार मागील दोन अध्यक्षांबाबतही घडली आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे २०१० मध्ये राष्ट्रीय महासचिवपद आले होते. त्यानंतर २०१४ मध्ये ते राष्ट्रीय अध्यक्ष बनले. ते जवळपास सहा वर्षे या पदावर होते. या काळात संपूर्ण देशात भाजपला केंद्रात दोनदा तसेच अनेक राज्यांमध्ये सत्ता मिळाली. त्यामुळे हा काळ भाजपसाठी सुवर्णकाळ मानला जातो.

Nitin Nabin with Narendra Modi
Anjali Nimbalkar : माजी आमदार अंजली निंबाळकर बनल्या देवदूत; अमेरिकन तरूणीला दिले जीवनदान...

विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा २०१० मध्ये हिमाचल प्रदेश सरकारमध्ये मंत्री होते. त्यावेळी त्यांना राष्ट्रीय महासचिव बनविण्यात आले. त्यांनी मंत्रिपद सोडून पूर्णवेळ पक्षासाठी समर्पित केला. देशात भाजपची सत्ता आल्यानंतर २०१४ ते २०१९ मध्ये ते केंद्रीय आरोग्यमंत्री होते. २०१९ मध्ये त्यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यानंतर २०२० मध्ये त्यांच्या खांद्यावर राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली. महासचिव, कार्यकारी अध्यक्ष आणि अध्यक्ष असा नड्डा यांचा प्रवास राहिले. नितीन नबीन हेही त्याच रांगेत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com