Pune News : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेसचा पारंपारिक गड मानला जातो. गेल्या अनेक वर्षांमध्ये या भागातील कोणत्याही निवडणुकीत भाजपला आपलं अस्तित्व निर्माण करता आलं नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने राबवलेल्या 'ऑपरेशन लोटस'मुळे या भागामध्ये भाजपची ताकद चांगल्या प्रमाणात वाढली आहे.
सध्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीची धामधूम सुरू असलेल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपाच्या कडव्या आव्हानाला तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वेळप्रसंगी काही ठिकाणी पारंपारिक विरोधकांशी अजित पवार यांना हात मिळवणी करावी लागले असल्याचे देखील दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या बालेकिल्ल्यातच दादा हातबल झालेत का ? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाला पुणे जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत फोडाफोडी आणि इतर पक्षातून खेचाखेची करून उमेदवारांची पूर्तता करावी लागत आहे. एकेकाळी राष्ट्रवादीमध्ये उमेदवारांची रीघ पाहायला मिळत असे मात्र सध्या भोर, राजगुरुनगर, इंदापूर आणि जेजुरी या नगरपरिषदांमध्ये इतर पक्षातील उमेदवारांना आयात करून उभे केले आहे.
तसेच काही ठिकाणी भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबत तडजोड करावी लागली आहे. त्यामुळे एका वेळी गड असलेल्या पुणे जिल्ह्यातच पक्षाच्या मर्यादा आता समोर येऊ लागल्या आहेत.
भाजपच्या वाढत्या प्रभावामुळे अजित पवार यांच्यासमोर मोठे आव्हान उभे राहिले. हे आव्हान पेलण्यासाठी त्यांनी प्रथम पुणे जिल्ह्यातील शरद पवार गटात फूट पाडली आणि अनेक ठिकाणी आपले जुने पारंपरिक विरोधकांशी हातमिळवणी करून त्यांच्यासह निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले.
बारामती तालुक्यातील माळेगाव नगरपंचायतीत दीर्घकाळ कट्टर विरोधक असलेले रंजन तावरे यांच्यासोबत अजित पवार गटाला आघाडी करावी लागली. जेजुरी नगरपरिषदेत सर्वच गटांवर वर्चस्व गाजवणाऱ्या दिलीप बारभाई यांचा मुलगा तसेच अनेक माजी नगरसेवकांना आपल्या गटात घेऊन अजित पवारांना निवडणूक लढवावी लागली. भोर नगरपरिषदेत पूर्वी थोपटे गटाचे असलेले रामचंद्र आचारे यांना फोडून त्यांना आपल्या बाजूने उभे करावे लागले. त्याशिवाय शिंदेंच्या पक्षांतील महत्त्वाच्या उमेदवारांची पळवापळवी करून अजित पवार गटाने आपले बळ वाढवले.
खेड नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासाठी अजित पवार गटाकडे स्वबळावर तगडा उमेदवार नव्हता, म्हणून सर्वपक्षीय मान्यतेचे प्रताप आहेर यांना आपल्या बाजूने आणून त्यांचा अजित पवार गटाच्या चिन्हावर नगराध्यक्ष म्हणून उमेदवार केले आहे. तळेगाव ढामढेरे नगरपरिषदेत भाजपचे दीर्घकाळचे प्रबळ वर्चस्व पाहता, अजित पवार गटाला पहिले अडीच वर्षे भाजपलाच नगराध्यक्षपद देण्याची समझोता करावी लागली. फुरसुंगी नगरपंचायतीतही शिंदेच्या शिवसेनेशी गटाशी हातमिळवणी करून अजित पवार गटाला मैदानात उतरावे लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.