समीर वानखेडेंची भिती वाटतेय म्हणून व्हिडीओतून सगळं सांगतोय!

आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे.
Sameer Wankhede and Prabhakar sail
Sameer Wankhede and Prabhakar sailSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : आर्यन खानला (Aryan Khan) एनसीबीने अटक केल्यानंतर या प्रकरणातील पंच किरण गोसावी (Kiran Gosavi) अचानक गायब झाला. तो आजवर समोर आलेला नाही. रविवारी त्याचा बॉडीगार्ड प्रभाकर साईल (Prabhakar Sail) याने धक्कादायक खुलासे करत आर्यनच्या सुटकेसाठी डील झाल्याचा दावा केला आहे. प्रभाकरने अनेक आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. त्याने एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरही गंभीर आरोप केले आहेत.

आर्यनच्या सुटकेसाठी किरण गोसावी व शाहरुख खानच्या मॅनेजरमध्ये 25 कोटी रुपयांची डील झाल्याचा दावा प्रभाकरने व्हिडीओतून केला आहे. त्याने अफिडेविटही तयार केले असून अनेक खुलासे केले आहेत. त्यामुळे आर्यन खान प्रकरणाला वेगळं वळण मिळालं आहे. डीलमध्ये 50 लाख रुपये घेतल्याचेही प्रभाकरने सांगितले आहे. त्यातील 12 लाख गोसावीने स्वत:कडे ठेवले तर 38 लाख सॅमला दिल्याची माहिती प्रभाकरने दिले आहे.

Sameer Wankhede and Prabhakar sail
खळबळजनक : वानखेडेंनी आर्यनला ताब्यात घेतलं अन् गोसावीने शाहरूखकडून 50 लाख उकळले

तसेच प्रभाकरने वानखेडेंवर गंभीर आरोप केला आहे. 'आज मी हा व्हिडीओ करत आहे, कारण समीर वानखेडे यांची मला भीती वाटत आहे. माझ्या पत्नीचाही मला काही दिवसांपूर्वी फोन आला होता. तिलाही चौकशीसाठी पोलिसांचे फोन गेले होते. माझ्या कुटुंबाला काय झालं, तर मी कुणासाठी जगायचं. म्हणून व्हिडीओमार्फत मी सर्वांना हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे,' असं प्रभाकर म्हणाला आहे.

प्रभाकरने काय आरोप केले आहेत?

प्रभाकर साईलने व्हिडीओमध्ये म्हटले आहे की, आर्यनला ताब्यात घेतेल त्या रात्री आम्ही एनसीबीच्या कार्यालयाकडून लोअर परेलच्या दिशेने गेलो. तिथे एका पुलाखाली आमची गाडी थांबली. आमच्यामागे निळ्या रंगाची मर्सिडीज थांबली. त्या गाडीत एसआरकेची मॅनेजर होती. त्यानंतर गोसावी व सॅम सोबत त्यांची मिटींग झाली. त्यामध्ये काय झाले ते त्यावेळी मला कळलं नाही. पण गाडीतून त्यांनी परत फोन केला. 25 चा बाँड टाक, लास्ट 18 ला कर. कारण 8 समीर वानखेडेंना जाणार आहेत. आणि 10 आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, असं ठरल्याचं प्रभाकर याने म्हटलं आहे.

Sameer Wankhede and Prabhakar sail
गोसावीच्या बॉडीगार्डच्या बॉम्बनंतर वानखेडेंचे 'ते' शब्द मलिकांनाही आठवले!

आर्यनला एनसीबीच्या कार्यालयात आणल्यानंतर काही वेळाने गोसावीला सॅम नावाच्या व्यक्तीचा फोन आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या गाड्यांमध्ये आम्ही एका ठिकाणी गेलो. तिथे एका निळ्या रंगाच्या मर्सिडीज कारमध्ये शाहरुख खानची मॅनेजर पूजा दडलानी हिला दोघे भेटले. त्यामध्ये त्यांची बोलणी झाली. त्यानंतर गोसावीसह आम्ही दोघे वाशीच्या घरी गेलो. सकाळी पुन्हा ताडदेवला इंडियाना हॉटेलजवळ प्रभाकर आला. तिथे एका गाडीतून 50 लाख रुपये घेऊन पुन्हा वाशीला आल्याचा खुलासा प्रभाकरने केला आहे.

प्रभाकर 50 लाख घेऊन गोसावीला वाशीतील इनऑरबीट मॉलजवळ गेला. तेथून गोसावीने पून्हा पैशाची पिशवी प्रभाकर कडे देऊन ती सॅमला देण्यास सांगितली. त्यानुसार प्रभाकर पैसे घेऊन सॅमकडे गेला. पण त्यावेळी पिशवीत 38 लाख रुपयेच होते. त्यातील 12 लाख नव्हते, असा खुलासाही प्रभाकरने केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com