Maharashtra Politics : येवल्यातील शिवसृष्टी प्रकल्पावरून मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित ठेकेदाराची खरडपट्टी काढत सदर प्रकल्प मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिलेत. तब्बल 11 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभा करण्यात येतो आहे. सिंहासनाधिष्टित छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्यापुढे स्वराज्य चालवणारे मावळे यांचा दरबार असा हा प्रकल्प आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भुजबळ विरूद्ध मराठा समाज असे चित्र निर्माण झाले असून, हा प्रकल्प आपल्यासाठी ड्रीम प्रोजेक्ट असल्याचा दावा भुजबळांनी केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
येवला विंचूर रस्त्यावर पंचायत समितीच्या मोकळ्या भव्य जागेत शिवसृष्टी प्रकल्प उभा करण्यात येतो आहे. प्रकल्पात छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगडावरील प्रतिकृती असलेला सिंहासनाधिष्ठित पुतळा, शिवछत्रपतींच्या जीवनावर आधारित म्युरल्स, आर.सी.सी गॅलरी, म्युझियम, कॅफेटेरिया, आर.सी.सी बुरुज, ओ.व्ही हॉल, पर्यटन सुविधा केंद्र, विक्री केंद्र, इतर अनुषंगिक पुतळे, स्वच्छतागृह, लॅडस्केपिंग, गार्डनिंग, पेंटिंग्ज, पाणीपुरवठा, मलनिस्सारण प्रकल्प, आग्निप्रतिबंधक यंत्रणा, इलेक्ट्रिक कामे, सुशोभीकरणाची कामे या कामांचा समावेश असणार आहे.
इतरवेळी छगन भुजबळांच्या(Chhagan Bhujbal) इतर विकासकामांप्रमाणेच हा एक प्रकल्प ठरला असता. मात्र, या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसमधील उभी फूट, त्यानंतर मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भुजबळ विरुद्ध मराठा समाज अशी स्थिती निर्माण झाली आहे. तर, येवल्यातून दराडे बंधूसह शरद पवार गटाकडून भुजबळांना रोखण्यासाठी रणनिती आखण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर भुजबळांनी शिवसृष्टीचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी चंग बांधला आहे.
शिवाजी महाराजांच्या दरबारात सर्व जाती धर्मांचे लोक होते. महाराजांनी सर्वांना सामावून घेतले. हे चित्र सर्वांसमोर येण्यासाठी या प्रकल्पाची निर्मिती होत असल्याची प्रतिक्रिया भुजबळांनी प्रकल्पाची पाहणी करताना व्यक्त केली. मार्च महिन्यापर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा भुजबळांचा प्रयत्न असून, येवल्यामध्ये शिवसृष्टी प्रकल्पाचा चांगला परिणाम दिसून येईल, असा विश्वास भुजबळांना वाटतो.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.