Raghav Chadha news : दिल्लीत घमासान, सरकारला हादरा..! अचानक गायब झालेल्या राघव चड्ढा यांच्या भूमिकेने वाढले गुढ

Student protest, Delhi protest : दिल्लीतील पेपरफुटी व संसद मोर्चा प्रकरणाने राजकारण तापले असताना जेन जीमध्ये लोकप्रिय असलेले भाजप खासदार राघव चड्ढा अचानक गायब; सोशल मीडियावरील शांततेमुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
Raghav Chadha
Raghav ChadhaSarkarnama
Published on
Updated on

Delhi politics update : मागील काही दिवसांपासून दिल्लीतील राजकारण चांगलेच तापले आहे. नीट पेपरफुटीच्या मु्द्यावरून कॉक्रोच जनता पार्टीने जंतर मंतरवर आंदोलन केल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांना केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्याआधी संसद मोर्चातील आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले. संसदेच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटत आहेत.

दिल्लीच्या राजकारणात घमासान सुरू असतानाच 'जेन जी'मध्ये लोकप्रिय असलेले भाजपचे खासदार राघव चड्ढा गायब झाले आहेत. सोशल मीडियात कोट्यवधी फॉलोअर्स असलेल्या राघव चड्ढा यांनी जंतर मंतरवरील आंदोलन तर सोडाच पण देशातील राजकीय स्थिती किंवा धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर एकही विधान केलेले नाही.

राघव चड्ढा यांनी मागील महिन्याहून अधिक काळापासून सोशल मीडियात एकही पोस्ट केलेली नाही. ते मीडियालाही सामोरे गेलेले नाही. ते भारतात आहेत की परदेशात याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही किंवा त्यांनीही याबाबत माहिती दिलेली नाही. एकीकडे एनडीए सरकार संकटात असताना जेन जीमध्ये वरचष्मा असलेल्या राघव चड्ढा यांनी चुप्पी साधल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Raghav Chadha
Rahul Gandhi news : राहुल गांधींना तोंडावरच सांगितलं, आश्वासन विसरलात तर तुमच्या विरोधात...! आंदोलकाने भेटीतील चर्चा केली उघड...

चढ्डा यांनी आम आदमी पक्षाला रामराम ठोकत सहा खासदारांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आपमध्ये असताना संसदेत त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना तरुणाईचा प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. पण तरूणाईच्या आंदोलनापासून ते दूर राहिल्याचे पाहायला मिळाले. त्यावर ना सकारात्मक ना नकारात्मक प्रतिक्रिया दिली. एवढेच नाही तर सरकारच्या बाजूनेही ते उभे राहिलेले दिसले नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेले दोन व्हिडिओच चड्ढा यांनी एक्सवर पोस्ट केले आहेत. हे वगळता त्यांची एकही पोस्ट नाही. चड्ढा नेमके कुठे आहेत, त्यांनी चुप्पी का साधली आहे, संसदेच्या अधिवेशनात अनेक महत्वाचे मुद्दे उपस्थित होत असताना ते गायब का झाले आहेत, असे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागले आहे. सोशल मीडियातही त्यांच्या गायब होण्यावर नेटकऱ्यांकडून प्रश्न उपस्थित केले जाऊ लागले आहे. तर काही जण त्यांना ट्रोलही करू लागले आहेत.

Raghav Chadha
Modi Government : तब्बल 36 खासदार वळविले, पण एका झटक्यात मोदी सरकारच्या मनसुब्यांवर फिरलं पाणी!

राघव चड्ढा यांच्यासोबत भाजपमध्ये दाखल झालेल्या स्वाती मालीवाल यांच्याकडून पेपरफुटीच्या मुद्द्यावर विरोधकांवर निशाणा साधला जात आहे. त्यांच्यासह एनडीएतील बहुतेक खासदारांकडून सरकारची पाठराखण करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियात केल्या जात आहेत. अशीच अपेक्षा भाजपला आणि केंद्र सरकारला तरूणाईत लोकप्रिय असलेल्या राघव चड्ढा यांच्याकडूनही असेल. पण चड्ढा यांनी एकप्रकारे या मुद्द्यावरून अंग काढून घेतल्याचे दिसते. त्यांची ही भूमिका भाजपसह देशातील त्यांच्या फॉलोअर्सलाही बुचकळ्यात टाकणारी आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com